#Nickyanka आधी या ‘6’ बॉलीवूड अभिनेत्रींनी केले आहेत परदेशी नवरे

#Nickyanka आधी या ‘6’ बॉलीवूड अभिनेत्रींनी केले आहेत परदेशी नवरे

मध्यंतरी बॉलीवूड सेलिब्रेटींमध्ये अचानक किंवा अगदी गूपचूप लग्न करुन त्यांच्या फॅन्सला सरप्राईज देण्याचा ट्रेंड आला होता. खरंतर सेलिब्रेटीजबाबत कुठलीच गोष्ट जास्त काळ लपून राहू शकत नाही. सगळ्यात आधी अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्नाची घोषणा केली, तेव्हा तिच्या फॅन्सला सुखद धक्का बसला. नंतर सोनम कपूरने तिच्या लग्नाचं सगळं प्लानिंगच फॅन्स आणि मीडियाशी शेअर केलं. मग झालं मोस्ट अवेटेड दिपिका-रणवीर (#Deepveer)चं लग्न. ज्यांचे फोटोज् पाहून तर फॅन्सच्या डोळ्यांच पारणंच फिटलं. नुकतच झालं निकयांका म्हणजेच निक जोनास आणि प्रियांका चोप्राचं स्वप्नवत लग्न. आता आपली ही देसी गर्ल अमेरिकेची सून झाली आहे


एक परदेसी मेरा दिल ले गया...


कोणालाही वाटल नव्हतं की हॉलीवूडमध्ये आपलं बस्तान बसवलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका कोणा विदेसी बाबूच्या प्रेमात आकंठ बुडेल. पण तुमच्या माहीत आहे का, विदेशी माणसाच्या प्रेमात पडलेली प्रियांका पहिली अभिनेत्री नाही. या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी विदेशी नवऱ्यांना पसंती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री.प्रिती झिंटाचा अमेरिकन नवरा

बॉलीवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटाने 2016 साली तिच्या अमेरिकन बॉयफ्रेंडशी जीन गुडइनफशी लॉस एंजलीसमध्ये अगदी गुप्तरित्या लग्न केलं होतं. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, निकयांकासारखंच प्रिती आणि जीन गुडइनफमध्येही 10 वर्षांचं अंतर आहे. प्रीतीसुद्धा तिच्या नवऱ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. फेब्रुवारीमध्ये तिच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त प्रितीने इंस्टाग्रामवर एक प्रेमळ पोस्ट टाकली होती. ‘एक प्रेमी, एक साथी, एक पती, एक मित्र. मला वाटलं नव्हतं ही सगळी नाती मला एकाच व्यक्तींमध्ये सापडतील. या अनोख्या नात्यासाठी धन्यवाद. तूच आहेस. ज्याला मी आयुष्यभर हक्कानं त्रास देणार आहे.’


श्रिया सरनचा रशियन नवरा

'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या बायकोची भूमिका साकारणारी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमधली प्रसिध्द अभिनेत्री श्रिया सरनने तिच्या रशियन बॉयफ्रेंडशी म्हणजेच आंद्रेई कोशेचिवशी 2018 च्या मार्च महिन्यात उदयपूरमध्ये लग्न केलं. तिनेही लग्नाबाबत गुप्तता ठेवली होती. श्रियाचं लग्न भारतीय पद्धतीनेच झालं. तिच्या लग्नात बॉलीवूडमधून फक्त मनोज वायपेयी आणि शबाना आझमी ह्यांची उपस्थिती होती. श्रियाचा नवरा आंद्रेई कोशेचिव हा एक राष्ट्रीय पातळीचा टेनिसपटू असून त्याचसोबत तो एक प्रसिद्ध उद्योगपतीसुध्दा आहे. मॉस्कोमध्ये त्याची स्वतःची रेस्टॉरंट चेन असून ती खूप लोकप्रिय आहे.  


राधिका आपटेचा ब्रिटीश नवरा


Radhika Apte   benedict


बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या विविध चित्रपटातील दमदार भूमिकांसाठी ओळखली जाते. राधिकाच्या खाजगी आयुष्यातल्या अनेक गोष्टींप्रमाणेच ही गोष्टही गुप्त होती की, ती विवाहित आहे. राधिका 2011साली लंडनमध्ये कंटेंपररी डांस शिकण्यासाठी गेली होती. तेव्हा तिथे ब्रिटिश म्युझिशियन बेनिडिक्ट टेलर आणि राधिकाची ओळख झाली. त्याच क्षणी मराठमोळी राधिका बेनिडिक्ट टेलरच्या प्रेमात पडली. सप्टेंबर 2012ला ती दोघं लग्नबंधनात अडकले.  लग्नाआधी हे दोघं लिव्ह इनमध्ये राहात होते. आजकाल राधिकाचा नवरा बेनिडिक्टही बॉलीवूडमध्ये काम करतोय. त्याने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ‘न्यूटन’ या चित्रपटाला संगीत दिलं होतं.
 

Finally on Instagram! A photo from my travel last month :)


A post shared by Radhika (@radhikaofficial) on
लिसा रे च्या नवऱ्याकडे अनेक देशांचं नागरिकत्व


lisa-ray-marry


कॅन्सरसारख्या जीवघेण्या रोगाशी झुंज दिल्यानंतर इंडो कॅनेडियन बॉलीवूड अभिनेत्री लिसा रे ने 2012 साली मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि अनेक देशांचं नागरिकत्व असलेल्या जेसन देहनीशी साखरपुडा केल्याचं जाहिर केलं. त्याचवर्षी ऑक्टोबर महिन्यात कॅलीफोर्नियातील नापा व्हॅलीमध्ये दोघांनी लग्न केलं. जेसन देहनीचा जन्म लेबनॉनमध्ये झाला होता. पण वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचं कुटूंब अमेरिकेत स्थायिक झालं. वयाच्या 18 व्या वर्षी तो टोरँटोला गेला, जिकडे लिसाचं लहानपण गेलं आहे. त्यानंतर जेसनने हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून एमबीए केलं आणि स्कोशिया बँक ग्रुपमध्ये केलं.  


सेलिना जेटलीचा दुबईचा नवरा

समलैंगिकेतेच्या अधिकाराचं मोकळेपणाने समर्थक करणाऱ्या सेलिना जेटलीला तुम्ही बॉलीवूडच्या अनेक चित्रपटात पाहिलं असेल. सेलिना जेटलीने दुबईस्थित उद्योगपती पीटर हॅगशी ऑस्ट्रियामध्ये 2011 साली गुप्तपणे विवाह केला. त्यांचं लग्न ऑस्ट्रियामधल्या 1000 वर्ष जुन्या मॉनेस्ट्रीमध्ये झालं. लग्न झाल्याचं तिनं साधारणतः एक महिन्यांनी जाहीर केलं. सेलिना आणि पीटर जवळपास एक वर्ष डेटिंग करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सेलिनाला जुळी मुलं झाली होती मात्र नंतर त्यातील एकाचा मृत्यू झाला.


इलियानाचा ऑस्ट्रेलियन नवरा

बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजही तिचं खाजगी आयुष्य लोकांपासून दूर ठेवते.  गेली अनेक वर्ष इलियानाचं ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत सूत जुळलं होतं. त्यानंतर त्यांच्या लग्नाची बातमीही कानावर आली. इलियानाचे एंड्रयूसोबतचे अनेक फोटोज् ती इन्स्टाग्रामवर वरच्यावर शेअर करत असते. मात्र तिने अजून तिच्या लग्नाची अधिकृतरित्या घोषणा केली नाही.