चला सज्ज व्हा कपिल शर्मा येतोय पुन्हा एकदा तुम्हाला हसवायला

चला सज्ज व्हा कपिल शर्मा येतोय पुन्हा एकदा तुम्हाला हसवायला

लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले शूटिंग आता हळुहळू सुरु झाले आहेत. मराठी, हिंदी मालिकांचे नवे भाग आता दाखवायला सुरुवात करण्यात आली आहे. मालिकाशी कनेक्टेड असलेल्या कित्येक लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. पण अजुनही अशा काही मालिका आहेत ज्या अद्याप सुरु झालेल्या नाहीत. त्यामध्ये हिंदीतला प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ याचा समावेश आहे. कपिल शर्मा शो सुरु होणार हे या आधीही आपल्याला कळले होते. त्याच्या सेटवरील अनेक व्हिडिओ वायरल झाले होते. पण आता कपिल शर्माच्या या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे आता कपिल लवकरच येणार आहे हे पक्के झाले आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा व्हिडिओ वायरल

कपिलने शेअर केला प्रोमो

आता इतक्या महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि तेही कोविड19 च्या परिस्थितीत म्हणजे थोडा तर बदल असणारच. कपिल शर्माच्या या प्रोमोमध्ये तुम्हाला कपिल शर्माच्या पूर्ण टीम दिसतं आहे. लॉकडाऊननंतर बदलेली परिस्थिती आणि त्यानंतर होणारे विनोद या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहेत. आता कपिल शर्मा शो म्हटल्यावर प्रोमो कसा काय साधा असेल नाही का? कपिल शर्माने यामध्ये त्याचा शो बंद पडण्याचे कारण तो नाही तर आताच्या घडीला मोदी आबेत असे म्हटले. त्यावर एकच हशा पिकतो.फ्रेममध्ये आपल्याला बच्चा यादव, सपना म्हणजेच कृष्णा, सिमोना चक्रवर्ती, भारती सिंहही त्यांच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. 

चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतणार कपिल

Instagram

देशभरात लॉकडाऊन होऊन साधारण चार महिन्यांचा काळ होऊन गेला आहे. या चार महिन्यांमध्ये अनेक चॅनेल्सनी त्यांचे जुने शो दाखवायला सुरुवात केली. पण सगळ्यांनाच जुने शो पाहून कंटाळा आला होता.त्यामुळे लोकांनी टीव्ही पाहाणेही सोडून दिले होते. शूटिंग कधी सुरु होणार याची जितक्या आतुरतेने आपण वाट पाहात होतो. त्यापेक्षा अधिक कलाकार शूटिंग कधी सुरु होईल याची वाट पाहात होते. कोरोनाचा कहर आटोक्यात आल्यानंतर आता बऱ्यात गोष्टी शिथील करण्यात आल्या त्यामध्ये कपिल शर्मा शोचा समावेश आहे. त्यामुळे आता तब्बल 4 महिन्यांनंतर कपिल शर्मा परतणार आहे. 

किंग खानला वाटतेय कोरोनाची भीती, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी उचललं 'हे' पाऊल

चित्रपटांचे प्रमोशन की नुसती कॉमेडी

कपिल शर्मा शोचा फॉरमॅट पाहिला तर त्यामध्ये नव्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येतात. पण मार्च महिन्यांपासून थिएटर बंद आहेत. अनेक मोठे चित्रपट त्यांच्या रिलीजसाठी थांबले आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांनी चित्रपट आधीच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज केले आहेत. शिवाय अजूनही काही चित्रपट रिलीज केले जाणार आहेत.आता अशा चित्रपटाची टीम  कपिल शर्मा शोमध्ये येईल का? असा प्रश्न आहे. प्रोमोमध्ये मॉपही दिसत आहे. पण त्यांना सोशल डिस्टसिंगच्या नियमांनुसार बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊननंतरच्या शोमध्ये पहिला मान कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे. 


आता टेन्शन खल्लास म्हणत कपिल शर्माचा शो पाहायला विसरु नका. 

मिलिंद सोमणने शेअर केला शर्टलेस फोटो, कियाराशी होत आहे तुलना