एकीकडे आज शाहरूख आणि गौरी खानच्या लग्नाचा आज 28 वा वाढदिवस आहेत तर दुसरीकडे त्याच्या नव्या चित्रपटाबाबतही बातमी आली आहे. एकंदरच ही दिवाळी शाहरूखसाठी चांगली जाणार आहे. त्याच्या करिअरला लागली घरघर अखेर थांबण्याची चिन्ह आहेत.
शाहरूख (Shahrukh Khan) आणि गौरी (Gauri Khan)चं लग्न 25 ऑक्टोबर 1991 ला झालं. त्या दोघांचीही लव्हस्टोरी प्रत्येकाला माहीतच आहे. शाहरूख नेहमीच त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याने आज गौरीसोबतचा फोटो आणि खास कॅप्शन सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
शाहरूख खानने फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मला नेहमी असं वाटतं की, जसं कालचीच गोष्ट आहे. पण आता जवळपास तीन दशकं आणि तीन गोड मुलं आम्हाला झाली आहेत. मी ज्या परीकथा सांगतो त्यांच्यावर तेवढाच विश्वास करतो. हे मला तितकंचं सुंदर वाटतं जितकं हे आहे.
So It's Confirmed 🔥 #Atlee - #SRK 😎
— Steve Rogers ❁ (@KuskithalaV4) October 23, 2019
#Bigil pic.twitter.com/opEwglPKQF
बऱ्याच काळापासून शाहरूखच्या कमबॅकच्या बातम्या येत आहेत पण अखेर शाहरूखच्या सिनेमाबाबत कन्फर्म बातमी आली आहे. यावेळी शाहरूख खानला डिरेक्ट करणार आहे तामिळ दिग्दर्शक एटली. बऱ्याच काळापासून शाहरूख आणि एटलीच्या एकत्र काम करण्याबाबतच्या बातम्या येत होत्या आणि अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. शाहरूख खानच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी एटलीने खूप मोठी बोली लावली आहे. जी तब्बल 30 करोड असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाची घोषणा शाहरूखच्या वाढदिवसाच्या दिवशी होण्याची शक्यता आहे.
सूत्रानुसार या चित्रपटासाठी आधी एटलीने ज्यूनियर एनटीआरला अप्रोच केलं होतं. सध्या या चित्रपटाच्या कथेबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. पण शाहरूखच्या फॅन्ससाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. कारण एका मोठ्या कालावधीनंतर शाहरूख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आता हा सिनेमा कधी सुरू होतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
खरंतर शाहरूखच्या करियरमधील या बॅड पॅच सुरूवात झाली ती फराह खानच्या हॅपी न्यू ईयर या सिनेमापासून. या चित्रपटाने गल्ला तर जमवला पण थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या फॅन्सने चित्रपटावर खूप टीका केली. खरंतर किंग खान शाहरूखला हिंदी चित्रपटांचा रोमान्सचा बादशाह असं म्हटलं जातं पण त्याचा शेवटचा रोमँटीक सिनेमा जब हॅरी मेट सेजल जो इम्तियाज अलीने डिरेक्ट केला होता तोही पडला.
शाहरूख खानच्या करियरमधील शेवटचा चांगला सिनेमा होता चेन्नई एक्सप्रेस आणि अभिनयाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास लव्ह यू जिंदगी हा सिनेमा. पण त्यानंतर काही शाहरूखच्या करियरमध्ये खास घडलं नाही. शाहरूखचा जीरो हा सिनेमा पार आपटला. शाहरूखने भूमिकांमध्ये विविधता आणूनही त्याला हवं तसं यश काही मिळालेलं नाही. त्यामुळे आता त्याच्या भविष्यातील प्रोजेक्ट्सबाबत तो खूपच चूझी झाल्याचं चित्र आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.