ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
म्हणून अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’

म्हणून अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’

‘सारागढी’ च्या युद्धावर आधारीत’ केसरी या चित्रपटात एका शीख योद्धाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार आहे. २१ मार्च हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्यानिमित्ताने अक्षयशी गप्पा मारण्याची संधी POP Xoला मिळाली.या गप्पा दरम्यान अक्षय वयाच्या ५३ व्या वर्षीही का खिलाडी आहे ते खऱ्या अर्थाने आम्हाला कळाले. तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का अक्षय कुमार आजही आहे ‘खिलाडी’ आम्ही अक्षयला काही प्रश्न विचारले त्यावर त्याची उत्तरे ऐकाल तर तुम्हालाही तो रिअल लाईफ खिलाडी का आहे ते पटेल.

जाणून घ्या का आहे अक्षय कुमारचा ‘केसरी’ खास

पहाटे उठण्यावरुन तुला नेहमी प्रश्न केले जातात.तुला त्या सगळ्यावर काय म्हणायचे आहे?

मी पहाटे ४ वाजता उठतो. पहाटे उठणे ही चांगली सवय आहे. त्यावर गॉसिप करण्यासारखे काय? चांगल्या सवयी एखाद्याला असतील तर त्यातून चांगले काढण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. वेळा पाळणे ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या सवयी या अंगिकारल्या पाहिजेत. पण माझ्यामुळे वेळा पाळण्यामुळे इतरांना शुटींगसाठी होणारा त्रास मला विचारला जातो. जे चुकीचे आहे.

ADVERTISEMENT

morning-person akshay

वर्षभर काम करण्याची ताकद तू कुठून आणतोस?

मी वर्षभरात फक्त चार चित्रपटात काम करतो. वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी केवळ चार चित्रपट म्हणजे काहीच नाही नाही का? एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ४५ दिवस लागतात.अशा हिशोबाने मी फारच कमी काम करतो असे मला वाटते.इतर सगळे ३६५ दिवस काम करतात. त्या तुलनेत मी काहीच काम करत नाही असे मला वाटते. त्यामुळे मी इतरांपेक्षा काही वेगळी ताकद वापरतो असे मला खरच वाटत नाही.

प्रियांकाला सासरी मिळतेय अशी वागणूक

ADVERTISEMENT

तुझ्या चित्रपटाबद्दल काय सांगावेसे वाटेल?

केसरी ही सत्यकथा आहे हे तुम्हाला माहीत असेलच. या चित्रपटातील माझ्या लुकबद्दल अनेकांनी मला आतापर्यंत विचारले आहे. मी स्वत: पंजाबी आहे. त्यामुळे शीखांसंदर्भातील अनेक गोष्टी मला माहीत आहे. मला त्याचा फार अभ्यास करावा लागला नाही. पण एक खरे आहे की, ज्यावेळी मला  माझ्या लुकसाठी ज्यावेळी तयार केले जायचे त्यावेळी एक वेगळी एनर्जी यायची. तुम्ही जी पगडी पाहत आहात तो खरचं जड होता. ते बांधण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे लागायची. हातात जी तलवार आहे जी इतकी जड होती की इतरवेळी मी ती हातात कितीवेळ पकडू शकेन माहीत नाही. पण ती पगडी आणि हातात तलवार घेतल्यानंतर तुमचे लक्ष इतर कुठे जाणारच नाही. शीखांचे केवढे मोठे बलिदान होते हे सतत तुमच्या मनात राहते. हा चित्रपट मला करायला मिळाला याचा मला अभिमान आहे. इतिहासातील अशी एक घटना पुन्हा लोकांसमोर आली याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे लोकांनीही त्याचा अनुभव घ्यावा.

जेव्हा छोटी सारा बीग बींना करते ‘आदाब’

केसरीने तुला काय शिकवले?

ADVERTISEMENT

प्रत्येक चित्रपट काहीना काही शिकवत असतो. यात एक सीन आहे ज्यात मी निभावत असलेल्या कॅरेक्टरला गोळी लागते. हा तो क्षण आहे ज्यावेळी तुम्हाला  तुमचा मृत्यू साक्षात समोर दिसत असतो. सीमेवर लढणाऱ्या जवानांना कित्येकवेळा अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. कित्येक वेळा त्यांच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होते. पण त्यावेळी त्यांना इतर कोणी नाही फक्त देश दिसत असतो. ही भावना मलाही आली. ती प्रत्येकाला व्हायला हवी. देशप्रेम हे प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवे.

kesari

मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का?

(अक्षयने यावर अगदी दिलखुलास उत्तर दिले ) मला मराठी खूप आवडते. मराठी चित्रपटांचा, नाटकांचा आशय खूप चांगला असतो. मला संधी मिळाली तर नक्की मी काम करीन. निर्माता म्हणून मराठीत काम करताना आनंद होत आहे. अभिनय करायला मिळाला तर ही माझ्यासाठी सुवर्णसंधी असेल. चुंबक या मराठी चित्रपटाची निर्मिती माझी आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले

ADVERTISEMENT

(फोटो सौजन्य- Instagram)

07 Mar 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT