वर्ष 2018 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या 10 बॉलीवूड-टीव्ही अभिनेत्री

वर्ष 2018 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या 10 बॉलीवूड-टीव्ही अभिनेत्री

वर्ष  2018 हा खरं तर लग्नाचाच हंगाम होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील बऱ्याच अभिनेत्रींनी आणि अगदी अभिनेत्यांनीही लग्न केली. वर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे दीपिका कक्करच्या लग्नाने त्यानंतर सोनम कपूर, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा पासून ते विदाई फेम पारूल चौहानपर्यंत ही लग्नाची गाडी येऊन थांबली. हे वर्ष बऱ्याच लग्नांनी नटलं असंही म्हणावं लागेल. तसं तर अंबानी खानदानाची मुलगी ईशाचं लग्नही याचवर्षी झालं आणि तेही अगदी थाटामाटात. पण या यादीमध्ये आम्ही फक्त बॉलीवूड आणि टीव्हीमधील अभिनेत्रींचा समावेश केला आहे. त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या टॉप 10 ब्राइड्स, ज्यांनी वर्ष 2018 मध्ये लग्न केलं आहे.


दीपिका कक्कर (22 फेब्रुवारी)


Dipika kakkar
वर्ष 2018 मध्ये लग्नाचा हंगाम सुरु झाला तो म्हणजे टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करच्या लग्नायापासून. "ससुराल सिमर का" या मालिकेतून घराघरात फेमस झालेली अभिनेत्री दीपिकाने त्याच मालिकेतील आपला सहकलाकार शोएब इब्राहिमबरोबर लग्न केलं. दीपिका आणि शोएब बरीच वर्ष एकमेकांना डेट करत होते. आपल्या निकाह अर्थात लग्नाच्या फोटोंमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती.   


सोनम कपूर (8 मे)


Sonam Kapoor
बॉलीवुडची फॅशनिस्ता सोनम कपूरदेखील याचवर्षी आपला बऱ्याच वर्षापासूनचा असलेला बॉयफ्रेंड आनंद आहुजाबरोबर विवाहबद्ध झाली. हे लग्न धुमधडाक्यात मुंबईमध्ये झालं. सोनम फॅशनिस्ता असल्यामुळे आपल्या लग्नात सोनम नक्की कशी दिसते याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे तिच्या लग्नाचा ब्रायडल लुक जेव्हा पहिल्यांदा समोर आला तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहिले. सोनम तिच्या लग्नामध्ये अतिशय सुंदर दिसत होती.


नेहा धुपिया (10 मे)


Neha Dhupiya
सोनम कपूरच्या लग्नानंतर दोनच दिवसांनी बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने आपला बॉयफ्रेंड अंगद बेदीबरोबर लग्न करून सर्वांनाच धक्का दिला होता. तिच्या लग्नाबद्दल कोणालाही माहिती नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न मुंबईतील गुरुद्वारामध्ये करण्यात आलं होतं. लग्नामध्ये नेहाचा लुक अतिशय साधा असला तरीही नेहा या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.


रुबीना दलैक (21 जून)


Rubina
लहान पडद्यावरील 'छोटी बहू' आणि नंतर 'किन्नर बहू' म्हणून प्रसिद्ध झालेली रूबीना दलैकदेखील याच वर्षी लग्नबंधनात अडकली. रूबीनाने आपला बॉयफ्रेंड अभिनेता अभिनव शुक्लाबरोबर लग्न केलं. रूबीनाने इको - फ्रेंडली लग्न करण्याला प्राधान्य दिलं होतं. तिच्या पत्रिकादेखील इको - फ्रेंडली होत्या. या लग्नामध्ये सिल्व्हर रंगाच्या लेहंगा - चोलीमध्ये रूबीना एखाद्या अप्सरेपेक्षा कमी वाटत नव्हती.


