अग्गंबाई सासूबाईमधली 'शुभ्रा' करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

अग्गंबाई सासूबाईमधली 'शुभ्रा' करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

टेलिव्हिजनवरील होणार 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये फारच लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील सासूच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी सून तेजश्रीने खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. तेजश्रीने 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या दोन्ही मालिकांमधून तेजश्रीची एक समजूतदार सून हीच प्रतिमा निर्माण झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना तेजश्रीसारखी सून आपल्या घरी यावी असं वाटतं. आता मात्र तेजश्री तिची ही प्रतिमा बदलून वेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तेजश्री बॉलीवूडमधून पदार्पण करत आहे. एवढंच नाही तर या चित्रपटात तिने चक्क एक बोल्ड सीनदेखील दिला आहे. 

तेजश्री करतेय नवी सुरूवात

तेजश्री प्रधान ही मराठमोठी अभिनेत्री सध्या बॉलीवूडमध्ये नशिब आजमवण्यासाठी तयार झाली. तेजश्री 'बबलू बॅचलर' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत डेब्यू करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता शर्मन जोशी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. या ट्रेलरमध्ये तेजश्री आणि शर्मनने लिप लॉक सीन दिला आहे. तेजश्रीने आतापर्यंत नेहमीच कौटुबिक मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्या मालिकांमध्ये तेजश्रीने समजूतदार आणि चांगल्या सुनेच्या भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीला तिच्या या भूमिकांसाठी अनेक पूरस्कारही मिळाले आहेत.  सहाजिकच तेजश्रीचं हे बदलेलं रूप पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे. 

View this post on Instagram

#babloobachelor 😊😊😊

A post shared by Tejashri Pradhan (@tejashripradhan) on

तेजश्रीच्या अभिनयाच्या नव्या रंगछटा

तेजश्रीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर ‘बबलु बॅचलर’चं पोस्टर शेअर केलं आहे. तेजश्री या चित्रपटातून तिच्या करिअरची एक आगळीवेगळी आणि नवीन सुरूवात करत आहे. ज्यासाठी तिच्या चाहत्यांनी नक्कीच शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र चित्रपटातील तिचा हा बोल्ड सीन प्रेक्षकांना नक्की कितीपत आवडेल हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातून  तेजश्रीच्या अभिनयाच्या वेगळ्या रंगछटा प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. या चित्रपटात तेजश्री आणि शर्मन सोबत पूजा चोप्रा, राजेश शर्मा आणि मनोज जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. चित्रपट येत्या 20 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अग्नीदेव चटर्जी यांनी केलेलं आहे. 

 

‘अग्गंबाई सासूबाई’मधील ‘आई’चा व्हायरल व्हिडिओ स्मृती ईराणींनीही केला शेअर

View this post on Instagram

@tejashripradhan #babloobachelor

A post shared by Tejshank_World (@tejshank_world) on

‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सासूला समजून घेणारी सून

तेजश्रीची ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका गाजतेय या मालिकेच्या कथेमुळे. नेहमीच मालिकांमध्ये सासू आणि सुनेचं नातं हे टोकाचं दाखवलं जातं. पण खऱ्या आयुष्यात नक्कीच सासूला समजून घेणाऱ्या सुनाही असतात. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारचं. पण प्रत्येक घरात भांडण असतंच असं नाही. या मालिकेत आपल्या सासूला जपणारी, तिचं मन समजून घेणारी सून दाखवली आहे. जी सध्या सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. तसंच सतत भांडण आणि कुरघोड्या बघण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं पाहणं हे प्रेक्षकांना अधिक भावत आहे. त्यामुळे ही मालिका सध्या गाजत आहे. त्यातही सासूला समजून घेणारी आणि समंजस सून दाखवल्याने प्रेक्षकांना ही मालिका आवडत आहे. यामध्ये निवेदिता सराफ आणि तेजश्री प्रधान या दोघींनीही अप्रतिम काम केलं असून गिरीश ओकचीही प्रमुख भूमिका आहे.

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

अबरामला मिळाला पुरस्कार, शाहरूखला वाटतोय अभिमान

ग्लॅमरस आणि मसालेदार त्रिकोणाचा 'मीडियम स्पाईसी'

एबी आणि सीडी’ चा याराना येतोय या दिवशी भेटीला