ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सिंघम-सिंबा-सूर्यवंशी आले एकत्र, ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सिंघम-सिंबा-सूर्यवंशी आले एकत्र, ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अखेर रोहित शेट्टीच्या मोस्ट अवेटेड ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज करण्यात आला. सिंघम- सिंबा-सूर्यवंशी अशी तिकडी या चित्रपटात एकत्र आली आहे. सिंबा या चित्रपटात अक्षयचा सूर्यवंशी अवतारातील एक लुक दाखवला होता. त्यानंतरच सगळ्यांची उत्सुकता वाढली होती. पण आता ही उत्सुकता संपली असून हा ट्रेलर आला आहे. काल हा ट्रेलर आला आणि काहीच तासात तो नंबर एकवर सुद्धा गेला. पण हा ट्रेलर पाहिल्यानंतर मनात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जाणून घेऊया काय आहे नेमकं ‘सूर्यवंशी’ च्या ट्रेलरमध्ये.

अबब! हेमामालिनीची संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल अवाक…

‘सूर्यवंशी’चा ट्रेलर म्हणून नाही खास

रोहित शेट्टीचे चित्रपट नेहमीच खास असतात. कारण भरपूर अॅक्शन आणि ड्रामा या चित्रपटामध्ये असतो.  या ट्रेलरची सुरुवात ही एकदम तशीच ग्रँड झाली. मुंबईमध्ये 1993 साली जो बॉम्बस्फोट झाला तो कोणीच विसरु शकत नाही. या स्फोटाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट आहे. त्या स्फोटासाठी आणलेल्या RDX चा साठा अजूनही कुठेतरी मुंबईत आहे. ते पुन्हा एकदा स्फोट करण्याच्या विचारात आहेत. हे कळाल्यानंतर त्यांच्या मागावरच सूर्यवंशी आणि संपूर्ण पोलीस आहेत. स्लिपर सेलचा विषय यामध्ये हाताळण्यात आला आहे. जो आता नवीन राहिला नाही. शिवाय पहिल्यांदाच 4.15 मिनिटांचा हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. काही वेळाने हा ट्रेलर एक शॉर्ट फिल्म असल्यासारखी वाटू लागते. कारण ट्रेलरमध्ये काही सस्पेन्स आहे असे वाटतच नाही. सगळा ट्रेलर म्हणजे या चित्रपटाची संपूर्ण कहाणी आहे. 

मोठी स्टारकास्ट, अभिनयही चांगला पण…

तगडी स्टार कास्ट

ADVERTISEMENT

Instagram

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. काही काळासाठी रणवीर सिंह आणि सिंघम म्हणजे अजय देवगण आहेत. पण या शिवाय चित्रपटात जॅकी श्रॉफ, जावेद जाफ्री, कतरिना कैफ दिसत आहेत. या शिवाय असे अनेक चेहरे आहेत जे तुम्ही पाहिले असतील. पण मोठी स्टारकास्ट आणि सगळ्यांचा अभिनय चांगला असूनही या चित्रपटाचा ट्रेलर तितकासा खास वाटत नाही.

अण्णा आणि माईंचे टिकटॉक व्हिडिओज व्हायरल

स्लिपर सेल हा विषय काही नवा नाही

अक्षय कुमार या आधीही पोलीस दलातील ऑफिसर म्हणून दिसला आहे. या चित्रपटात तो ATS चा माणूस दाखवला आहे. स्लिपर सेल हा विषय अक्षय कुमारने या आधी ‘बेबी’ या चित्रपटात हाताळला आहे. यामध्येही त्याने आतंकवाद्यांशी दोन हात केलेले आहेत. बेबी सिक्वल आणि प्रीक्वल या दोन्हीमध्ये त्याने अशा पद्धतीचे काम केले आहे. ‘हॉलिडे’ या चित्रपटातही त्याने स्लिपर सेलचाच विषय हाताळला होता. त्यामुळे अक्षयला पुन्हा एकदा अशा भूमिकांमध्ये पाहणे म्हणजे खरं तर तोच तोच पणा आहे. शिवाय ट्रेलरमध्येही या सगळ्या गोष्टीचा उलगडा करण्यात आसा आहे. 

ADVERTISEMENT

तरीही असणार पैसा वसूल फिल्म

 रोहित शेट्टीची फिल्म ही नेहमी पैसा वसूल फिल्म असते. त्यामुळे हा चित्रपट चालणार नाही असे होणार नाही. रोहित शेट्टीचा अॅक्शन मुव्ही हा नेहमी चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी असतो. त्यामुळेच 24 मार्चला चित्रपट आल्यानंतर हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवतो हे पाहावे लागणार आहे. 

मग आता जर तुम्ही ‘सूर्यवंशी’चा ट्रेलर पाहिला नसेल तर लगेचच पाहा. तुम्हाला कसा वाटला ते कळवा.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

02 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT