लग्नानंतर परदेशात स्थायिक झाले 'हे' मालिकांमधील कलाकार

लग्नानंतर परदेशात स्थायिक झाले 'हे' मालिकांमधील कलाकार

प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे दोन निरनिराळ्या स्वभावाची आणि निरनिराळ्या प्रांतातील माणसं एकत्र येऊ शकतात. असं म्हणतात की प्रेमाला कुठल्याही मर्यादा आणि नियमांमध्येही बांधून ठेवता येत नाही. जेव्हा दोन जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात तेव्हा ते एकमेकांसाठी काहिही सोडायला तयार होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून घरोघरी लोकप्रिय झालेले असे अनेक कलाकार आहेत. जे प्रेमाखातर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील चकाचक दुनिया सोडून चक्क परदेशात स्थायिक झाले. या कलाकारांचे त्यांच्या जोडीदारावर इतकं प्रेम जडलं होतं की त्यासाठी त्यांनी त्यांच्या करिअरचीही पर्वा केली नाही. यासाठीच जाणून घ्या असे कोणकोणते टिव्ही कलाकार आहेत. जे लग्नानंतर करिअर सोडून परदेशात स्थायिक झाले.

समिक्षा सिंह -

अभिनेत्री समिक्षा सिंहने तिचा बॉयफ्रेंड शैल ओसवालसोबत तीन जुलैला विवाह केला. दोघांनी सिंगापूरमध्ये एका गुरूद्वारामध्ये लग्न केलं. एवढंच नाही तर समिक्षाने आता टिव्ही इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे ती पुन्हा मुंबईला येणार नाही. ती यानंतर अभिनय न करता फक्त प्रोडक्शनच्या कामामध्ये लक्ष घालणार आहे. यापुढे समिक्षा स्क्रिप्टिंग, डायरेक्शन आणि प्रॉडक्शन करताना दिसणार आहे.

मिहिका वर्मा -

'ये हे मोहब्बतें' या मालिकेत दिव्यांका त्रिपाठीच्या बहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री मिहिका वर्मा परदेशात स्थायिक झालेली आहे. लग्नानंतर मिहीकाने टिव्ही इंडस्ट्रीला चक्क रामराम ठोकला. पती आनंद कपाईसोबत ती सध्या अमेरिकेत शिफ्ट झाली आहे.

Instagram

संग्राम सिंह -


'ये हे मोहब्बतें' मालिकेतील अभिनेता  संग्राम सिंहनेही टेलिव्हिजन इंडस्ट्री सोडून दिली आहे. मूळचा पंजाबमध्ये राहणारा संग्राम आता परदेशात सेटल झाला आहे. याचं कारण असं की त्याने नॉर्वेमध्ये राहणाऱ्या गुरकिरन कौर हिच्याशी विवाह केला आहे. गुरुकिरन नॉर्वेमध्ये वेट कंन्सल्टंट आहे. त्यामुळे  संग्रामदेखील आता तिच्यासोबत नॉर्वेमध्येच राहत आहे. 

Instagram

श्वेता केसवानी -

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या श्वेता  केसवानीने कहानी घरघर की, देस मे निकला होगा चांद, बा,बहू और बेबी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. मात्र 2008 मध्ये तिने अमेरिकेतील एलेक्स ओ नेल सोबत लग्न केलं होतं. मात्र लगेचच तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने 2011 मध्ये पुन्हा न्युयॉर्कमधील केन एंडिनो या व्यक्तीशी लग्न केलं. ज्यामुळे ती आता न्युयॉर्कमध्ये स्थायिक झाली आहे. श्वेता आणि केनला एक मुलगी देखील आहे.

Instagram

सौम्या सेठ -

नव्या नावाने घरोघरी लोकप्रिय झालेली सौम्या सेठदेखील आता अमेरिकेत राहत आहे. तिने दिल की नजर खूबसूरत, ये है आशिकी आणि चक्रवर्ती अशोक सम्राट अशा मालिकांमध्ये काम केलं होतं. 

 

 

Instagram