श्वेता त्रिपाठी (29 जून)


shweta tripathi
"मसान" चित्रपट फेम अभिनेत्री श्वेता त्रिपाठीला आपण सर्वांनीच चित्रपटाव्यतिरिक्त बऱ्याच वेबसिरीजमध्येही पाहिलं आहे. नुकतीच अमेझॉन प्राईम ओरिजनलच्या  "मिर्झापूर"मध्येदेखील श्वेताने केलेले काम चर्चेत होतं. श्वेतानेदेखील तिचा रॅपर बॉयफ्रेंड चैतन्य शर्मा ऊर्फ चिताबरोबर याचवर्षी लग्न केलं. श्वेता त्रिपाठीचा ब्रायडल लुक तुम्ही पाहू शकता.


एकता कौल (15 सप्टेंबर)


Ekta Kaul
"मेरे अंगने में" मालिका फेम अभिनेत्री एकता कौल आणि "परमानेंट रूममेट" वेबसीरीजमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता सुमित व्यासनेदेखील याचवर्षी लग्न केलं. सुमीतचं हे दुसरं लग्न असून एकताचा आधीचा साखरपुडा मोडला होता. मात्र आपल्या लग्नामध्ये एकता कौलचा लुक अप्रतिम होता. पाहा तिच्या लग्नाचा हा सुंदर फोटो.


युविका चौधरी (12 ऑक्टोबर)


Yuvika
प्रिन्स नरूला आणि युविका चौधरीच्या लग्नाची चर्चादेखील खूपच रंगली होती. दोघांचं प्रेम बिग बॉस सीझन  9 पासून सुरु झालं. साधारण 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर यावर्षी दोघं लग्नबंधनात अडकले. युविका चौधरी आपल्या लग्नाच्या जोड्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती.


दीपिका पादुकोण (14- 15 नोव्हेंबर)


Deepika Padukone
बॉलीवुडचे बाजीराव- मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचं लग्न हा वर्षभरातील सर्वात मोठा कार्यक्रम आणि सर्वात गाजलेलं लग्न होतं. इटलीच्या अप्रतिम लेक कोमो या परिसरात खासगी स्वरूपात सिंधी आणि कोकणी पद्धतीने दीपिका आणि रणवीरने दोन दिवस लग्न केलं. शिवाय यावर्षी सर्वात जास्त रिसेप्शनदेखील या जोडीने दिले. आपल्या भाऊ आणि वहिनीसाठी एक स्पेशल पार्टी रितीका भावनानीदेखील दिली होती. या प्रत्येकवेळी दीपिका आणि रणवीरचा जोडा अप्रतिम दिसत होता. दीपिकाचा लुक प्रत्येकवेळी वेगळा आणि तितकाच भावणारा होता. मात्र सर्वात सुंदर दीपिकाचा लुक होता तो सिंधी लग्नातील. ज्यामध्ये"सदा सौभाग्यवती भव:" लिहिलेल्या ओढणचीही खूप चर्चा झाली.


प्रियंका चोप्रा (1- 2 डिसेंबर)


Priyanka
दीपिका पादुकोणनंतर बॉलीवूडच्या देसी गर्लनेही आपल्या चाहत्यांचं मन मोडत याच वर्षी अमेरिकन सिंगर बॉयफ्रेंड निक जोनसबरोबर लग्न केलं. जोधपूरमधील सुंदर उमेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने लग्न केलं. आपल्या लग्नामध्ये प्रियांका चोप्राने सब्यासाचीने डिझाईन केलेला लाल लेहंगा घातला होता. तर ख्रिश्नन वेडिंगमध्ये प्रसिद्ध डिझाईनर राल्फ लॉरेनने डिझाईन केलेला गाऊन प्रियांकाने परिधान केला होता.


पारुल चौहान (11 डिसेंबर)


Parul Chauhan
स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील स्वर्णा मनीष गोएंका हे पात्र निभावत असलेली अभिनेत्री पारूल चौहानदेखील याचवर्षी लग्नबंधनात अडकली. हे लग्न अतिशय साध्या पद्धतीने मंदिरात करण्यात आलं. मात्र पारूल नवरीच्या कपड्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.


फोटो सौजन्य - Instagram