‘तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर, दयाबेन येणार परत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी खुशखबर, दयाबेन येणार परत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती मालिका आहे. अनेक वर्षांपासून या मालिकेने स्वतःचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अभिनेत्री दिशा वकानी साकारत असलेली दयाबेन प्रत्येक घरातील महिलांना आपल्या जवळची मैत्रीण वाटू लागली होती. मात्र काही दिवसांपासून ही दयाबेन मालिकेमधून अचानक गायब झाली आहे. दिशा वकानीने बाळंतपणासाठी या मालिकेतून अनेक महिन्यांपासून रजा घेतली होती. मात्र बाळ होऊन आता अनेक महिने झाले तरी दिशा वकानी मालिकेत परत न आल्यामुळे शोचे निर्माते आणि चाहते नाराज असल्याची चर्चा सुरू होती. शिवाय दयाबेनच्या भूमिकेसाठी दिशा वकानी यांना रिप्लेस केलं जाणार अशी बातमीही आली होती. मालिकेचे निर्माते आता दिशा वकानी परतण्याची वाट न बघता तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीसोबत मालिकेचं शूटिंग सुरू करणार या चर्चेलाही उधाण आलं होतं. सतत होणाऱ्या या चर्चांमुळे दयाबेन मालिकेत येणार की नाही याबाबत प्रंचड संभ्रम चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता लवकरत या सर्व शंकाना पूर्णविराम मिळणार आहे. कारण निर्मात्यांनी दिशा वकानी यांना शेवटची नोटीस आणि तीस दिवसांची मुदत निर्णय घेण्यासाठी दिली आहे.  


Tarak Mehta


आता वाट पाहणार नाही…


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार यांनी अभिनेत्री दिशा वकानीला रिप्लेस करण्याचा निर्णय घेत दिशाला तीस दिवसांची शेवटची नोटीस पाठवली आहे. वास्तविक दिशा वकानी आई झाल्यावर पूर्ववत होण्यासाठी तिला बरीच मोठी सुट्टी देण्यात आली होती. आई झाल्यावर केवढीही मोठी सुट्टी कमीच असल्यामुळे दिशा वकानीला मालिकेत परत येण्यासाठी वेळ लागला होता. शेवटी मालिका पुढे नेण्यासाठी या मालिकेतील प्रमुख भूमिकेला न्याय देणंही तितकच गरजेचं आहे. त्यामुळे दिशा वकानीला जर मालिकेत काम करायचे नसेल तर निर्मात्यांना दयाबेनची भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला देणे गरजेचं आहे अशी कठोर पावले निर्मात्यांना उचलावी लागली. अंतिम निर्णय घेण्यासाठी निर्मात्यांनी आता दिशा वकानीला शेवटची तीस दिवसांची मुदत दिली आहे. या तीस दिवसांमध्ये दिशाला योग्य निर्णय घ्यावाच लागेल.


Tarak Mehta 1


दयाबेन पुन्हा परतणार मालिकेत


वास्तविक काही दिवसांपूर्वीच दिशा वकानीने पुन्हा मालिकेत काम करण्यास तयारी दाखवली होती. मात्र तिने काम करण्यासाठी निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. दिशाने मालिकेतील तिच्या मानधनामध्ये वाढ करण्याची अट घातली. दिशा वकानी या मालिकेच्या एका एपिसोडसाठी एक लाख पन्नास हजार मानधनाची मागणी केली आहे. शिवाय ती या मालिकेसाठी महिन्यातून फक्त पंधरा दिवस काम करणार आहे. सकाळी 11 ते  सायंकाळी 6 पर्यंतच ती शूटिंग करण्यासाठी तयार झाली आहे. तिच्या बाळाच्या संगोपनासाठी तिने या अटी निर्मात्यांना घातल्या आहेत. या सर्व मागण्या मान्य करूनदेखील दिशाने मालिकेत परत येण्यास वेळ लावला असं निर्मात्याचं म्हणणं आहे. म्हणूनच दिशाला त्यांना नोटीस पाठवावी लागली. कारण काही असलं तरी शेवटी दिशा मालिकेत काम करण्यास तयार झाल्याने मालिकेच्या टीममध्ये आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


Tarak Mehta 2


Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर


‘सावट’मधून पदार्पण करतेय ‘ही’ नवीन अभिनेत्री


प्रियांकाच्या निष्ठुरतेचा बॅक डान्सरने केला रिअॅलिटी शोमध्ये खुलासा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम