Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल

Good News: अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी प्रेगनंन्ट, फोटो झाले व्हायरल

दिव्यांका त्रिपाठी हे टीव्हीवरील खूप मोठं नाव आहे. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेतील इशिता भल्ला या व्यक्तिरेखेमुळे दिव्यांकाला खूप प्रसिद्धी दिली. इतकंच नाही तिला या मालिकेमुळे तिचा जीवनसाथी अर्थात नवरा विवेक दहियादेखील भेटला. दिव्यांकाचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. दिव्यांकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटीच्याही पार आहे. दिव्यांका नेहमीच आपलं व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील फोटो शेअर करत असते. शिवाय लोकांनाही तिच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यात बराच इंटरेस्ट असतो. पण आता पुन्हा एकदा दिव्यांका चर्चेत आली आहे. दिव्यांका सध्या एका रियालिटी शो मध्ये निवेदक आहे. पण दिव्यांका आपला बेबी बंप लपवत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. दिव्यांका खरंच प्रेगनंन्ट आहे का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

❤️


A post shared by Vivek Dahiya (@vivekdahiya) on
दिव्यांकाचे फोटो व्हायरल


Divyanka Tripathi Pregnency news 1


दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा नवरा विवेक दहिया ही जोडी टीव्हीवरील सर्वात क्यूट जोडीपैकी एक मानली जातो. दोघांचीही भेट ‘ये है मोहब्बते’ या मालिकेदरम्यान झाली. पण या दोघांचं लग्न हे त्यांच्या घरच्यांनी फिक्स केलं. पण या दोघांना बघून अजिबात वाटत नाही की, यांचं लग्न अरेंज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हे दोघंही नेहमीच एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत असतात. ही जोडी बऱ्याच जणांना आवडते. नुकताच विवेक हा दिव्यांका निवेदक असलेल्या एका रियालिटी शो मध्ये तिला भेटायला आला होता. त्यावेळी या दोघांचे घेण्यात आलेले फोटो बरेच व्हायरल झाले आहेत. हे फोटोज पाहून दिव्यांका प्रेगनंन्ट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अनेक लोकांनी या गोष्टीचा अंदाज बांधायला सुरुवात केली.


विवेकचं मजेदार उत्तर


Divyanka Tripathi Pregnency news


दिव्यांका गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर येऊ लागली तसं तिला आणि विवेकला अभिनंदन करणारे अनेक मेसेजही येऊ लागले. त्यावर दिव्यांकाचा नवरा विवेक दहियाने अतिशय मजेशीर उत्तर देत सर्वांची तोंडं बंद केली आहेत. विवेकने आपल्या अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दिव्यांकाचं पोट थोडं बाहेर दिसत आहे. त्यामुळे यावर जेव्हा विवेकला विचारण्यात आलं तेव्हा त्याचं उत्तर अतिशय मजेशीर होतं. विवेक म्हणाला, ‘हो खरं आहे की, दिव्यांका गरोदर आहे, खरं सांगू का कधी हे दिसतं तर कधी दिसत नाही. हे अगदी सोप्या पद्धतीने बाजूला करण्यात येऊ शकतं. जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा आम्ही उशी घेऊन पोट फुगवतो आणि जेव्हा काम होतं तेव्हा आम्ही वेगळं करतो. ’


दिव्यांका गरोदर असल्याच्या नेहमीच उठतात अफवा


असं पहिल्यांदाच झालेलं नाही. लग्नानंतर बऱ्याचदा दिव्यांका गरोदर असल्याच्या बातम्या नेहमीत येत राहिल्या आहेत. यापूर्वीदेखील दिव्यांका गरोदर असून मालिका सोडणार अशी बातमी होती. तर बऱ्याचदा तिचे चाहतेच फोटो एडिट करून ती गरोदर असल्याचे फोटो व्हायरल करतात. विवेकच्या म्हणण्यानुसार त्यांना आता या गोष्टीची सवय झाली आहे.


मालिका ‘ये हे मोहब्बते’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना विवेक आणि दिव्यांकाला एकत्र टीव्हीवर पाहायचं आहे. पण सध्या असं कोणतंही प्रोजेक्ट दोघांकडे नाही. दरम्यान दिव्यांका लवकरच अभिनेता राजीव खंडेलवालबरोबर ‘कोल्ड लस्सी अँड चिकन मसाला’ या अल्ट बालाजीच्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. त्याशिवाय नुकतंच दिव्यांकाला ‘इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स’ मध्ये दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ज्यापैकी एक उत्कृष्ट अभिनेत्री - परीक्षक पुरस्कार आणि दुसरा पर्सनॅलिटी ऑफ द इअर हे पुरस्कार मिळाले आहेत.


फोटो सौजन्य -  Instagram


हेदेखील वाचा - 


अजय देवगण 2020 मध्ये करणार एअर स्ट्राईक


श्रद्धा कपूर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत


मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई