ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘ती & ती’ चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता

‘ती & ती’ चं मोशन मोस्टर झालं रिलीज, वाढली आतुरता

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित आणि पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टरनुकतेच डिजीटल मीडियावर लाँच करण्यात आले. सुरुवातीला ‘ती’ आणि ‘ती’ कोण असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण काही दिवसांअगोदरच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमधून प्रेक्षकांना याचे उत्तर मिळाले आहे. आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मृणाल कुलकर्णीचं दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले असून अभिनयासोबत पुष्करने या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. पुष्करसह, आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत. अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडनची सफारीदेखील प्रेक्षकांना घडेल.  

या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची लीड भूमिका आहे हे सर्वांना ठाऊक झाले आहे. पण चित्रपटाची कथा नेमकी काय असेल याविषयी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच कुतूहल तयार झाले असेल. तसेच दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा मराठी चित्रपट आहे, त्यामुळे पण या चित्रपटाची आतुरता प्रेक्षकांना हमखास असणार.

ADVERTISEMENT

पहिल्या पोस्टरनंतर आता मोशन पोस्टर

सध्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करण्याचे वेगवेगळे फंडे वापरले जातात. असाच एक फंडा वापरत दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसांअगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. आता त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर हे पहिले पोस्टर होते. आता मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. 

pushkar

प्रेमाचा गोंधळ

ADVERTISEMENT

प्रेमाचा जेव्हा ट्रँगल बनतो तेव्हा सगळ्याच गोष्टीचे कन्फ्युजन वाढते. अशीच प्रेमात गोंधळ उडालेल्या तरुणाची कथा आणि भन्नाट लव्हस्टोरी असणारा ‘ती & ती’ चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. पुष्करने याआधीही मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘बिग बॉस’नंतर पुष्करचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. मृणाल कुलकर्णीने आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. मात्र आता दिग्दर्शनात मृणाल या चित्रपटातून काय कमाल दाखवणार आहे ते लवकरच कळेल.

TI   TI

पहिल्यांदाच पुष्कर, सोनाली आणि प्रार्थना एकत्र

या चित्रपटातून पहिल्यांदाच पुष्कर, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना ही त्रयी एकत्र काम करणार आहेत. पुष्करने यापूर्वीही बऱ्याच चित्रपटातून काम केलं आहे. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुष्करचा हा पहिलाच चित्रपट आहे. आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. पुष्कर जोग,आनंद पंडीत, मोहन नादर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर मोहित छाब्रा हे सहनिर्माते आहेत.

ADVERTISEMENT

 

 

15 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT