मराठी चित्रपटांमध्ये लक्षात राहिलेली अशी लव्हस्टोरी असेल तर ती दगडू आणि प्राजूची. शाळा कॉलेजमध्ये असताना होणारे प्रेम, त्या नात्याची ओढ, कुटुंबाचा नकार, विरह अशा बऱ्याच गोष्टी ज्या तंतोतंत आयुष्याशी निगडीत असतात. ते या चित्रपटात दाखवल्यामुळे या चित्रपटाला अमाप प्रसिद्धी मिळाली. ‘टाईमपास’, ‘टाईमपास 2’ च्या भरघोस यशांनंतर आता त्याचा पुढचा भाग म्हणजेच ‘टाईमपास 3’ ही प्रेक्षकांचे मनोरजंन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी ही माहिती दिली असून लवकरच हा चित्रपट येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण या चित्रपटात नेमके काय बदल झाले आहेत आणि आता कोणती लव्हस्टोरी यामध्ये दिसेल हे जाणून घेऊया.
लग्नानंतर मिताली मयेकरचा अधिक बोल्ड लुक, कमेंट्सचा वर्षाव
दिसणार प्रथमेश- ऋताची जोडी
पहिल्या टाईमपासमध्ये आपल्याला अभिनेता प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर अशी जोडी पाहायला मिळाली होती. एक फ्रेश जोडी आणि त्यामधील उत्तम केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. दुसऱ्या भागात प्रिया बापट-प्रियदर्शन जाधव दिसले होते. पण आता पुन्हा एकदा या चित्रपटात प्रथमेश परब दिसणार आहे. पण आता केतकी माटेगावकर नाही तर ऋता या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या संदर्भातील एक फोटो देखील खूप दिवसांपूर्वी रवी जाधव यांनी शेअर केला होता. त्यामुळे या चित्रपटाचा पुढील भाग येणार याची कल्पना आधीच झाली होती. पण आता कोणती लव्हस्टोरी घेऊन रवी जाधव आले आहेत यासंदर्भात कोणतीही पुसटशी कल्पनाही कोणाला नाही. त्यामुळेच या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली आहे.
चित्रपटाचे काम झाले पूर्ण
मध्यंतरी कोरोना काळात सगळी काम ठप्प झाली होती. अनेक चित्रपटांचे काम खोळंबले होते. पण आता शूटींगना वेग आला आहे. अनेक मराठी चित्रपटांच्या शूटींगचे काम पूर्ण झाले आहे. ‘टाईमपास 3’चे कामही 98% पूर्ण झाल्याची माहिती रवी जाधव यानी दिली आहे. अगदी वेळेत हे काम पूर्ण झाल्याचे सांगताना त्यांनी तिर्री दाखवत हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये संपूर्ण चित्रपटाची टीम पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये दगडूचा मित्र बालभारतीही दिसत आहे. याशिवाय त्याच्या गँगमधील इतर काही पंटर्स ही दिसत आहे.
अग्गंबाई सूनबाईमधील सोहम- शुभ्राचे बदलते रुप पाहून चक्रावले प्रेक्षक
टाईमपास 2 ही आवडला प्रेक्षकांना
पहिला टाईमपास हा चित्रपटामध्ये दगडू आणि प्राजू वेगळे होतात. आपली मुलगी वाया जाऊ नये या हेतूने प्राजूच्या घरातील तिला घेऊन दुसरीकडे निघून जातात. प्राजू दूर गेली तरी देखील दगडूच्या मनात तिची जागा कायम असते. तो शेवटचा क्षण अनेकांना पिळवटून टाकतो. पण हा चित्रपट अद्याप संपला नाही हे त्यांच्या वेगळे होण्यावरुनच कळते. काही वर्षांनी टाईमपास 2 आला त्यावेळी हे दोघं मोठे झालेले दाखवण्यात आले. मोठ्या प्राजूची भूमिका प्रिया बापटने साकारली तर प्रियदर्शन जाधव तरुणपणातील दगडू झाला. त्यांच्या दोघांमधील केमिस्ट्रीही लोकांना आवडली. पण अनेकांना प्रथमेश आणि केतकीलाच पुन्हा एकदा या रुपात पाहण्याची इच्छा होती. त्यामुळे काही जण निराशही झाले.
आता पुन्हा एकदा प्रथमेश परब या चित्रपटात दिसणार आहे. पण केतकीच्या जागी ऋता दिसणार असून आता ही नवी लव्हस्टोरी काय असेल याची प्रतिक्षा सगळ्यांना आहे.
लवकरच होणार ‘बंटी और बबली 2 ‘चं ट्रेलर प्रदर्शित, सलमान खान देणार सरप्राईझ