टेरेन्स लुईसचा हिंदीचा क्लास होतोय व्हायरल, Vlogeshwari मध्ये येतेय मजा

टेरेन्स लुईसचा हिंदीचा क्लास होतोय व्हायरल, Vlogeshwari मध्ये येतेय मजा

कोणत्याही डान्स रियालिटी शो मध्ये टेरेन्स लुईस (Terence Lewis) हे नाव माहीत नाही असं होणार नाही. कित्येक वर्ष सातत्याने अनेक डान्स रियालिटी शो चा परीक्षक म्हणून टेरेन्स काम करत आहे. तसंच कंटेप्ररी या नृत्य प्रकारात टेरेन्सचा खूपच अभ्यास आहे. सध्या टेरेन्स ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (India’s Best Dancer) या शो मध्ये परीक्षकाचे काम करत असून त्याच्या हिंदी शब्दांविषयी खूपच चर्चा आहे. कोणत्याही परफॉर्मन्सनंतर परीक्षक म्हणून टिप्पणी देताना टेरेन्सचे हिंदी शब्द ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. इतकंच नाही तर मलायका अरोरा (Malaika Arora) आणि गीता कपूरही (Geeta Kapur) त्याच्या हिंदी शब्दांवरून टेरेन्सला बोलत असतात. टेरेन्स लुईसचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. तसंच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीही टेरेन्स नेहमी शेअर करत असतो. आता त्याने सुरू केलेला Vlogeshwari चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

प्रदर्शित व्हायच्या आधीच 'गँग्ज ऑफ फिल्मिस्तान'वादात, अभिनेत्रीचा आरोप

Vlogeshwari मध्ये हिंदीचा क्लास

टेरेन्स आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या #Vlogeshwari चे व्हिडिओ पोस्ट करत असून सध्या ते खूपच व्हायरल होत आहेत. डान्सचे चित्रीकरण चालू असताना मधल्या वेळात युनिटमधील सर्वांना टेरेन्स वेगवेगळे विषय घेऊन इंग्रजीचे शब्द देऊन त्याचे हिंदी अर्थ विचारत असतो. यामध्ये बऱ्याच जणांना त्याचे अर्थ येत नाहीत आणि काही जण त्याचे इतके विचित्र अर्थ सांगतात की इतरांनाही आपले हसू आवरता येत नाही. पण एकंदरीतच यामध्ये सध्या खूपच मजा येत आहे. या Vlogeshwari मध्ये टेरेन्सने इतरही परीक्षकांना सामावून घेतलं आहे. त्यांनाही तो सोडत नाही. मलायकाला यापैकी बरेच शब्द येत नसल्यामुळे तिचीदेखील धांदल उडताना दिसून येते. मात्र सर्वच हे चित्रीकरण खूपच मजेत एन्जॉय करताना दिसून येत आहेत. कोरोना काळातही एकमेकांना सावरत, काळजी घेत, प्रत्येकाला जपत या सर्वच कलाकारांनी मनोरंजनाचा विडा उचलला असून टेरेन्सचा हा व्लॉगेश्वरी वेगळा मनोरंजनाचा प्रकार नक्कीच सर्वांना आवडत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओना खूपच लाईक्स मिळत असून दर आठवड्याला हा मजेशीर प्रकार टेरेन्स घेऊन येत आहे. 

अभिनेत्रींची साडी जॅकेट स्टाईल होतेय व्हायरल

मलायका आणि गीता कपूरही करतात मजा

या हिंदी शब्दाचा क्लास चालू असताना मलायका अरोरा आणि गीता कपूरही मजा करताना दिसून येतात. इतकंच नाही तर युनिटमधील बऱ्याच लोकांना टेरेन्स प्रश्न विचारत असतो. अगदी स्पर्धकही याची उत्तरं देताना दिसून येतात. बऱ्याचदा या शो चे निवेदक भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया तर इतकी मजेशीर उत्तरं देतात की टेरेन्सच्या चाहत्यांनाही हे बघायला मजा येते. त्यामुळे दर आठवड्याला टेरेन्स कोणता विषय आणणार आणि कोणते नवे हिंदी शब्द शिकायला मिळणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याशिवाय टेरेन्स अगदी युनिटमधील लोकांपासून ते परिक्षकांपर्यंत सर्वांनाच यात सामावून घेत असल्यामुळे याची मजा अधिक वाढली आहे असं म्हणावं लागेल. यामुळे एक वेगळेच मनोरंजनही सोशल मीडियावर होत असून हे व्हिडिओज अधिक व्हायरल होताना दिसून येत आहे.

जेव्हा बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या को-स्टारमुळे नाकारले हिट चित्रपट

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा