दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची ‘दुर्मिळ’ छायाचित्रं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात

दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची ‘दुर्मिळ’ छायाचित्रं राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात

बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री तनुजाने नुकतंच 76 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तनुजाचा 75 वा वाढदिवस अगदी खास पद्धतीने साजरा केला गेला. या निमित्ताने तनुजाने त्यांचे काही खास आणि दुर्मिळ फोटो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (NFAI) भेट दिले आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्या लोकप्रिय चित्रपट 'छबिली' मधील एक छायाचित्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांची आई शोभना समर्थ यांनी केलं होतं तर या चित्रपटात तनुजा आणि त्यांची बहीण नुतन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या शिवाय तनुजा यांनी त्यांच्या व्यक्तिगत संग्रहायलातील त्यांची काही दुर्मिळ आणि कुटुंबासोबत काही खास आठवणी शेअर करणारी छायाचित्रं या संग्रहालयाला देणगी स्वरूपात दिले आहेत. 

75 व्या वाढदिवसानिमित्त तनुजा यांचा सत्कार

तनुजा यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे (NFAI) त्यांचा सत्कार करण्यात आला होता. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.  एनएफएआय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाच्या माध्यमातून 14 व्या चित्रपट रसस्वाद शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तनुजा यांचा हा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तनुजा यांची लहान मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री तनीशा मुखर्जी, अभिनेता नितीश भारद्वाज आणि सतीश जकातदार उपस्थित होते. या समारंभात तनुजा याच्या 'पितृऋण' या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. 

काजोलने आईचा वाढदिवस केला असा साजरा

तनुजा यांची मोठी मुलगी आणि बॉलीवूड अभिनेत्री काजोलने आईसाठी इन्स्टाग्रामवरून विशेष शुभेच्छा आणि त्यांचे खास फोटो शेअर केले होते. या पोस्टमध्ये तिने तनुजासोबत काजोलने तिचे फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.  तनुजा यांच्या आजारपणानंतर काजोल आणि तनीशा त्यांची अधिक काळजी घेताना दिसत आहेत. तिची आई या वयातही इतकी सुंदर दिसते याचा तिला नक्कीच अभिमान आहे.

तनुजा यांना झाला होता हा आजार

जूनमध्ये तनुजा यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आलं होतं. तनुजा यांना डायवर्टिकुला हा आजार झाला होता. आतड्यांना सूज आल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डायवर्टिकुलामुळे पोटात तीव्र वेदना, डायरिया आणि ताप जाणवतो. या आजारपणापासून तनुजा खूप अशक्त दिसू लागल्या आहेत. 

तनुजा एक दिग्गज अभिनेत्री

तनुजा म्हणजेच शोभना समर्थ यांची मुलगी आणि नूतनची बहीण. घरातूनच अभिनयाचा वारसा घेतलेल्या तनुजा यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. तनुजा यांनी हिंदी, ंमराठी आणि बंगाली चित्रपटातून काम केलं आहे. बहारे फिर आयेंगी, ज्वेल थीफ, अनुभव असे त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. 2013 साली मराठीत 'पितृऋण' या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपनदेखील केले होते. तनुजा यांना काजोल आणि तनिशा या दोन मुली आहेत. काजोलने चित्रपटसृष्टीत स्वतःची चांगली ओळख मिळवली आहे. मात्र तनिशाला या क्षेत्रात विशेष यश मिळवता आलं नाही.  काजोल आणि तनीशाचं त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम आहे. 

फोटोसौजन्य - इन्साग्राम

हे ही वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा

मणिकर्णिकानंतर अंकिता लोखंडे झळकणार ‘या’ चित्रपटात

टीव्हीवरील ‘या’ आदर्श सुनेने दाखवलाय पहिल्यांदाच बोल्ड अंदाज

रितेश - जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर