आजी आणि नातवाच्या या जुगलबंदीने सोशल मीडियावर केली धमाल, व्हिडिओ व्हायरल

आजी आणि नातवाच्या या जुगलबंदीने सोशल मीडियावर केली धमाल, व्हिडिओ व्हायरल

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर इतके अॅप्स आहेत की, कोणत्या अॅपवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. पण काही व्हिडिओज इतके मजेशीर आणि मस्त असतात की, ते सतत पाहावेसे वाटतात. असाच एक आजी आणि नातवाचा टिक टॉक (TikTok) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टिकटॉकची सध्या क्रेझ खूपच वाढत आहे. आपले व्हिडिओ बनवून बरेच जण मजा करत असतात. अशीच मजा एका आजी आणि नातवाने केली आहे. यांना बघूनच खूप बरं वाटतं. दोघांनीही स्वत: इतकी मजा केली आहे की, त्यामुळे समोरच्या बघणाऱ्यांनाही त्यांना बघत राहावंसं वाटत आहे. 

आजीने दाखवली कमाल

आजी आणि नातवाचे हे व्हिडिओ खूपच मस्त आहेत. वास्तविक या आजी आणि नातवाने हिंदी आणि तामिळ भाषेतील गाण्यांवर टिकटॉकवर जुगलबंदी केली आहे. ही जुगलबंदी सोशल मीडियावर लोकांना खूपच आवडत आहे. आजीचे गाण्यावरील हावभाव तर इतके मस्त आहेत की, एखाद्या अभिनेत्रीला लाजवतील. हे व्हिडिओ डब करणाऱ्या युजरचं नाव अक्षय पार्थ असून आपल्या आजीबरोबर त्याने लेके पहला पहला प्यार, कोलावरी डी आणि बऱ्याच तामिळ गाण्यांवर हावभावासहित डब केलं आहे. यामध्ये अक्षयच्या आजीचा स्वॅग हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. आजी आणि नातवामध्ये नेहमीच एक वेगळं प्रेम असतं. त्यांचं हे नातं अगदी या व्हिडिओमध्येही दिसून येत आहे. अक्षयने असे अनेक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये आजी पुढे आणि तिच्यामागे अक्षय असे अनेक व्हिडिओ आहेत. आजीने चेहऱ्यावर दाखवलेले हावभाव अगदीच लोभसवाणे आणि मजेशीर आहेत. शिवाय आजीने कोणतीही लाज न बाळगता आपल्या या नातवाबरोबर खूप मजा केली आहे हे दिसून येत आहे. आईवडिलांपेक्षाही नातवंडांचं आपल्या आजीआजोबांबरोबर एक वेगळं नातं असतं आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. नातू कितीही मोठा असो त्याच्या वेडेपणामध्ये तितकंच मिसळून या आजीने त्याच्याबरोबर मजा केली आहे. 

आजी बनली सुपर स्वॅग आजी

टिक टॉक (TikTok) च्या या व्हिडिओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहे. अक्षय पार्थच्या आजीला सोशल मीडियावर सुपर आजी असं म्हटलं गेलंय. या आजीचा स्वॅग सर्वांनाच आवडत आहे. या व्हिडिओने एका रात्रीत अक्षय आणि त्याच्या आजीला स्टार बनवलं आहे. या जोडीइतका कोणताही व्हिडिओ आजपर्यंत टिकटॉकवर व्हायरल झाल्याचं दिसून आलं नाहीये. याआधीदेखील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असले तरीही या आजीइतकी लोकप्रियता कोणालाही मिळालेली दिसून येत नाही. खरं तर काही टिकटॉक स्टार्सही आहेत आणि त्यांना सेलिब्रिटीप्रमाणे वागवलं जातं. पण आता अक्षय आणि त्याची आजी हे टिकटॉकवरील नवे सेलिब्रिटी आहेत असं म्हणावं लागेल. दरम्यान हे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले असून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात याला लाईक्स मिळत आहेत. त्यामुळे अक्षय आणि त्याची आजी आता पुढील नवा कोणता व्हिडिओ करणार याचीही उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. अधिकाधिक व्हिडिओ यांनी हिंदीमधील करावे असंही आता लोकांना वाटत आहे.