छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरल्या या जोड्या, मात्र प्रत्यक्षात करतात एकमेकांचा द्वेष

छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरल्या या जोड्या, मात्र प्रत्यक्षात करतात एकमेकांचा द्वेष

टेलिव्हिजन हे सर्वसामान्यांच्या मनोरंजनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मालिकांमध्ये काम करणारे अनेक कलाकार चाहत्यांना त्यांच्या घरातीलच एक सदस्य वाटतात. मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या सीन्समधील सुखदुःखात प्रेक्षकही समरस होऊन जातात. मालिकेत अशा अनेक जोड्या असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. चाहत्यांनाही त्यांच्याप्रमाणे आपलं नातं असावं असंच वाटू लागतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का टेलिव्हिजनवर सुपरहिट ठरलेल्या अनेक जोड्या प्रत्यक्षात एकमेकांचे तोंडदेखील पाहत नाहीत. त्यांची मालिकांमध्ये चांगली केमिस्ट्रि दिसून येते पण तो सीन संपल्यावर ते एकमेकांच्या समोर येणंही पसंत करत नाहीत. जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबाबत

रश्मि देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला -

रश्मि देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला मध्ये झालेला वाद बिग बॉस 13 मध्ये सर्वांनी पाहिलाच असेल. मात्र त्या आधी ही जोडी टेलिव्हिजनवर खूप लोकप्रिय होती. या दोघांनी दिल से दिल तक या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ज्यामुळे या जोडीवर प्रेक्षकांनीही मनापासून प्रेम केलं. मालिकेमधून येणाऱ्या बातम्यांमधून त्यांच्यात वाद आहेत हे तर हळू हळू जाणवतच होतं. मात्र बिग बॉसमधील त्यांचं वागणं पाहुन त्यांच्यातील वाद चव्हाट्यावरच आले होते. 

Instagram

कृष्णा आणि गोविंदा-

कृष्णा आणि गोविंदा हे नात्याने भाचा आणि मामा आहेत. पण जेव्हा जेव्हा ते स्टेजवर एकत्र आले तेव्हा त्यांनी एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकलं होतं. या जोडीचे अनेक चाहते आजही आहेत. मात्र काही दिवसांपासून या  दोघांमध्ये कौटुंबिक कलह सुरु झालेला पाहायला मिळत आहे. या दोघांमधील मतभेद इतके वाढले आहेत की त्यांच्यातील वाद आणि मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

दीपिका सिंह आणि अनस रशिद -

दिया और बाती हम या मालिकेत सुरज आणि संध्या या जोडीने प्रेक्षकांना खूप हसवलं आणि रडवलं. यांची जोडी पाहुन नातं असावं तर असं असे अनेकांना वाटू लागलं होतं. जोपर्यंत ही मालिका सुरू होती तोपर्यंत ही जोडी नेहमीच सुपरहिट ठरली होती. मात्र मालिका सुरू असतानाही हे दोन्ही कलाकार एकमेकांचा दुस्वास करत होते. प्रत्यक्षात असणाऱ्या वादाचा परिणाम पुढे मालिकेवरही पडलेला दिसू लागला होता.

Instagram

कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर -

एक असा काळ होता जेव्हा कपिल शर्माच्या शोमध्ये सुनिल ग्रोव्हर नसेल तर काय होईल असं सर्वांना वाटायचं. या दोघांशी एकमेकांशी चांगली मैत्री तर होतीच पण त्यांचं बॉन्डिग शोमधूनही दिसून यायचं. दोघांची जोडी एकत्र असेल तर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होणार हे ठरलेलं असायचं. मात्र असं चाहत्यांना हसवता  हसवता कधी त्यांच्यात वादाची ठिणगी पडली ते त्या दोघांनाही समजलं नाही. या दोघांमध्ये निर्माण झालेले वाद तात्पुरते असतील आणि पुन्हा सर्व काही नीट होईल असंच बराच काळ वाटत होतं. मात्र आता हे मैत्रीचं नातं पुन्हा कधीच सुरळीत होणार नाही यावर शिक्का मोर्तबच झालं आहे. 

हिना खान आणि करण मेहरा -

ये रिश्ता  क्या कहलाता है या मालिकेतील ही एक सुपरहिट जोडी होती. अक्षरा आणि नैतिकच्या या  जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळालं. जवळजवळ या मालिकेसाठी ते दोघंही सात वर्षे एकत्र काम करत होतं. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते फक्त मालिकेपुरतंच होतं. प्रत्यक्षात त्या दोघांचं क्षणभरही पटत नसे. एवढंच नाही तरत्या दोघांनी एकमेकांच्या वादातून मालिका सोडल्याचीही चर्चा आहे. 

Instagram