इन्स्टाग्राम सेन्सेशन बनली आहे 'ही' मिस इंडिया बिकिनी

इन्स्टाग्राम सेन्सेशन बनली आहे 'ही' मिस इंडिया बिकिनी

इन्स्टाग्रामवर दिवसाला लाखोच्या घरात फोटो शेअर होत असतात. काही फोटो इतके व्हायरल होतात की ते सेन्सेशन होतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका मॉडेलचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. या मॉडेलचे  फोटो इतके बोल्ड आहेत की, तुम्ही एखादी इंडियन आणि त्याहीपेक्षा मराठमोठी मॉडेल फोटो काढू शकेल यावर विश्वास बसणार नाही. या मॉडेलचे नाव निकिता गोखले आहे. पाहा तिचा हा हॉट अंदाज


niki1 %281%29


 कोण आहे  निकिता गोखले?


असा प्रश्न आम्हाला देखील पडला की, कोण आहे निकिता गोखले. पण थोडासा शोध घेतल्यानंतर कळले की, निकिता ही मिस इंडिया बिकिनी २०१५ ची विजेती आहे. इतकेच नाही तर तिच्या नावावर अनेक पॅजेंटशोचे टायटल आहेत. मिस वर्ल्ड बिकिनी मॉडेल इंडिया (२०१५), मिस ग्लॅमर फेस इंडिया (२०१६), मिस इंडिया ग्लॅमर फेस वर्ल्ड (२०१६), मिस युरोपिअन टुरिझम इंडिया (२०१७), मिस वर्ल्ड स्विमसूट मॉडेल इंडिया (२०१७), मिस इंडिया वर्ल्ड स्विमसूट मॉडेल इंडिया फायनलिस्ट (२०१७)  हे इतके टायटल निकिताने आतापर्यंत मिळवले आहेत.


niki2


तुमसर ते मॉडेलिंग


निकिता मूळची भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावातील आहे.तुमसरमध्ये तिने शालेय शिक्षण घेतले. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या निकिताच्या आईचे लग्न खूप लवकर झाल्यामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. म्हणून तिने निकिताने शिक्षण पूर्ण करावे अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे तिने कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण केले. पण मॉडेलिंग करावे अशी तिची इच्छा होती. त्यामुळे नोकरी करत करत तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. पॅजेंटच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिचा आत्मविश्वासही चांगला वाढला होता. त्याचा फायदा तिला या बोल्ड  फोटोजसाठी असावा. मॉडेलिंगसोबत अभिनय तितकाच महत्वाचा म्हणून तिने अभिनयाचे धडे घेतले. तिने मराठी सिनेमात काम देखील केली आहेत. आयुष्यात कधी मॉडेलिंग करीन अशी अपेक्षा नसताना तिने या क्षेत्रात स्वत:च तिच्या या न्यूड फोटोमागील मेहनत तिने व्हिडिओरुपात शूट केली असून ती तिने युट्युबवर टाकले आहेत. त्यामुळे आता तिच्याकडे पाहिल्यानंतर तुमसरच्या छोट्याशा गावातून ती आली असे अजिबात वाटणार नाही.


 


niki3


मॉडेलिंगचा हॉट अंदाज


निकिताचे इन्स्टाग्राम  अकाऊंट चाळले तर तिच्या हॉटनेसचा चांगला अंदाज येतो.  तिचे सगळेच फोटो तितकेच बोल्ड आहेत. मुळात जास्तीत जास्त फोटो हे न्यूडच आहेत. मिस बिकिनी बॉडी असल्यामुळे ती अनेक फोटोजमध्ये आपली परफेक्ट बॉडी दाखवतानाच दिसते. २८ वर्षीय निकिताचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉटनेसने भरलेले आहे.


niki4


मॉडेल्ससाठी ओपन प्लॅटफॉर्म


सोशल मीडिया हे हल्ली असं माध्यम झालं आहे. ज्यावर तुम्ही थोडीशी मेहनत घेतली तर प्रसिद्ध होऊ शकता. पण लोकांना काय आवडतं, काय नाही याचा अंदाज घेऊनच तुम्ही ते करणं आवश्यक असतं. कारण जर एखादी गोष्ट लोकांना खटकायला लागली तर तुम्हाला लोकांचा तिरस्कारही सहन करावा लागतो. नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागतात. त्याने खचून तुम्ही तुमचं उद्दिष्ट मागे ठेवलं तर मग सोशल मीडियावर तुम्ही मागे पडता. सध्या इन्स्टाग्राम  इतर सोशल प्लॅटफॉर्मपेक्षा अधिक वापरला जातो. जर तुम्हालाही असे काही नवे प्रयोग करुन पाहायचे असतील तर तुम्ही देखील काहीतरी हटके करु शकता.


niki5


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम