‘तुमच्यामुळे कोरोना वाढतोय’, राखीने दिला सज्जड दम

‘तुमच्यामुळे कोरोना वाढतोय’, राखीने दिला सज्जड दम

देशाची आर्थिक राजधानी मुंबई सध्या कोरोनामुळे शांत झाली आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अनेक कलाकारांची मदत घेण्यात आली आहे. पण काही सेलिब्रिटी ही आपली नैतिक जबाबदारी समजून कोरोनाविषयी आणि लॉकडाऊन संदर्भात सजग करण्याचे काम करत आहे. आता आपली बिग बॉस क्वीन राखी सावंतच घ्या ना. ज्या दिवसापासून ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे त्या दिवसापासून तिच्या मागे पत्रकारांचा आणि फॅन्सचा गराडा असतो. या गर्दीत असताना राखीसोबत असे काही झाले की, तिला तिच्या फॅनला सज्जड दम भरला. महाराष्ट्राती कोरोना स्थिती वाढण्यासाठी तुम्ही जबाबदार आहे हे सांगून तिने फॅन्सची चांगलीच कानउघडणी केली आहे.

जेव्हा संगीताचा देव ए. आर. रहमान करतो मराठमोळ्या अंजलीची स्तुती…

म्हणून राखीला आला राग

राखी काही कामासाठी बाहेर गेली असता तिला तिच्या फॅन्सनी गाठले आणि तिच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट केला. राखी फॅन्सला फोटो काढण्याची नेहमीच संधी देते. पण नेमकं ती फोटो काढताना तिच्या फॅन्सने मास्क न घातलेला पाहून ती खूपच चिडली. तिने सांगितले की,  तुमच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच कोरोना पसरत आहे. तुमचे असे वागणे जर असेच सुरु राहिले तर मुंबई बंद होईल आणि खूप जणांना नुकसान होईल. जे सध्यच्या काळात मुळीच चांगले नाही. राखीचाा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राखी ही नेहमीच चांगल्या बाबतीत पुढे आलेली दिसते. 

राखी सावंत आली प्रकाशझोतात

राखी सावंत बिग बॉस रिअॅलिटी शोमुळे पुन्हा एकदा प्रेक्षक पसंतीस पात्र ठरली आहे. तिने या शोमध्ये सगळ्यांचे असे काही मनोरंजन केले आहे की, त्यामुळे आता राखीला अनेक जण मानतात. या हसऱ्या चेहऱ्यामागे काय दु:ख असतं हे सगळं विसरुन ती सगळ्यांचे मनोरंजन करण्यास तत्पर अशी राखी दिसून आली.राखीचे हे खरे रुप पाहून अनेकांना ती आवडली. तिच्यामधील समंजसपणा आणि तिची मनोरंजन करण्याची पद्धत खूप जणांना इतकी आवडली की, तिला या कार्यक्रमानंतर खूप फायदा झाला. तिला आता अनेक नवे प्रोजेक्ट मिळाले. इतकेच नाही तर तिला सध्या वेगवेगळ्या भाषांसाठी वेगवेगळ्या
ऑफर्सही मिळत आहे. त्यामुळे राखीचे बाहेर येणे जाणे वाढले आहे.

बॉलीवूडला घेरतोय कोरोना, अनेक कलाकारांना कोरोना

फॅन्ससोबत घालवते वेळ

काहीच दिवसांपूर्वी राखी ही गोव्याला गेली होती. गोवमध्ये असताना तिने खूप धम्माल केली. त्यावेळीही तिला बरेचदा फॅन मुमेंट जगता आले. एका लहानश्या मुलीने तिला जवळ घेत एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यामुळे ती हल्ली जिथे जाते तथे लोकं तिचा पाठलाग करतात असेच दिसते. जीम, भाजी मंडई आणि आईला भेटण्यासाठी ती जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते  त्यावेळी तिचे फोटो काढण्यासाठी सगळेच जण तिच्या आजुबाजूला गराडा घालतात. याची किंबुहना राखीला सवय झाली असावी.

सेलिब्रिटींमध्ये कोरोना सावट

कोरोनाचा वाढता आकडा हा घाबरवणारा असला तरी देखील यामध्ये जास्तीत जास्त सेलिब्रिटींचा समावेश आहे. फिट असा अक्षय कुमारही या कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.  त्यापाठोपाठ गोविंदा, कार्तिक आर्यन, विकी कौशल,संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर यांना देखील कोरोना झाला. 

आता राहिला विषय राखीचा तर राखी होईल तशी समाजजागृती करत आहे

अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता 'या' चित्रपटात दिसणार एकत्र