‘तुला पाहते रे’ मध्ये रंगणार विकिशाचा शाही लग्नसोहळा

‘तुला पाहते रे’ मध्ये रंगणार विकिशाचा शाही लग्नसोहळा

छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' ही लोकप्रिय मालिका सध्या एका छान वळणावर आली आहे. या मालिकेतील प्रसिद्ध जोडी ईशा आणि विक्रांत म्हणजेच विकिशा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने प्रत्येक आठवड्यात टी.आर.पी. चे उच्चांक गाठले आहेत.


विकिशाचा शाही लग्न सोहळा लवकरच


वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली ही मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. सध्या या मालिकेत विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकीशाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणीदेखील एका वेगळ्या आणि शाही पद्धतीने घातली. त्यामुळे त्यांचा लग्नसोहळादेखील तितकाच दिमाखदार असणार यात शंकाच नाही.विकिशाच्या लग्नाची शाही पत्रिकेची किंमत लाखात


सध्या सगळीकडे विक्रांत आणि इशा यांच्या शाही लग्नपत्रिकेची चर्चा चालू आहे. नुकतंच मालिकेतदेखील या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेची झलक पाहायला मिळाली. ही लग्नपत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती आहेत. या एका लग्नपत्रिकेची किंमत तब्बल १.५ लाख एवढी आहे. इतकंच नव्हे तर लग्नाच्या आमंत्रणासोबत आमंत्रकांना पोशाख आणि काही भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत.शाही लग्नसोहळ्याचं ठिकाण


विकिशाच्या पत्रिकाचं एवढी महाग आहे म्हंटल्यावर लग्नाचं ठिकाणसुद्धा खास असणार यात शंका नाही. शाही लग्नाचे विविध कार्यक्रम म्हणजेच संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि विवाहसोहळा भोरच्या वाड्यामध्ये अगदी धुमधडाक्यात आणि शाही अंदाजात पार पडणार आहे.

आता आमंत्रण जर इतकं शाही असेल तर लग्नसोहळ्याची भव्यता कल्पना किती असेल याचा विचार करा.विक्रांत सरांचा बदलेला लुक


शाही लग्नसोहळ्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहेत ईशाचे विक्रांत सर. हो..या लग्नसोहळ्यात विक्रांत सरांचा नवा लुक ही तुम्हाला पाहता येणार आहे. पाहा विक्रांत सरांच्या या नव्या लुकची झलक


एकूणच प्रेक्षकांसाठी येणारा वीकेंड खास असेल. कारण अनेक अडचणीनंतर अखेर ईशा आणि विक्रांतच्या प्रेमाचं रुपांतर लग्नाच्या गाठीत होणार आहे. तेव्हा इशा आणि विक्रांत म्हणजेच विकिशा यांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा अनुभवायला आणि या नवं दाम्पत्याला आपले शुभाशीर्वाद द्यायला १३ जानेवारी हा लग्नाचा मुहूर्त चुकवू नका.


ईशा-विक्रांतचा शाही लग्नसोहळ्यातील कार्यक्रम


- 11 जानेवारी मेहंदीचा कार्यक्रम  


- 12 जानेवारी साखरपुडा


- 13 जानेवारी लग्नसोहळा