मनोज बाजपेयीचा The Family Man 2 लवकरच येणार

मनोज  बाजपेयीचा The Family Man 2 लवकरच येणार

हिंदीमधील काही वेबसिरिज इतक्या दर्जेदार आहेत की, त्या विसरता येत नाहीत. त्यांचा पुढचा भाग कधी येणार याची प्रतिक्षा आपण करतो. अशीच एक मालिका आहे म्हणजे मनोज बाजपेयीची The Family Man. एक सर्वसामान्य कुटुंबातील माणूस एक सिक्रेट एजंसीमध्ये काम करत असतो. देशासाठी काही महत्वाची काम करत असताना त्याला घरात मात्र सर्वसामान्य फॅमिली मॅनसारखे वागावे लागते. या मालिकेचा पहिला भाग आल्यानंतर अनेकांनी एकाच दिवसात याचे सगळे भाग संपवले. पण मालिका संपताना एक पेच मात्र तसाच राहून गेला होता. आता पुढे काय होणार याची प्रतिक्षा अनेक जण पाहात होते. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे कारण लवकरच The Family Man 2 येणार आहे. याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

अचानक जॅकलिनने सोडले सलमान खानचे फार्महाऊस, काय आहे नक्की कारण

अशी झाली घोषणा

 साधारण मार्चपासून आपण सगळेच जण कोरोनामुळे घरात आहोत. अनेकांनी  वेळ मिळाल्यामुळे कितीतरी वेबसिरिज आणि चित्रपटही पाहिले आहेत. असाच एक सर्व्हे  Raj &dk यांनी सोशल मीडियावर केला. त्यामध्ये त्यांनी हिंदीतील काही खास वेबसिरीजच्या पुढच्या सीझनबद्दल विचारणा केली. यामध्ये अमेझॉन प्राईमच्या The Family Man 2  बद्दल लोकांनी अधिक उत्सुकता दाखवली. पहिल्या क्रमाकांवर The Family Man 2 ला पाहून निर्मात्यांनी लवकरच सीझन 2 घेऊन येत आहोत याची घोषणा केली. त्यामुळे अनेकांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. 

अनेक मालिकांची आहे लोकांना प्रतिक्षा

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अमेझॉन प्राईम आल्यापासून अनेकांनी चक्क वेगळ्या धाटणीच्या मालिका पाहण्याचा सपाटा लावला आहे.  The Family Man 2  ही एकटीच मालिका या पसंतीमध्ये नाही तर या खालोखाल ‘मिर्झापूर’ ही मालिका आहे. त्याखालोखाल  ‘सेक्रेड गेम्स’, ‘पाताललोक’, ‘स्पेशल वन’ अशा मालिकांचा समावेश आहे. आता या सगळ्याच मालिकांचे पुढचे भाग लवकरच येणार आहेत. पण आता ते कधी येणार या बद्दल निश्चित अशी कोणतीच तारीख देण्यात आलेली नाही.  हिंदीतील अनेक मालिकांची लोकांना प्रतिक्षा आहे ते यामध्ये दिसून आले आहे. या निमित्ताने काही मालिका पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे हे मात्र नक्की!

स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत येणार छोटे शिवबा!

लॉकडाऊनमुळे मालिकांना अधिक पसंती

सध्या सगळ्या मालिकांचे नवे एपिसोड बंद आहेत. मालिकांचे जुने भाग पाहूनही अनेकांना कंटाळा आला आहे. त्यामुळे कामानंतर अधिक वेळ लोक सीरिज पाहण्यामध्ये घालवत आहे. या दिवसांमध्ये नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार या सगळ्यांचीच चलती आहे. हे पाहूनच अधिकाधिक मालिका या माध्यमातून रिलीज केल्या जात आहेत. आता तर अनेक चित्रपटांच्या रिलीजसाठीही हाच मार्ग निर्मात्यांनी स्विकारला आहे.  त्यामुळे आता अनेक मोठे चित्रपटही याच माध्यमातून रिलीज केले जात आहे. 


आता तुम्हीही The Family Man 2  या वेबसिरिजचे चाहते असाल तर थोडे दिवस थांबा कारण आता याचे नवे एपिसोड तुमच्या भेटीला येणार आहेत. 

वर्जिन भानुप्रिया नावाची वेबसिरिज घेऊन येत आहे उर्वशी रौतेला