Are U Coming: टायगर श्रॉफचा 'या' डान्स मूव्हची सोशल मीडियावर वाढतेय क्रेझ

Are U Coming: टायगर श्रॉफचा 'या' डान्स मूव्हची सोशल मीडियावर वाढतेय क्रेझ

बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अफलातून अॅक्शन आणि क्रेझी डान्स मूव्हजसाठी लोकप्रिय आहे. सध्या टायगर श्रॉफचा एक म्युझिक व्हिडीओ खूपच व्हायरल होतोय. ‘Are U Coming’ नाव असलेल्या या म्युझिक व्हिडीओला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. कारण फक्त तीन ते चार दिवसात आठ लाखांच्यावर लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला आहे. या व्हिडीओ मधील टायगरची प्रत्येक डान्स मूव्ह तरुणींना घायाळ करणारी आहे. हा म्यूझिक व्हिडीओ सचिन जिगरने संगीतबद्ध केला असून बेनी दयालने हे गाणं गायलं आहे. सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या या गाण्याची कोरिओग्राफी रेमो डिझूजाने केली आहे.  व्हॅलेंटाईन डे च्या आधी प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओमधील टायगरच्या कातील डान्सने या व्हिडीओची क्रेझ वाढतच आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#AreUComing!? Out NOW on @8pmpremiumblackofficial’s YT channel 😊 https://youtu.be/aHUpO7KExGs


A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर श्रॉफ सध्या 'बागी 3' आणि 'स्टुडंट ऑफ दी इअर 2' मध्ये व्यस्त


सध्या टायगर श्रॉफ त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगर लवकरच 'स्टुडंट ऑफ दी इअर 2' मध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटातून त्याच्यासोबत अनन्या पांडे आणि तारा सुतारिया प्रथमच अभिनयक्षेत्रात प्रथमच पदार्पण करत आहे. तसंच 'बागी 3' मध्येही तो पुन्हा आपला अॅक्शन अवतार दाखविण्यासाठी सज्ज झालाय. बागी चित्रपटाचा हा सिक्वल म्हणजेच तिसरा भाग असणार आहे. बागीच्या मागील दोन्ही भागात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत झळकला होता. खरंतर टायगरला बागीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. मागील दोन्ही भागातील अत्यंत थरारक अॅक्शनसीन मुळे टायगरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बागीच्या दुसऱ्या भागासाठी तर टाययगरने हॉंगकॉंग येथे जाऊन मार्शल आर्टचं खास प्रशिक्षण देखील घेतलं होतं. सहाजिकच आता बागी 3 मध्ये टायगरच्या अॅक्शन मूव्हजबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे. 6 मार्च 2020 ला बागी 3 पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. बागीमध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि बागी 2 मध्ये दिशा पटानीसोबत त्याने स्क्रीन शेअर केलं होतं आता पुढील भागात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री असणार याबाबत अजूनही कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.

अधिक वाचा


शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं


Valentine Day: व्हॅलेंटाईन वीकमध्ये सेलिब्रेट करा हे ‘स्पेशल’ डेज


भाई व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धातील 'नाच रे मोरा' गाणं प्रदर्शित


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम