Year Ender: तैमूर अली खान ते पलक तिवारीपर्यंत लाईमलाईटमध्ये होते हे स्टार किड्स

Year Ender: तैमूर अली खान ते पलक तिवारीपर्यंत लाईमलाईटमध्ये होते हे स्टार किड्स

2019 हे साल संपायला आता अगदी काहीच दिवस उरले आहेत. यावर्षी चित्रपट जगतात बरंच काही झालं ज्यामुळे हेडलाईन्स झाल्या. बॉलीवूड स्टार्स तर चर्चेत होतेच सोबतच त्यांची मुलंही वर्षभर चर्चेत असतात. काही स्टार किड्सना ट्रोल करण्यात आलं तर काहींना पसंतीही मिळाली. अशाच स्टारकिड्सबाबत जाणून घेऊया या लेखात ज्यांना 2019 मध्ये मिळाली पूरेपूर प्रसिद्धी.

तैमूर अली खान

बॉलीवूडच्या स्टारकिड्समध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान. ज्याच्या प्रत्येक हालचालीवर पापाराझ्झींची नजर असते. अगदी त्याच्या जन्मापासून ते वाढदिवसापर्यंत तैमूरच्या प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ व्हायरल होतो. त्याच्या मागे येणाऱ्या पापाराझ्झींच्या त्रासामुळे वैतागून तर तैमूर राहणाऱ्या सोसायटीतील लोकांनीही पोलिसांमध्ये तक्रार दिली. ज्याचीही बातमी झाली होती. तैमूर आपल्या आईबरोबर चित्रपटात झळकणार असल्याचीही गूड न्यूज होती. त्यामुळे यंदाही पापाराझ्झींच्या फेव्हरेट लिस्टमध्ये तैमूरच होता.

आराध्या बच्चन

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चनसुद्धा जन्मापासून बातम्यांमध्ये आहे. तिचं नावही खूप प्रसिद्ध झालं होतं आणि नंतर जणू हे नाव ठेवण्याचा ट्रेंड आला होता. पण आराध्या जेव्हा कॅमेरासमोर येते तेव्हा ती ट्रोल केली जाते. आराध्या यंदाही तिच्या शाळेतील एन्युअल फंक्शनमधील परफॉर्मन्समुळे चर्चेचा विषय होती. आराध्याची तुलना नेहमीच तिच्या आईशी केली जाते. जे काही प्रमाणात चुकीचं आहे.

अबराम खान

शाहरुख खान आणि गौरी खानचा छोटा मुलगा अबराम खान भलेही फक्त 6 वर्षांचा आहे. पण त्याचं फॅन फॉलोइंग कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. अबराम नेहमीच हेडलाईन्समध्ये असतो. कधी कुटुंबासोबत सुट्ट्यांवर गेल्याबद्दल त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो पेटींग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ त्याच्या फॅन्सनीही खूप पसंत केला होता.

निसा देवगण

View this post on Instagram

Pretty @nysadevgan 😍 🔥 🔥 #nysadevgan

A post shared by nysa devgan 😉 (@princess_nysa_devgan) on

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी निसा देवगण ही नेहमीच ट्रोल होत असते. ज्यामुळे ती चर्चेचा विषय असते. 2019 मध्येही निसा कधी एअरपोर्ट लुक तर कधी तिच्या मेकअप तर कधी कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती.

पलक चौधरी

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पहिला नवरा राजा चौधरी यांची मुलगी म्हणजे पलक चौधरी. यंदा तिच्या डेब्यूमुळे ती चर्चेत होती. नंतर अशीही चर्चा होती की, टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' चं शूटींग सुरू झाल्यावर पलक चौधरीला संपर्क करण्यात आला होता. पण तिने या मालिकेला नकार दिला. तर या वर्षाच्या शेवटी पलकच्या सावत्र वडिलांच्या तिच्यासोबतच्या वागण्याने ती चर्चेत होती. पलक आणि श्वेताने अभिनव कोहलीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. तर श्वेताच्या आगामी सीरियलमधील इंटिमेट सीन्स आणि किसींग सीन्सबाबत पलकच्या प्रतिक्रियेमुळे ती चर्चेत होती.

सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.