विक्रांत आणि ईशा #vikisha च्या लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण

विक्रांत आणि ईशा #vikisha च्या लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण

'तुला पाहते रे' मधील विकिशा (#vikisha) म्हणजेच विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांचा लग्नसोहळा शाही पद्धतीने भोर येथे पार पडला. या सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट शाही होती असंच म्हणावं लागेल. मग ती विविध देशातून मागवलेली हळद असो वा लग्नासाठी बोलवलेला खास फोटोग्राफर असो.

या शाही लग्नसोहळ्यात सरंजामेकडून कोणतीही कसर ठेवण्यात आली नव्हती. पण या लग्नसोहळ्यात फक्त शाही अंदाजच पाहण्यासारखा नव्हता. तर या निमित्ताने काही चांगल्या गोष्टीही दाखवण्यात आल्या.शाही लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण


tula pahte re latestविक्रांतने ईशाच्या आईबाबांना दिलेला नकार  


विक्रांतचं कॅरेक्टर हे पहिल्यापासूनच प्रगल्भ आणि आधुनिक विचारसरणीचं दाखवण्यात आलं आहे. त्याचाच प्रत्यय लग्नाच्या वेळीही आला. लग्नमंडपात आल्यावर जेव्हा ईशाचे आईबाबा जावई विक्रांतचे पाय धुण्यासाठी वाकू लागतात. तेव्हा विक्रांत त्यांना थांबवतो व त्यांच्याकडून पाय धूवून घेण्यास नकार देताो आणि स्वतः  ईशाचा आईबाबांना नमस्कार करून ‘खरा मान तुमचा आहे’, असं सांगून लग्नवेदीकडे निघतो. जावयाचा मान म्हणून लग्नावेळी अनेकदा आपल्या काही प्रथांचं पालन केलं जातं. पण या सीरियलमध्ये अशा गोष्टींकडे आता नव्याने पाहण्याची गरज असल्याचं दाखवलंय.विक्रांत आणि ईशामधला हा समान धागा


असाच अजून एक उल्लेखनीय क्षण म्हणजे विकांत जेव्हा ईशाला मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर विक्रांतही गुरूजींना एक ब्रेसलेट देतो. जसं ईशाने त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तसं विक्रांत तिच्या नावाचं ब्रेसलेट आपल्या हातात घालायचं ठरवतो. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं प्रत्येक गोष्ट बदलते. तिचं लग्न झाल्यावर भर पडते सौभ्यागाच्या काही गोष्टींची जसं मंगळसूत्र, बांगड्या आणि टीकली. लग्नानंतर मुलींना नेहमीच या गोष्टी घालण्यासाठी आग्रह केला जातो. परंतु, मुलांना मात्र असा काही दंडक नसतो. पण विक्रांतने या गोष्टीला छेद देत स्वतःही ईशाच्या नावाचं ब्रेसलेट घालायचं ठरवलं आणि वेगळा पायंडा पाडला.  


tula-pahte-fb-updateविक्रांतने केलेले चांगले हट्ट   


लग्नात मंगलाष्टक सुरू होताना जेव्हा विक्रांत ईशाची आईची उपस्थिती ही असलीच पाहिजे असा हट्ट धरतो, हा क्षण फारच छान दाखवण्यात आला आहे. वर्षानुवर्षें मुलीच्या लग्नात मंगलाष्टकांवेळी तिथे थांबण्यास मज्जाव असतो, अशी चुकीची प्रथा थांबली पाहिजे, असं विक्रांत सांगतो आणि ईशाच्या आईलाही तिथे बोलवतो. मगच सुरूवात होते विकिशाच्या मंगलाष्टकांना. तसंच लग्नातील जेवणाच्या पंगतीतही विक्रांत ईशाच्या घरच्यांना आवर्जून जेवायला बसण्यास सांगतो.विकिशाच्या लग्नातील गमतीजमतींबरोबरच दाखवण्यात आलेले हे काही भावनिक आणि भाष्य करणारे क्षण खरंच आजच्या काळातही आपण सुरू ठेवलेल्या प्रथा योग्य की अयोग्य याचा विचार करायला लावतात. 


फोटो सौजन्यः  Instagram