करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाच्या लेखकाला हिंदू विरोधात ट्विट करणे पडले भारी

करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाच्या लेखकाला हिंदू विरोधात ट्विट करणे पडले भारी

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘तख्त’ हा लेखकामुळे चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या लेखकाने देशात सुरु असलेल्या CAA विरोधात असे काही ट्विट केले की,एकच गदारोळ माजला. प्रेरणादायक लेखक हुसेन हिद्रीने केलेल्या या ट्विटमुळे एकच गोंधळ उडाला आहे. नेटीझन्सनी त्याच्यावर टीकास्त्र उगारले पण अभिनेत्री कंगना रणौतच्या बहिणीने मात्र त्याला चांगलेच झाडले आहे. आधीच कंगनाची बहीण अनेक गोष्टींमध्ये नेहमीच बरळत असते. पण आता तिच्या या भूमिकेमुळे अनेकांनी तिचे सोशल मीडियावर समर्थन केले आहे.

बॉलीवूडमध्ये ठरले अपयशी पण दुसरे करिअर निवडून झाले स्टार सेलिब्रिटी

नेमकं प्रकरण काय?

‘तख्त’ हा हिंदूच्या शौर्याचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शुटींग अद्याप सुरु झाले नाही. त्याआधीच या चित्रपटाच्या स्टारकास्टमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. आता तर लेखकाच्या ट्विटमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. त्याने लिहिलेल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, माझा असा अंदाज आहे की, उच्च जातीच्या महिला ज्या हिंदूत्ववादी आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात सगळ्यात शेवटी त्रासच झाला आहे. त्यांना धोका मिळाला आहे. हा एक हिंदूवाद असून हिंदूच आतंकवादाला पाठिंबा देणारे आहेत. हे ट्विट केल्यानंतर त्याला लगेचच सगळ्यांनी ट्रोल केले. 

Instagram

कंगनाच्या बहिणीला नाही आवरता आला राग

रंगोली चांडेलने ट्विट करत करण जोहर आणि लेखक हुसेन हिद्रीला टार्गेट केले. तिने करण जोहरला प्रश्न विचारला आहे की, तुम्ही तख्त हा चित्रपट कशासाठी बनवत आहात. तुझ्या लेखकाने असा काय प्रताप करुन ठेवला आहे की त्याला आता प्रत्येक उच्च जातीच्या लोकांना चपलांचा मार द्यायचा आहे. पण त्याला विसर पडला आहे की करण जोहर उच्च जातीतला आहे. मग या लेखकाचे अडकले आहे कुठे? त्याला चप्पल सापडत नाही का? पुढे तिने करण जोहरलाही प्रश्न विचारला आहे. तू हा चित्रपट कशाला बनवतोय. तुला या चित्रपटातून नेमकं काय दाखवायचं आहे.

#boycotttakht

आता सध्या सगळीकडे एक हॅशटॅग फिरतो आहे तो #boycotttakht चा. अनेकांनी या चित्रपटाला आणि त्याच्या लेखकाला त्याच्या अशा कृत्यासाठी #boycott करायचे ठरवले आहे. आता हॅशटॅग सध्या सगळीकडे ट्रेंड होऊ लागला आहे.  अनेकांनी लेखकाला आताच बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नेमके काय होणार माहीत नाही. पण करण जोहरला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जर हा करणच्याच पब्लिसिटीचा भाग असेल तर या चित्रपटाला मात्र फार मोठे नुकसान किंवा फायदा होण्याची शक्यता आहे. 

अबीर आणि मिष्टीच्या लग्नादरम्यान कलाकारांनी केली धमाल

पिरियॉडिक ड्रामा

करण जोहरचा हा पिरियॉडिक ड्रामा आता खराच ड्रामामध्ये रुपांतर होताना दिसत आहे. आता हे प्रकरण आणखी किती वाढेल सांगता येत नाही. पण सध्या तरी सोशल मीडियावर या एकाच गोष्टीची फार चर्चा होताना दिसत आहे.  आता या प्रकरणाचे पुढे काय होते ते पाहावे लागेल. 

सध्या तरी अशा देशविरोधी प्रवृत्तीला वेळीच रोखलेले बरे.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.