तुला पाहते रे मालिकेचा असा असेल शेवट, शनिवारी मालिका घेणार निरोप

तुला पाहते रे मालिकेचा असा असेल शेवट, शनिवारी मालिका घेणार निरोप

मराठीतील सर्वाधिक काळासाठी टीआरपीमध्ये असलेली मालिका ‘तुला पाहते रे’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका संपणार हे सगळ्यांना जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कळले होते. पण आता या मालिकेचा शेवट कसा असणार यावरुनही पडदा उठला आहे. कपटी विक्रांत सरंजामेला कशाप्रकारे शिक्षा होणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कारण या मालिकेने मध्येच एक वेगळा ट्विस्ट घेतल्यामुळे मालिकेतील ‘बदले की आग’ काहीशी विझून गेली होती. पण या मालिकेचा शेवटही खास असणार आहे असे आता कळत आहे.

विशू, दगडूनंतर आता अभिनेता प्रथमेशला मिळाली नवी ओळख

काय असेल या मालिकेचा शेवट

Instgram

सध्या मालिकेच्या ट्रॅकनुसार विक्रांत सरंजामेचा खास मित्र झेंडेला मारण्यात आले आहे. ईशा म्हणजेच राजनंदिनी सध्या गरोदर असल्याचे दाखवण्यात आली आहे. तिच्या या गूड न्यूजमुळेच सगळ्या गोष्टी एकाएकी बदलतात. विक्रांत सरंजामे अचानक ईशाशी खूप चांगला वागू लागतो. याचे आश्चर्य जयदीप आणि त्याच्या आईलाही वाटते. पण हे खरं नाही हे आतापर्यंत उघड झाले आहे. विक्रांत सरंजामेचा हा आणखी एक प्लॅन असून ‘भोलीसी सुरत’ घेऊन तो सध्या वावरत आहे. पण त्याला झेंडेच्या खूनाचा बदला घ्यायचा आहे.ईशा ही राजनंदिचा पुनर्जन्म आहे हे कळल्यावर मात्र विक्रांत स्वत:ला संपून घेणार आहे. असे कळत आहे. त्यामुळे विक्रांत सरंजामे या मालिकेत मरणार आहे. 

मालिका टीआरपीमध्ये पुढे

Instagram

‘तुला पाहते रे’ ही मालिका ज्यावेळी सुरु झाली. त्यावेळी मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये होती. वयाने मोठा असलेल्या व्यक्तीसोबत ईशाचे असलेले प्रेम आणि त्यांचे लग्न या सगळ्यामुळे अनेकांना ही मालिका आवडली होती. एक वेगळी लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली होती. पण ज्यावेळी विक्रांत सरंजामे याची ग्रे शेड यामध्ये दाखवण्यात आली आणि मालिकेचा टीआरपी खाली उतरला.पण त्यानंतरही या मालिकेने त्याचा टीआरपी राखण्यात यश मिळवले.पहिल्या 5 मध्ये ही मालिका टिकून राहिली. पहिल्यांदाच सुबोध भावे मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे काहींची निराशा देखील झाली. त्यामुळे या मालिकेचा शेवट कसा असेल याचा अंदाज येत नव्हता. पण आता यावरुन पडदा उठला आहे.  तुम्हाला या चित्रपटाचा शेवट पाहायचा असेल तर फक्त दोन दिवस वाट पाहावी लागेल.

म्हातारपणातही बॉलीवूड स्टार्स दिसत आहेत ‘हॉट’

शुटींगच्या शेवटी फोटो केले होते शेअर

Instagram

तुला पाहते रे ही मालिका संपणार हे प्रेक्षकांना आधीच कळले होते. कारण या मालिकेच्या कलाकारांनी त्यांच्या शुटींगच्या शेवटच्या दिवसातले फोटो शेअर केले होते. मालिकेचे वाईंडअप करताना त्यांनी एक पार्टी देखील केली होती. त्याचे फोटो शेअर करण्यात आले होते.

करणजीत कौर ते सनी लिओन….जाणून घ्या सनी लिओनची लाईफ जर्नी 

ही मालिका घेणार जागा

आता तुमची आवडती मालिका तुला पाहते रे ही शेवट घेणार म्हटल्यावर एक नवी मालिका  या टाईम स्लॉटमध्ये येणार आहे. ‘अग्गबाई सासूबाई असे या मालिकेचे नाव असून ही मालिका ही एक वेगळी कहाणी आहे. निवेदिता सराफ, डॉ. गिरीश ओक, तेजश्री प्रधान या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. सासूबाईंचे लग्न असा या मालिकेचा विषय असून ही मालिका विनोदी आणि फॅमिली पटात मोडणार आहे.

‘फायर पान’ खाऊन ‘या’ अभिनेत्रीचे झाले हाल, व्हिडिओ व्हायरल