बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी थाटला दिग्दर्शकांसोबत संसार

बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री ज्यांनी थाटला दिग्दर्शकांसोबत संसार

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी कपल आहेत ज्यांचं सूत चित्रपटात काम करता करता जुळलं आहे. एकाच चित्रपटात काम करताना सहकलाकारांसोबत प्रेमाच्या भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. मात्र बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चक्क त्यांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्याच प्रेमात पडल्या होत्या. चित्रपटात काम करत करत सहवास, मैत्री,  प्रेम आणि मग लग्न असा प्रवास केलेल्या या बॉलीवूड अभिनेत्री आज त्यांच्या संसारात सुखी आहेत. यासाठी जाणून घेऊया या सेलिब्रेटीजची कशी सुरू झाली लव्ह स्टोरी

राणी मुखर्जी -

राणी मुखर्जीने कमी वयातच सक्षम अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सर्वांना माहीत असेल की करिअरच्या शिखरावर असताना तिने निर्माता, दिग्दर्शक   आणि यशराज फिल्मचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा याच्याशी लग्न केलं. या दोघांना आदिरा नावाची गोड मुलगीदेखील आहे. कदाचित अनेकांना माहीत नसेल की राणी आणि आदित्य अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. राणी आणि आदित्य ने 2014 मध्ये गुपचूप इटलीत लग्न केलं होतं.  त्यांचं अफेअर अथवा लग्न याच्या फार चर्चा झाल्या नाहीत. कारण त्या दोघांनी या विषयी मीडियासमोर कधीच खुलेपणा काहिही सांगितलं नाही. मात्र चित्रपटात काम करता करताच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 

instagram

श्रीदेवी -

बॉलीवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची सर कुणालाच येऊ शकत नाही. आज श्रीदेवी या जगात नाही मात्र तिच्या चित्रपटांच्या माध्यमातून ती नेहमीच सर्वांच्या मनात कायम राहील. श्रीदेवीने देखील करियरच्या शिखरावर असताना दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. श्रीदेवी यांची प्रेमकहाणी सर्वांना माहीत असेलच. मात्र त्यांनाही बोनीकपूर यांच्यासोबत चित्रपटात काम करता करताच प्रेम झालं होतं. 

instagram

सोनाली बेंद्रे -

सोनाली बेंद्रे सध्या तिच्या गंभीर आजारपणातून बाहेर पडत आहे. ज्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून थोड्या काळासाठी दूरावली आहे. मात्र एक काळ होता जेव्हा तिच्या अभिनय आणि सौंदर्याने तिने भल्या भल्यांना घायाळ केलं होतं. चित्रपटात काम करता करता ती दिग्दर्शक गोल्डी बहलच्या प्रेमात पडली आणि पुढे त्या दोघांनी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट नाराज या चित्रपटाच्या सेटवर झाली होती असं म्हणतात. 

instagram

उदिता गोस्वामी -

उदिता गोस्वामी सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेली आहे. तिने पाप, अक्सर, जहर अशा बोल्ड चित्रपटांमधून काम केलं होतं. उदिताने दिग्दर्शक मोहित सूरी यांच्याशी लग्न केलं आहे. मात्र लग्नाआधी जवळजवळ नऊ वर्ष ते एकमेकांच्या प्रेमात होते. 2013 मध्ये उदिताने मोहितशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ती बॉलीवूडपासून दूर झाली. 

instagram

सोनी राजदान -

अभिनेत्री आलिया भटचे आईवडील सोनी राजधान आणि महेश भट्ट एके काळी त्यांच्या लव्हस्टोरीमुळे चर्चेत होते. एकत्र काम करता करता सोनी राजधान आणि महेश भट्ट एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. महेश भट 1986 मध्ये सोनी राजधान यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. मात्र आज हे दोघं एकमेकांसोबत मजेत वेळ घालवत आहेत. 

instagram