सेलिब्रिटीजवर आली आहे भांडी घासायची वेळ, लॉकडाऊनचा परिणाम

सेलिब्रिटीजवर आली आहे भांडी घासायची वेळ, लॉकडाऊनचा परिणाम

चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने पूर्ण जगात सध्या आपली दहशत निर्माण केली आहे. यासाठी आपले पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री रोज झटत आहे. लोकांना घरात राहून आपली काळजी घ्यायला सांगत आहेत. इतकंच नाही तर त्यासाठी 22 मार्चला पंतप्रधानांनी ‘जनता कर्फ्यू’ ही घोषित केला होता. यानंतर सर्वांनीच पंतप्रधानांची ही गोष्ट लक्षात घेऊन आपल्या जीवाची काळजी करण्यासाठी घरात राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्या 31 मार्चपर्यंत सर्वांनाच घरात राहून आपल्या जीवाची काळजी घेण्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अगदी घरी काम करणाऱ्या मेड आणि कुकचेही येणं जाणं बंद झालं आहे.  बऱ्याच सोसायटीना तर कुलूप लावण्यात आलं आहे. आत आणि बाहेर कोणीही येऊ जाऊ शकत नाही याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सेलिब्रिटीजच्या घरीही कोणतीही मेड येऊ जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनाही स्वतःची कामं स्वतः करावी लागत आहेत. ज्यामध्ये कतरिना, दीपिका, कार्तिक आर्यन, हिना खान, करण व्ही. ग्रोव्हर या सगळ्या सेलिब्रिटीजचा पण समावेश आहे. अनेकांनी आपले भांडी घासतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या काळातही आपले लहान लहान व्हिडिओ शेअर करत जनतेचं मनोरंजन यांनी चालूच ठेवलं आहे. 

सोनम कपूरकडे आहे गोड बातमी, व्हायरल होतोय फोटो

कतरिना आणि कार्तिकने केलेत व्हिडिओ शेअर

सध्या सगळेच सेलिब्रिटी घरात आहेत. कोरोनामुळे कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही मेडना अथवा कुकना घरात प्रवेश नाहीये. त्यामुळे घरची सगळी कामंही स्वतः करावी लागत आहेत. असाच भांडी घासतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यनने. कतरिना तर भांडी कशी घासायची हेदखील शिकवत आहे. बेसिनमध्ये बरीच भांडी असून कतरिना एका बाजूला बोलत आहे आणि एका बाजूला भांडी घासत आहे. तर दुसरीकडे कार्तिक भांडी घासताना हळूच त्याच्या बहिणीने शूट केले आहे. अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेला कार्तिक सध्या भांडी घासण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

हिना खान पुसतेय लादी

टीव्हीवरील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री हिना खान नेहमीच आपल्या आऊटफिट्स आणि मेकअपसाठी ओळखली जाते.  हिनाने फारच कमी वेळात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप सोडली आहे. मात्र काही दिवसांपासून हिनाला हे सगळं सोडून घरातील कामं करावी लागत आहेत.  हिनाचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होतोय. हिना आपल्या घरात लादी पुसताना दिसत आहे. घरात प्रत्येकजण काही ना काही काम करत असून सेलिब्रिटीजनादेखील ही कामं करावी लागत आहेत. 

कनिका कपूरचा शहाणपणा सगळ्या देशवासियांसाठी ठरला तापदायक

सैफ अली खान लावतोय झाडे

दुसऱ्या बाजूला करिना कपूर खान रोज आपण काय करतोय याचे फोटो पोस्ट करत असते. सैफ अली खान आपला मुलगा तैमूरसह घरात झाडे लावत असतानाचा एक फोटो तिने शेअर केला आहे. त्याआधी कोरोनाचा परिणाम म्हणून तिने एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये ती स्वतः तर मोबाईलमध्ये गर्क आहे पण सैफ पुस्तक वाचताना दिसून येत आहे. 

Flashback : धर्मेंद्र यांनी उगारला होता शोमॅन सुभाष घईंवर हात, जाणून घ्या किस्सा

मलायका करत आहे जेवण

नेहमी ग्लॅमरस कपड्यांमध्ये दिसणारी मलायका आपल्या घरच्यांसाठी जेवण बनवत आहे. मलायकाने या व्हिडिओमध्ये आपल्या जेवण बनवायला आवडतं पण वेळ मिळत नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे आता या काळात जर वेळ मिळाला आहे तर घरच्यांसाठी छानसं जेवण बनवण्याची संधी न सोडता तिने जेवण बनवलं आहे. आपल्या बनवलेल्या जेवणाचा व्हिडिओदेखील तिने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.