#soty2 हा चित्रपट दोन नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देत आहे. एक चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि दुसरी तारा सुतारीया.. जी लहान असताना रिअॅलिटी टॅलेंट शोमध्ये येऊन गेली आहे. याच तारा सुतारीयाचे बॉलीवूडमधील करीअर संपुष्टात येण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात तारा चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांच्यासमोर असे काही बोलली की, ताराचे करिअर आता खरेच दावणीवर लागणार आहे. चक्क करण जोहरसमोर ताराने कंगना रणौतची तारीफ केली आहे. आता कळलं तुम्हाला की तिचे करिअर का दावणीवर लागले आहे.
पाहा दयाबेनच्या अवतारात दिसणार ही नवी अभिनेत्री
सध्या सगळीकडे #soty2 या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. आता या चित्रपटातील दोन अभिनेत्रींच्या पदार्पणाचा हा चित्रपट आहे म्हटल्यावर लोकांना या दोघींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.अलीकडे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या रोल मॉडेल विषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, कंगना रणौत माझा रोल मॉडेल आहे. इंडस्ट्रीच्या बाहेरची असूनसुद्धा तिने स्वत:च्या बळावर सारे रोल मिळवले आहेत. तिची हीच जिद्द मला प्रेरीत करते. इंडस्ट्रीच्या बाहेरुन येण्याऱ्यांसाठी ती आयडॉल आहे. त्यामुळे तिच्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे चालायला आवडेल.
आता तुम्हाला कंगना आणि करणचा नेपोटिझवर रंगलेला वाद माहीत नाही तर मग तुम्हाला काहीच माहीत नाही. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचे झाले तर कंगनाने करण हा नेहमीच स्टार किड्ना संधी देतो त्याला टॅलेंटपेक्षाही स्टार किड असणे महत्वाचे असते असा आरोप तिने केला होता. त्यानंतर सगळ्यांनी कंगनाला सपोर्ट करायचे सोडून करणला पाठिंबा दिला. त्या दिवसापासून या दोघांमध्ये वाद सुरु आहे. कंगनाला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ती करणला टार्गेट करते आणि करणला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो कंगनाला टार्गेट करतो. कंगनाचे विचार चांगले असूनही तिच्या बेताल वागण्यामुळे तिलाच या प्रकरणात अनेकांनी टार्गेट केले.
अंकिता लोखंडेनं केलं बॉयफ्रेंडला सगळ्यांसमोर किस
नेपोटिझमचा वाद उकरुन काढत कंगनाने अनेक स्टार किडना आपले लक्ष्य केले.त्यातील एक आहे आलिया भट. कंगनाने आलियाला करणच्या हातातील कटपुतली म्हटले होते. ती केवळ करणच्या इशाऱ्यावर चालतेत. तिच्याकडे अभिनयाचे कोणतेही कौशल्य नसताना तिला करणच्या कृपेने सारे चित्रपट मिळतात, असे ती म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर आलियाच्या फॅन्सना ही गोष्ट खटकली. आलियाच नाही तर रणबीर कपूरवरही कंगनाने टीका केली आहे. आता तिच्या टार्गेटवर नेक्स्ट कोण असा विचार मनात आल्यावाचून राहात नाही.
आता करणच्या द्वेष पटलावर असणाऱ्या ताराने कंगनालाच आपला आयडॉल मानल्यानंतर ताराला हे भारी पडणार का? असा प्रश्न आहेच. पण दुसरा प्रश्न मनात डोकावतो तो हा की, हा करणचाच नवा प्रमोशन फंडा तर नाही ना? कारण अशा प्रकारची विधाने करुन पब्लिसिटी मिळते हे आता येणाऱ्या सगळ्या नवोदितांना चांगलेच माहीत असते. आता हा विचार तर आपल्याला करायचा आहे म्हणा.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षयकुमारची उडवली खिल्ली
(सौजन्य- Instagram, youtube)