तान्हाजी मालुसरेंच्या खऱ्या घराचा होणार जीर्णोद्धार

तान्हाजी मालुसरेंच्या खऱ्या घराचा होणार जीर्णोद्धार

‘तान्हाजी’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा इतिहासातील काही महत्वपूर्ण पानं उघडली गेली. शिवरायांचा इतिहास आपण सगळे जाणतो. पण त्यांना मदत करणारे काही मावळे आपल्याला विसरुन चालणार नाही. याचीच आठवण आपल्याला या चित्रपटाने करुन दिली. ‘गड आला पण सिंह गेला’ हे शिवरायांनी तान्हाजी मालुसरेंसंदर्भात काढलेले उद्गार आजही इतिहासांच्या धड्यात आलेत. या तान्हाजी मालुसरे यांच्या मूळ घराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे. उमरठ गावात शिकलेल्या एका तरुणाच्या पुढाकाराने हा जीर्णाेद्धाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांनी उचलेल्या या पाऊलामुळे सगळ्या स्तरावरुन त्यांची तारीफ केली जात आहे.

तुमचे आवडते बॉलीवूड सेलिब्रेटीज आणि त्यांच्या विचित्र सवयी

चित्रपटाची सुरुवात अनोखी

महाराष्ट्रातील ‘उमरठ’ या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. तान्हाजी मालुसरे यांचे ते जन्मगाव. त्यांच्या यागावात त्यांच्या नावाने शाळा देखील भरते. या शाळेतील विद्यार्थी हरिओम घाडगे हे लवकरच एक चित्रपट घेऊन येणार आहेत. निर्माता म्हणून चित्रपटाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांना काहीतरी विधायक काम करायचे होते. त्यांना तान्हाजी मालुसरे यांच्या जमीनदोस्त झालेल्या घराचा जीर्णोद्धार करायचा होता. म्हणून चित्रपटाच्या आधीच आणि शिवजयंतीचे निमित्त साधत त्यांनी त्यांच्या घराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. या घराचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे.

चित्रपटाच्या टीमने केले श्रमदान

श्रमदान करताना कलाकार

घाडगे यांनीच नाही तर चित्रपटाच्या टीमने यासाठी मेहनत घेतली आहे. सगळ्या कलाकारांनी मिळून या वास्तूचा जीर्णोद्धार करण्यासाठी श्रमदान केले आहे. याच दिवशी घडागे यांचा आगामी चित्रपट ‘हरी ओम’ या चित्रपटाच्या संहितेचे पूजन आणि अनावरण करण्यात आले. हरी ओम स्टुडिओज निर्मित आणि आशिष नेवाळकर दिग्दर्शित असा हा चित्रपट असणार आहे. पण या चित्रपटाबद्दल आणखी काही माहिती सध्या देण्यात आली नाही. पण लवकरच या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड करणार वकिली

तान्हाजी मालुसरेंचा इतिहास आला समोर

सध्या बॉलीवूडमध्ये पिरयॉडिक चित्रपटांवर अधिक काम केले जात आहे. शिवरायांंसंदर्भातील कोणताही विषय हा संबंध महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे. तान्हाजी या अजय देवगण यांच्या चित्रपटाच्या रुपाने तान्हाजी मालुसरे यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली. त्यांच्या पराक्रमाबद्दल कळले. त्यांच्या शौर्याचे किस्से कुठेही लिहिले नसले तरी त्यांच्यावर लिहिलेल्या पोवाड्यातून आणि इतिहासातील उल्लेखातून महाराष्ट्रासाठी हे व्यक्तिमत्व फारच महत्वाचे आहे हे नक्की झाले. आता त्यांच्याच घराचा जीर्णोद्धार होणार म्हटल्यावर यावाचून आनंदाची बातमी ती कोणती? महाराष्ट्रात असे अनेक योद्धे होऊन गेले ज्यांच्या कतृत्वासंदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही.पण अशा पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून काही गोष्टी पुढे आल्या तर हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचणे फारच गरजेचे आहे.


घाडगे यांच्यासारखी जबाबदारी घेण्याची आज आपल्या सगळ्यांनाच गरज आहे. जीर्णोद्धारासाठी पैसा खर्च करता आला नाही तरी चालेल पण वास्तू जपण्यासाठी एक पाऊल उचलले तरी पुष्कळ आहे नाही का?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.