वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय

वेबसीरिजमध्ये सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच सर्वाधिक लोकप्रिय

वेबसीरिजच्या दुनियेत ‘गणेश गायतोंडे’ आणि ‘कालीन भैया’ या भूमिकांनी इतिहास घडवला. या भूमिका जेवढ्या लोकप्रिय आहेत. तेवढ्याच त्यांच्या वेबसीरिजही.


sacred-games


mirzapur-webseries


नेटफ्लिक्सची ‘सॅक्रेड गेम्स’ आणि अमेझॉन प्राईमची ‘मिर्जापूर’ या दोन्ही क्राइम थ्रिलर मालिका स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या वेबसीरिज श्रेणीतल्या सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. तर या महिन्यातच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ आजही चार्ट्सवर टॉप-5 मध्ये पोहोचली नाही.


top5-webseries


स्कोर ट्रेंड्सच्या आकड़्यांनुसार, वेबसीरिजच्या लोकप्रियतेत सॅक्रेड गेम्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यापाठोपाठच दुस-या स्थानी मिर्जापूर ही मालिका आहे. आर माधवन आणि अमित सध स्टारर अमेझॉन प्राईमची वेबसीरीज ‘ब्रीद’ तिस-या क्रमांकावर आहे. तर किर्ती कुल्हारी-सयानी गुप्ता स्टारर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चौथ्या क्रमांकावर आहे. रोनित रॉय-मोना सिंह स्टारर ‘कहने को हमसफर है’ पाचव्या स्थानी आहे.

सध्या सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूरच्या दुस-या सीझनची तयारी सुरू आहे. त्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने डिजीटल आणि व्हायरल न्यूज़मध्ये या दोन्ही वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे.अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट बनवली आहे.


लोकप्रियतेत सगळ्यात अग्रणी स्थानी असलेली सॅक्रेड गेम्स ही मालिका डिजीटल न्यूज, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज तिन्हीमध्ये पूर्ण गुण मिळवून नंबर वन स्थानी पोहोचली. तर मिर्जापूरने डिजीटल न्यूज़, सोशल आणि व्हायरल न्यूज श्रेणींमध्ये चांगला स्कोर केलाय. ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ सध्या युवावर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. तर अल्ट बालाजीची ‘कहने को हमसफर है’ने गेल्या काही आठवड्यांमध्ये लोकप्रियतेच्या चार्टवर टिकून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय.


स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं की, “आम्ही वेबसीरिज आणि त्यातले कलाकार यांना स्कोर ट्रेंड्सव्दारे ट्रॅक करायला सुरूवात केल्यावर आम्हांला दिसून आलं की, वेबमालिकांची सध्या सोशल, व्हायरल बातम्या, डिजीटल बातम्या आणि वृत्तपत्रामध्ये सर्वाधिक चर्चा आहे. सॅक्रेड गेम्स आणि मिर्जापूर या दोन क्राईम थ्रिलर शोजनी सातत्याने स्कोर ट्रेंड्स चार्टवर लोकप्रियतेत राहून आपलं अढळपद मिळवलंल दिसतंय. नुकतीच सुरू झालेली ‘मेड इन हेवन’ मालिकाही स्कोर ट्रेंड्सच्या चार्टवर खूप लोकप्रिय होतेय.  


या रँकींग प्रोसेसबाबत सांगताना अश्वनी कौल म्हणाले की, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा - 


वेबसीरिजमधल्या कलाकारांचं वाढतं फॅन फोलोइंग


रेवा- सत्याचा ब्रेकअप झाला?, #MovingOut चा सीझन २ आला


'गर्ल इन द सिटी' मिथिला पालकरचा स्टाईलिश अंदाज