सिद्धार्थ - मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा

सिद्धार्थ - मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही नावं मराठी इंडस्ट्रीला नक्कीच नवीन नाहीत. शिवाय हे दोघंजण नात्यात आहेत याची सर्वांनाच कल्पना होती आणि आता साखरपुडा करून दोघांनीही शिक्कामोर्तब केलं आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धार्थ आणि मितालीने गोष्ट जाहीर केली आहे. शिवाय त्यांच्याजवळीचे मित्र - मैत्रिणी सई ताम्हणकर, सुयश टिळक, अमेय वाघ हेदेखील त्यांच्या या महत्त्वाच्या दिवशी त्यांच्याबरोबर उपस्थित होते. काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने अंगठी देत मितालीला प्रपोज केलं होतं आणि मितालीने लगेच होकार दिला होता. त्यानंतर आता हे दोघं लग्नबंधनात कधी अडकणार याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना होती. गेल्या वर्षापासून बऱ्याच सेलिब्रिटीजचे साखरपुडा आणि लग्न चालू असल्यामुळे मराठीमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी बोहल्यावर चढणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना होती. यावर्षी सुरुवातीलाच साखरपुडा करून सिद्धार्थ आणि मितालीने त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकतील याची कल्पना सर्वांनाच होती. पण अगदी इतक्या लवकर याची कल्पना त्यांच्या चाहत्यांना नव्हती. आता साखरपुड्यानंतर याचवर्षी लग्नबंधनातही अडकणार हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरीही या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोज व्हायरल होत आहेत. 


sidmitali


सप्टेंबर 2017 पासून दोघेजण रिलेशनशिपमध्ये


सिद्धार्थ चांदेकर हा मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सिद्धार्थने अनेक मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे. तर मितालीदेखील अनेक चित्रपट आणि मराठी मालिकांमुळे प्रेक्षकांना माहीत आहे. मितालीचे अनेक चाहते आहेत. हे दोघंही सप्टेंबर 2017 पासून रिलेशनशिपमध्ये असून सिद्धार्थने मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मितालीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सरप्राईज देत फिल्मी तऱ्हेने प्रपोज केलं होते आणि मितालीनेही क्षणाचीही उसंत न घेता लगेच होकार दिला होता. दोघेही नेहमीच आपल्या इन्स्टावरून एकमेकांबरोबरील फोटो शेअर करत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जोडीला #tinypanda म्हणून ओळखलं जातं. कारण सिद्धार्थ आणि मिताली नेहमीच फोटो शेअर करत असताना #tinypanda हा हॅशटॅग वापरतात.


sidmitali 1
साखरपुड्यानंतर सिद्धार्थने मितालीसाठी खास गाणं गायलं


सिद्धार्थने कधीही आपलं प्रेम लपवलं नाही. साखरपुड्यानंतरही मितालीसाठी सिद्धार्थने खास गाणी म्हटलं. सुयश टिळकने आपल्या इन्स्टावरून व्हिडिओ पोस्ट केला असून यामध्ये मिताली खूपच भावूक झाल्याचंही दिसत आहे. मितालीला आवडणाऱ्या गाण्यांपैकी हे गाणं सिद्धार्थने गायलं असून हे गाणं इंग्रजी होतं. सिद्धार्थचा आवाज अतिशय चांगला असून तो सुरेल गातो हे फार कमी लोकांना माहीत आहे. यातून त्याची एक झलकही दिसली. अगदी मराठमोळ्या अंदाजात साखरपुडा झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना साजेसे कपडे परिधान करत आपल्या मित्रांसाठी खास पार्टी मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये आयोजित केली होते. मराठी इंडस्ट्रीतील अनेक मराठी कलाकार सिद्धार्थ आणि मितालीच्या साखरपुड्याला हजर होते. शिवाय सिद्धार्थ आणि मितालीच्या साखरपुड्यातील धमालही या सर्व कलाकारांनी आपापल्या कॅमेऱ्यात कैद करत आपल्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि मिताली साखरपुड्यामध्ये अतिशय सुंदर दिसत असून एकमेकांसाठी परफेक्ट अशी जोडी वाटत आहे. शिवाय या दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद अगदी फोटोंमधूही दिसून येत आहे. 
 

 

 


View this post on Instagram


 

 

Congratulations @sidchandekar @mitalimayekar have a blessed life ahead. 💖


A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on
engagement


फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम


हेदेखील वाचा


अभिनेत्री शिल्पा शिंदे चाहत्यांना बसणार झटका


‘लुका छुपी’चं ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक आणि क्रितीची फ्रेश जोडी


मृणाल कुलकर्णीच्या ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल