कोरोनामुळे झाले अभिनेत्रीचे निधन, देवोलीनाची भावूक पोस्ट व्हायरल

Covid-19 मुळे या अभिनेत्रीचे निधन, अभिनेत्री देवोलीनाची भावूक पोस्ट

कोरोना व्हायरसचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भटनागरचे निधन कोरोना व्हायरसने झाल्याचे समोर आले आहे. कोरोना आणि निमोनिया या दोन्ही आजारांशी लढत दिव्या भटनागरने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून दिव्या रूग्णालायमध्ये कोरोनाशी लढा देत होती. तसंच तिची हालत गंभीर असल्याचे तिच्या आईने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यानी दिव्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रियांका चोप्रा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण, फोटो झाला व्हायरल

देवोलीनाची दिव्यासाठी भावूक पोस्ट होतेय व्हायरल

अभिनेत्री देवोलीन भट्टाचार्जीने दिव्या भटनागरसाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली असून सध्या ती व्हायरल होते आहे. दिव्याचे आज सकाळी (7 डिसेंबर) निधन झाले. त्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दिव्या वयाने लहान असल्याने तिच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. देवोलीना आणि दिव्या जवळच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे देवोलीनाला तिच्या जाण्याने जास्त धक्का बसला आहे. त्यामुळेच तिने सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे ठरवून भावूक पोस्ट लिहिली असावी. देवोलीनाने म्हटले की, ‘जेव्हा कोणी बरोबर नव्हते तेव्हा फक्त तू होतीस दिवू. तूच माझी जवळची होतीस जिला मी ओरडू शकत होते, जिच्यावर रागावू शकत होते, मनातल्या गोष्टी बोलू शकत होते. मला माहीत आहे की आयुष्य तुझ्यासाठी सोपं कधीच नव्हतं. त्रास अत्यंत असहनीय होता. पण मला माहीत आहे की, आज तू जिथे आहेस ती जागा नक्कीच तुझ्यासाठी योग्य असेल. आपल्या सर्व दुःखांपासून तू आज मुक्त झालील. मी तुझी रोज आठवण काढेन. दिवू तुला माहीत आहे माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. खूप काळजी आहे. मोठी तू होतीस पण लहानही तूच होतीस. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. तू जिथे आहेस तिथे सुखी राहा. तुझी आठवण येईल.’ तर अभिनेत्री शिल्पा शिरोडकरनेही दिव्या भटनागरला श्रद्धांजली वाहत पोस्ट केली आहे. ‘माझ्यासाठी ही खूपच दुःखाची गोष्ट आहे. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.’ 

ये रिश्ता क्या कहलाता है फेम 'या' अभिनेत्रीने केलं कोर्ट मॅरेज, शेअर केले लग्नाचे फोटो

दिव्याच्या नवऱ्याने दिली नाही साथ

इतकंच नाही तर दिव्या जेव्हा रूग्णालयात गंभीर अवस्थेत होती तेव्हा तिचा नवराही तिला सोडून गेला अशी प्रतिक्रिया तिच्या आईने काही दिवसांपूर्वी दिली होती. दिव्याने आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन गगनबरोबर लग्न केलं होतं. पण गगन खोटारडा आणि अत्यंत वाईट माणूस असल्याचा आरोप दिव्याच्या आईने त्याच्यावर लावला आहे. लग्नानंतर काही दिवसातच तो तिला सोडून निघून गेला असंही सांगण्यात आलं आहे. पण गगनने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिव्याच्या विरोधातच कायम तिचे घरातले लोक होते असं गगनने स्पष्ट केले. मागच्या वर्षीचे डिसेंबरमध्ये दोघांनी लग्न केले होते. मात्र आता दिव्याच्या जाण्याने सर्व काही विखुरले गेले आहे. दिव्या भटनागरने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘’उडान’, ‘जीत गई तो पिया मोरे’, ‘विष’ अशा अनेक मालिकांमधून काम केले होते. मात्र तिचे वैयक्तित आयुष्य अत्यंत दुःखद राहिले होते असे आता समोर येत आहे. अनेकांनी दिव्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यने सोडला शो,फॅन्सनी व्यक्त केली नाराजी 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक