एन्टरटेंन्मेंट व्हिडिओ तयार करणारे टिकटॉक बंद झाल्यानंतर आता टिकटॉकर्स काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता हा प्रश्न सुटला आहे. कारण टिकटॉकर्ससाठी आता इन्स्टाग्रामने एक नवं फिचर आणलं आहे ते म्हणजे Reels. तुम्ही इन्स्टाग्रामवर असाल आणि तुम्ही अद्याप हे फिचर वापरलं नसेल तर नक्की ट्राय करा. कारण आता अनेकांनी या फिचरचा लाभ घेऊन अगदी तसेच व्हिडिओ करायलाही सुरुवात केली आहे. थोडक्या काय तुमच्या आवडत्या टिकटॉकर्सना तुम्ही आता इन्स्टाग्रामवर पाहू शकाल. पण हे फिचर आल्यामुळे काही जणांच्या डोक्याला मात्र ताप झालाय.
सनम जोहर आणि अबिगेल पांडे लवकरच अडकणार लग्नबंधनात
Reels चा वापरही आहे तसा
जर तुम्ही टिकटॉकर असाल तर तुम्हाला Reelsचा वापर कसा करायचा हे सांगायला नको. कारण तुम्ही त्यामध्ये नक्कीच प्रोफेशनल झाले असाल. पण तुम्ही पहिल्यांदा Reels वापरत असाल तर तुम्हाला हे फिचर नक्कीच शिकावे लागेल. यामध्ये तुम्हाला टिकटॉकप्रमाणेच गाण्याचा पर्याय, फिल्टर्स दिलेले आहेत. टिकटॉकपेक्षा हे थोडे सोपे आहे. फक्त तुम्हाला स्टोरीमध्ये जाऊन किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करुन तुम्हाला तुमची स्टोरी पोस्ट करता येते. तिथे फोटो क्लिक करण्याच्या पर्यायाकडे तुम्हाला Reels हा पर्याय दिसेल. तिछे जाऊन तुम्ही Reels चे व्हिडिओ करु शकता. आणि इन्स्टावर शेअर करु शकता. तुमच्या टिकटॉकसारखी तुम्हाला इथे नवी प्रोफाईलही करता येईल आणि फॉलोवर्सही मिळवता येतील.म्हणजे तुम्हाला आता वेगळे अॅप वापरावे लागणार नाही. तर इन्स्टाग्राम वापरता वापरता हे व्हिडिओ करता येतील. अजून या फिचरमध्ये डायलॉग आलेले नाही. तर गाणी आली आहेत. गाणी निवडताना तुम्हाला गाण्याचा जो भाग हला आहे तो निवडता येऊ शकतो ही जमेची बाजू आहे.
बॉलीवूडवर होत आहेत एकावर एक आघात, पसरली आहे शोककळा
आणि टिकटॉकला करावा लागला अलविदा
टिकटॉक हे चीनचे अॅप असल्यामुळे आणि सध्या चीनसोबत असलेल्या तणावामुळे देशाने चीनी अॅपवर बॅन करायचे ठरवले. त्यानुसार टिकटॉक भारतीयांसाठी बॅन करण्यात आले. पण टिकटॉक हा असा प्लॅटफॉर्म होता. त्याच्या माध्यमातून अनेकांनी विनोदी, रोमँटिक, अॅडव्हेंचर किंवा कुकींग व्हिडिओ केले होते. इतकेच नाही तर लोकंनी इतके वेगवेगळे व्हिडिओ केले होते की, अनेकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून ओळख आणि पैसा दोन्ही कमवायला घेतला होता. हे अॅप बंद होणार माहीत झाल्यावर अनेकांनी वाईट वाटले होते. अनेक टिकटॉकर्सनी त्यांचे दु:ख व्यक्त केले होते. पण देशाच्या निर्णयापुढे काहीच चालू शकत नाही. मग काय टिकटॉकर्सना या अॅपला अलविदा करावा लागला.
एक वर्षात सुश्मिता सेनचा भाऊ होणार पत्नीपासून वेगळा, नात्यात दुरावा
पुन्हा वाढणार का डोकेदुखी
टिकटॉकचे व्हिडिओ अनेकांसाठी पर्वणी असायची. आता Reels आल्यानंतर पुन्हा हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर दिसू लागले आहेत. अगदी काहीच दिवसांपूर्वी हे फिचर आले आहे. याचा खूप लोकांनी लाभ घेतला आहे. पण ज्यांना टिकटॉक व्हिडिओचा कंटाळा आला होता. त्यांनी आता कुठे सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण आता Reels ने ही जागा भरुन काढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे व्हिडिओ सुरु झाले आहेत.
आता तुम्हालाही स्टार व्हायचे असेल किंवा सोशल मीडियावर एका रात्रीत प्रसिद्धी मिळवायची असेल तर मग Reels करा आणि आनंद शेअर करा.