'ये है मोहबतें' फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत

'ये है मोहबतें' फेम विवेक दहिया झळकणार नागिन 4 च्या प्रमुख भूमिकेत

एकता कपूरच्या नागिन मालिकेला चांगलाच प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत या मालिकेचे तीन भाग सूपरहिट ठरले आहेत. त्यामुळे नागिनचा चौथा भाग प्रदर्शित केला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या या शोमध्ये प्रमुख भूमिकेत कोण असणार हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. नागिन 4 मध्ये ‘ये है मोहबतें’ फेम आणि दिव्यांका त्रिपाठीचा पती विवेक दहिया झळकण्याची शक्यता आहे. या पूर्वी विवेकने काही सूपरनॅचरल शोमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे या शोच्या चौथ्या भागासाठी त्याचे नाव पुढे आले आहे. विवेकने या आधी 'कयामत की रात' आणि 'कवच' या सूपरनॅचरल मालिकांमध्ये काम केले आहे. या दोन्ही मालिकांमधील विवेकच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक झाले होते. त्यामुळे सहाजिकच विवेकला 'नागिन 4' मध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.


विवेक दहिया 'नागिन 4' च्या लीड रोलमध्ये


नागिन मालिका बालाजी टेलीफिल्मची एक टीआरपी खेचणारी मालिका आहे. आतापर्यंत या मालिकेच्या तीन भागांना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी याचा चौथा भाग प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी बालाजीच्या अनेक मालिकांमध्ये विवेक दहियाने काम केले आहे. त्यामुळे सहाजिकच या मालिकेच्या चौथ्या भागात विवेक दहियाचे नाव पुढे आले आहे. नागिन 4 मधील अभिनेत्रीच्या प्रमुख भूमिकेसाठी हिना खानचे नाव चर्चेत आहे. मात्र याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात  आलेली नाही. मात्र हिना आणि एकताची मैत्री पाहता ती या मालिकेच्या चौथ्या भागात असण्याची शक्यता आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

It’s close to midnight, something evils lurking in the dark. #SaturdayNightFeels


A post shared by Vivek Dahiya (@vivekdahiya) on
विवेकला 'ये हे मोहबतें'ने दिली ओळख


विवेक दहिया टेलीव्हिजन माध्यमातील लोकप्रिय अभिनेता आहे. ये हे मोहबतेंमधून विवेकला लोकप्रियता मिळण्यास सुरूवात झाली. अभिनयासोबत ‘ये हे मोहबतें’ची प्रमुख अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोबत असलेले अफेअर आणि लग्न यांच्याही सोशल मीडियावर खूप चर्चा रंगल्या होत्या. ये हे मोहबतेंमधून या दोघांची लव्हस्टोरी सूरू झाली होती. विवेक आणि दिव्यांका सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. या दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे विवेकला नागिन 4 मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

नागिनच्या चौथ्या भागात कोण असेल


नागिन एक सुपरहिट टेलीव्हिजन शो आहे. या शोच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन बिजलानी आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत होते. दुसऱ्या भागात करंविर बोहरा आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत होते. तिसऱ्या भागामध्ये सुरभी ज्योती आणि पर्ल व्ही पुरीची जोडी हिट ठरली होती. त्यामुळे आता चौथ्या भागात कोणती जोडी असेल याबाबत उत्कंठा वाढली आहे. आता या बातमीमुळे विवेक दहिया आणि हिना खान ही जोडी नागिन 4 मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार अशी चर्चा सुरू झाली आहे.


अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री


दिशा! टायगर अभी जिंदा है,आदित्य- दिशाला एकत्र पाहून लोकांनी दिल्या प्रतिक्रिया


SaReGaMaPa Little Champs 2019: नागपूरच्या सुगंधा दातेने मारली बाजी


 


फोटोसौजन्य -  इन्स्टाग्राम