बॉलीवूडमध्ये सध्या सिक्वलचा ट्रेन्ड आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल तयार होत आहेत. गेले काही दिवस साजिद नादीयाडवाला यांच्या बागी 3 ची देखील बरीच चर्चा सुरु होती. निर्मात्यांनी बागीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यावर लगेच तिसऱ्या भागाची देखील घोषणा केली. या तिसऱ्या भागात टायगरसोबत कोण अभिनेत्री असणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवलं होतं.बागीच्या तिसऱ्या भागाच्या शूटींंगला सुरुवात झाली आहे. टायगरने त्याच्या इन्स्टावरुन बागी 3 च्या पोस्टरसोबत "6 मार्च 2020 ला बागी 3 तुमच्या भेटीला येतोय" असं शेअर केलं आहे. बागीच्या या तिसऱ्या भागाचे निर्माते साजिद नादीयाडवाला असून दिग्दर्शन अहमद खान असणार आहेत.आधीच्या दोन्ही बागी चित्रपटांमध्ये भरपूर अॅक्शनसीन प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते.
View this post on Instagram
टायगरच्या अॅक्शनमूव्हबाबत उत्सुकता
टायगर श्रॉफ बागीच्या दोन्ही भागात प्रमुख भूमिकेत झळकला होता. टायगरला बागीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दोन्ही भागातील अत्यंत थरारक अॅक्शनसीन मुळे टायगरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बागीच्या दुसऱ्या भागासाठी तर टाययगरने हॉंगकॉंग येथे जाऊन मार्शल आर्टचं खास प्रशिक्षण देखील घेतलं होतं. सहाजिकच आता बागी 3 मध्ये टायगरच्या अॅक्शन मूव्हजबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे.
टायगर आणि सारा प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता
बागी 3 मध्ये टायगर श्रॉफसोबत सारा अली खान स्क्रीन शेअर करण्याची शक्यता आहे. या आधी बागी 1 मध्ये श्रद्धा कपूर तर बागी 2 मध्ये दिशा पटनी टायगरसोबत प्रमुख भुमिकेत दिसल्या होत्या. सारा अली खानचा नुकताच केदारनाथ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकच होत आहे. केदारनाथनंतर तिचा आगामी चित्रपट सिम्बा देखील लवकरच प्रदर्शित होत आहे. बागीच्या आधीच्या दोन्ही भागांच्या यशानंतर आता टायगर आणि सारा ही जोडी स्क्रीनवर पाहणं त्यामुळे नक्कीच औत्सुकतेचं असेल.
फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम