'तुला पाहते रे' फेम ईशा 'कोल्हापूर डायरीज'मधून झळकणार एका नव्या भूमिकेत

'तुला पाहते रे' फेम ईशा 'कोल्हापूर डायरीज'मधून झळकणार एका नव्या भूमिकेत

गायत्री दातारने तुला पाहते रे या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. या मालिकेतून ईशा या पात्राने तिला चांगली लोकप्रियता मिळाली. या मालिकेमधून गायत्रीने टेलीव्हिजन माध्यमामध्ये पदार्पण केलं होतं. आता गायत्री लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. गायत्री कोल्हापूर डायरीज या चित्रपटात झळकणार आहे. 'कोल्हापूर डायरीज' हा चित्रपट अंगमली डायरीज या मल्याळम चित्रपटावर बेतलेला आहे. 'कोल्हापूर डायरीज'मधील गायत्रीची भूमिका तुला पाहते रे मधील 'ईशा'पेक्षा वेगळी असणार आहे. या चित्रपटात गायत्रीसोबत भूषण पाटील प्रमूख भुमिकेत दिसणार आहे. कोल्हापूर डायरीजचे दिग्दर्शन जो राजन यांचे आहे. शिवाय हा चित्रपट संगीतकार अवधूत गुप्ते प्रस्तूत असणार आहे. वझिर सिंह यां चित्रपटाचे निर्माते आहेत. कोल्हापूर डायरीज जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सहाजिकच या चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

तुला पाहते रे मालिकेला नवं वळण


तुला पाहते रे मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस मिळत आहे. सध्या या मालिकेला एक नवं आणि रंजक वळण मिळालं आहे. ईशा आणि विक्रांत सरांच्या अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा होता होता अचानक विक्रांत सरंजामेचे खरे रूप जगासमोर आले. आता या मालिकेला आणखी एक वळण लवकरच मिळणार आहे. या मालिकेच्या शिर्षकगीतात शिल्पा तुळसकर दिसत आहे. शिल्पा तुळसकरची या मालिकेत विक्रांत संरजामेच्या पहिल्या पत्नीची भूमिका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच शिल्पा तुळसकर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. आधीपासूनच शिर्षकगीतामध्ये शिल्पाची झलक पाहता आल्याने प्रेक्षकांनी शिल्पाची एन्ट्री गृहीत धरली होती. अखेर शिल्पा या मालिकेतून दिसणार हे उघड झालं आहे. शिवाय या मालिकेतील बंद खोलीचे रहस्य हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. प्रत्येक पात्रातील वेगळेपणामुळे ही पात्र चाहत्यांचा चांगलीच लक्षात राहत आहे. या मालिकेतील गायत्री दातारच्या ईशा या भूमिकेलोदेखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे आता गायत्रीची 'कोल्हापूर डायरीज' मधील भूमिका नेमकी कशी असेल याबाबत तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तुला पाहते रे मालिकेतील ईशाची भूमिका अत्यंत साधी आणि सामान्य घरातील होती. मात्र कोल्हापूर डायरीजमध्ये गायत्रीची भूमिका या पेक्षा वेगळी आणि हटके असण्याची शक्यता आहे.


gaytri


Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर


कंगना रणौत कशी साकारणार जयललिता यांची भूमिका


अभिनेत्री हेमामालिनी आहे अब्जपती, पाच वर्षांत कोट्यवधींचा झालाय नफा


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम