corona virusमुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद

corona virusमुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद

सध्या जगभरात Corona Virus ची भीती घोंगावतेय. देशातील काही प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे हा व्हायरस अधिक पसरु नये म्हणून खबरदारी घेतली आहे. घराबाहेर पडताना मास्क घालून फिरण्याचे आवाहन केले जात आहे. देशातील नागरिकांनी कितीही काळजी घेतली तरी लोकांना त्यांची लागण होऊ नये म्हणून शासनातर्फे अजून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या  निर्णयामुळे आता प्रेक्षकांना त्यांच्या आवडीचे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहता येणार नाही.

समीरा रेड्डीने दिले सासूला आव्हान, सासूने केली बोलती बंद 

व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे. परदेशातून आपल्या देशात आलेल्या अनेक नागरिकांमुळे कोरोनाची लागण झालेली अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.  कोरोनाची लक्षण ही पटकन दिसून येत नाहीत. तर ती दिसायला साधारण 11 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. जर एखाद्याला त्याची लागण झालेली असेल आणि पुढे हा आजार कोणाला होऊ द्यायचा नसेल तर सामूहिक ठिकाणी येणारी ठिकाणं बंद करणे अनिवार्य होते. म्हणूनच एकावेळी जास्तीचा समूह जमा होणारे ठिकाण म्हणजे थिएटर. येथे येणाऱ्यांमध्ये जर कोणाला कोरोना झाला असेल तर तो झपाट्याने पसरेल या भीतीपोटी सध्या दिल्लीतील थिएटर बंद करण्यात आली आहे. साधारण  31 मार्चपर्यंत ही थिएटर बंद राहणार आहे. मुंबईत अशा संदर्भातील कोणता निर्णय घेण्यात आला नाही. पण मुंबईत हा निर्णय घेण्यात आला तर मात्र या क्षेत्राला मोठा धक्का बसेल. मुंबई पाठोपाठ दिल्ली हे मोठे हब आहे. त्यामुळे निश्चितच याचा परिणाम होणार आहे..

चित्रपटांच्या रिलीजवर होणार परिणाम

Instagram

आता थिएटर बंद राहणार म्हटल्यावर याचा थेट परिणाम चित्रपटांवर होणार आहेत. या आठवड्यात इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातून इरफान खान कमबॅक करत आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून बरीच अपेक्षा होती. साधारण 3.5 ते 5 कोटी रुपयांचे ओपनिंग हा चित्रपट करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. तर दुसरीकडे या महिन्यांच्या शेवटी म्हणजेच  24 मार्चला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण सध्या या चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात येणार आहे असे कळत आहे. 

अनुराग उर्फ पार्थ समथानच्या आयुष्यातील गर्लफ्रेंड्सची लिस्ट

पुढच्या महिन्यांच्या चित्रपटावर होणार परिणाम?

Instagram

मार्च महिना आता तरुन जाईल. पण पुढील महिन्याच्या चित्रपटांचे काय?  कारण पुढच्या महिन्यात ‘83’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. बिग बजेटच्या या चित्रपटावर कोरोनाचा किती परिणाम होतो ते देखील कळेलच. एकूणच अचानक उद्भवलेल्या समस्येचा परिणाम  सगळ्या चित्रपटसृष्टीवर होणार आहे. पुढील सगळे प्रोजेक्ट त्यामुळे टांगणीवर लटकणार आहे. 


एकूणच काय सगळीकडे आता Coronaमय वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात घराबाहेर न पडता राहणे शक्य नाही.त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही काळजी घ्या.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.