खुर्चीसाठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

खुर्चीसाठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच ‘खुर्ची’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर

सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्ची साठी होणाऱ्या राजकारणाची झलक आपण याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये खुर्ची साठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे. या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर घरात येणार नवा पाहुणा, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह राजकीय नाट्याचा अंदाज दर्शविणारे ‘खुर्ची’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर, आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांची सहनिर्मिती असून खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा आहे. गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. बऱ्याच महिन्यानंतर अक्षय वाघमारे पुन्हा एकदा चित्रपटातून येत आहे. तसंच या चित्रपटाची कथा ही संपूर्णतः राजकारणाशी निगडीत आहे. त्यामुळे नक्की कसा सत्तेचा वापर केला जातो आणि कोण माणूस कशा प्रकारे राजकारण करतो हे आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर

खुर्चीचे राजकारण लहान मुलांच्या दृष्टीकोनातून

सत्तेचा मोह हा अनेकांना असतो आणि गावागावात तर अगदी लहान मुलांपासून याचा अनुभव येत असतो. शहरांमध्ये त्यामानाने कमी राजकारण दिसून येते. पण गावागावांमध्ये राजकारणाची आणि खुर्चीची हवा खूपच जास्त असते. मग अगदी ती लहान निवडणूक असली तरीही. आता राजकारणामध्ये अनेक तरूण आणि तरूणींचा भरणा होत आहे. खेड्यापाड्यातल्या या राजकारणाचा सहसा आपल्याला थांगपत्ता लागत नाही. हेच खुर्चीचे राजकारण आणि त्यातील तरूणाईचा सहभाग या चित्रपटाद्वारे उलगडणार आहे. लहान मुलांच्या मनावर हे राजकारण कशाप्रकारे बिंबवले जाते हे या चित्रपटातून समोर येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सध्याच्या वातावरणाला साजेसाच आहे असं म्हणावं लागेल. राजकीय नाट्य सध्या वाढतच आहे. हे राजकीय नाट्य कसे असते याचाच काहीसा अंदाज या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना येईल. त्यामुळे लवकरच प्रेक्षकांना एक राजकारणाचा चित्रपट पाहायला मिळेल. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतील हे आता पाहावे लागेल.

‘रुद्रकाल’ मालिकेमध्ये स्वानंद किरकिरे साकारणार निर्दयी आमदार - राजकारण्याची भूमिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक