2018 मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या घरी झाले चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन

2018 मध्ये 'या' मराठी कलाकारांच्या घरी झाले चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन

2018 हे वर्ष अनेक बॉलीवूड कलाकारांसाठी खूप खास होतं. या वर्षी अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकले. काहींचा लग्नसोहळा तर अगदी महिनाभर जल्लोषात सुरू होता. अनेक मराठी कलाकारदेखील या वर्षी लग्नाच्या रेशीम गाठीमध्ये बांधले गेले आहेत. तर काही मराठी सेलिब्रेटीजच्या घरी नवीन पाहुण्यांचं आगमन झालं आहे. लग्नानंतर माता-पिता होणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक 'खास आणि अविस्मरणीय गोष्ट' असते. अनेक मराठी कलाकार या वर्षी 'आई-बाबा' झाले आहेत. या नव्या पाहुण्यांच्या येण्याने त्यांच्या घरी अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या कलाकारांनी बाळाच्या आगमनाआधी केलेलं प्रेगन्सी फोटोशूट असो, डोहाळजेवण असो किंवा त्यांच्या बाळाचं नामकरण असो हे सर्वच क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले. जाणून घेऊया यावर्षी कोण-कोणते मराठी कलाकार आई-बाबा झाले आहेत.


आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर कोठारे


28753654 192031048078588 6006658513898569728 n


18 जानेवारी 2018 ला म्हणजे अगदी वर्षाच्या सुरूवातीलाच मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर कोठारे या सेलिब्रेटी जोडीच्या घरी एका 'गोंडस चिमुकलीचा' जन्म झाला. आदिनाथ आणि ऊर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक 'क्यूट कपल' आहे. ऊर्मिला प्रेगन्सीमध्येदेखील खूप अॅक्टिव्ह होती. ऊर्मिलाचे प्रेगन्सी, डोहाळ जेवण आणि बाळाचं नामकरण असे सर्वच फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. कोठारे कुंटुबाने बाळाचं बारसं अगदी जल्लोषात केलं. अगदी पारंपरिक वेषभूषेत सर्वजण सजले होते.त्यांनी कन्येचं नाव 'जिजा' असं ठेवलं आहे. जिजाच्या आगमनाने कोठारे कुंटुबात अगदी आनंद ओसंडून वाहत आहे.श्रेयस तळपदे आणि दिप्ती तळपदे


35616230 215879069032975 4213108483513384960 n


बॉलीवूड सेलिब्रेटी आणि मराठी कलाकार श्रेयस तळपदे याच्या घरी देखील 4 मे 2018 ला चिमुकल्या परीचं आगमन झाले. श्रेयस आणि दिप्तीला लग्नाच्या 14 वर्षांनी अपत्यप्राप्ती झाली. या जोडप्याने माता-पिता होण्यासाठी 'सरोगसी'च्या पर्यायाची निवड केली. श्रेयस आणि दिप्ती या वर्षी बाळाच्या आगमनामुळे आनंदी झाले आहेत.


स्वप्निल जोशी आणि लीना जोशी


22430261 1737180043254810 7153113923766452224 n


लोकप्रिय मराठी अभिनेता स्वप्निल जोशी आणि लीना यांनादेखील यावर्षी कन्यारत्नाचा लाभ झाला. स्वप्निल दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. या आधी त्याला मायरा नावाची एक गोड मुलगी आहे. स्वप्निलला 2017 च्या डिसेंबर महिन्यात म्हणजेच 2018 च्या सुरुवातीलाच ही आनंदाची बातमी मिळाली. त्यामुळे त्याच्यासाठी 2018 हे वर्ष खासच होतं असं म्हणायला हरकत नाही.


पुष्कर जोग आणि जास्मिन


30841516 427542107693059 720250695390855168 n


स्वप्नील जोशीप्रमाणेच 2017 च्या डिसेंबर महिन्यात मराठी अभिनेता पुष्कर जोग आणि पत्नी जास्मिन यांच्या घरीदेखील एका लहान परीचे आगमन झाले. त्यामुळे 2018 हे वर्ष पुष्कर आणि जास्मिन यांच्यासाठीदेखील लकीच ठरले.


रश्मी अनपट आणि अमित खेडेकर


45497317 137834360433430 6254494004340624682 n


कुलस्वामिनी फेम मराठी अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अमित खेडेकर यांच्या घरीदेखील बाळाचं आगमन झालं. 13 ऑक्टोबर 2018 ला रश्मी आणि अमित यांना मुलगा झाला. रश्मीने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेग्नसी आणि डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले हाेते.क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे


24124884 1537920869631355 828822349032718336 n


कोंबडी पळाली फेम मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी 3 डिसेंबर 2018 ला 'दोन चिमुकल्यां'चे आगमन झालं. क्रांती रेडकर आयपीएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत 2017 ला विवाहबद्ध झाली. लग्नानंतर लगेचच दोन पऱ्यांच्या जन्मामुळे तिच्या जीवनात नक्कीच आनंद निर्माण झाला आहे.क्रांतीने इंन्स्टावर तिच्या डोहाळजेवणाचा फोटो शेअर केला होता.


आश्चर्य म्हणजे या वर्षी अनेक मराठी कलाकारांच्या घरी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्यांच्या आगमनामुळे या कलाकारांच्या घरातील वातावरण आनंदाचे आणि समाधानाचे झाले आहे. थोडक्यात वर्षी जन्माला आलेल्या या स्टार कीड्सचं भविष्य पाळण्यातच दिसू लागलं आहे.हे स्टारकीड्स त्यांच्या सेलिब्रेटी आई-वडीलांप्रमाणेच काही वर्षांनी कलाक्षेत्र गाजवतील हे नक्की.


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम