‘बेहद’ हॉट बिकिनीमध्ये दिसली जेनिफर विंगेट

‘बेहद’ हॉट बिकिनीमध्ये दिसली जेनिफर विंगेट

टेलिव्हिजनवर अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे लाखो करोडो चाहते आहेत. पण आपल्या लुक्ससाठी फारच कमी अभिनेत्री आहेत ज्या चर्चेमध्ये असतात. त्यापैकी एक अभिनेत्री आहे ती म्हणजे जेनिफर विंगेट. ‘बेहद’ सुंदर असलेली जेनिफर विंगेटला 50 सर्वाधिक सेक्सी एशियाई महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळालं आहे. तिच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचेदेखील अनेक चाहते आहेत. नुकताच जेनिफरने आपल्या इन्स्टाग्रामवर हॉट समर लुक शेअर केला आहे. या फोटोमध्ये निऑन रंगाच्या बिकिनीमध्ये जेनिफर खूपच सुंदर दिसत असून तिचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.


हॉट आणि सेक्सी जेनिफर


वास्तविक जेनिफरने जे फोटो आपल्या इन्स्टावर शेअर केले आहेत त्या फोटोंमध्ये जेनिफर खूपच हॉट दिसत असल्याच्या प्रतिक्रियादेखील तिच्या चाहत्यांकडून मिळत आहेत. या फोटोमध्ये जेनिफरने एका बागेमध्ये पोझ दिली आहे आणि त्याखाली ‘स्वतःच्या बागेमध्ये’ असं कॅप्शनही दिलं आहे. जेनिफरचा हा बोल्ड लुक सध्या खूपच व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांना तिचा हा लुक भावतो आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेनिफरने पहिल्यांदाच हा लुक आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. आतापर्यंत कधीही जेनिफरने बिकिनीमधील आपले फोटो पोस्ट केलेले नाहीत. जेनिफर सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिचे लुक्स तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात आणि तिच्या लुक्सची खूपच प्रशंसादेखील केली जाते. त्यामुळे पहिल्यांदाच अशा लुक्समध्ये तिचे चाहते तिला स्वीकारतील का असा प्रश्नही पडू शकतो. पण तिचा हा फोटो खूपच व्हायरल होत असून तिच्या चाहत्यांनाही तिचा हा फोटो आवडत आहे.

फॅशन फ्रीक जेनिफर


जेनिफर विंगेट ही केवळ रील लाईफमध्येच नाही तर अगदी रिअल लाईफमध्येदेखील फॅशन फ्रीक आहे. तिची हेअरस्टाईल, कपडे, दागिने या सर्वांपासून तिच्या मेकअपपर्यंत सर्वच गोष्टी तिच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायक आहेत. ती जशी दिसते त्यामागे तिच्या टीमची मेहनत असल्याचं याआधी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. जेनिफरने आपल्या करिअरची सुरुवात ही ‘कसौटी जिंदगी की’ या एकता कपूरच्या मालिकेपासून केली होती. यामध्ये श्वेता तिवारीच्या मुलीची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. त्यानंतर तिने ‘दिल मिल गये’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘बेहद’ आणि ‘बेपनाह’ या मालिकांपासून सर्वच हिट मालिका प्रेक्षकांना दिल्या. प्रत्येक मालिकेमध्ये जेनिफरचं काम प्रेक्षकांना आवडलं होतं. आज घराघरामध्ये जेनिफर विंगेट हे नाव पोहचलं आहे.

सुट्टीचा घेत आहे आनंद


सध्या ‘बेपनाह’ ऑफ एअर गेल्यानंतर जेनिफर आपल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जेनिफर आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवत आहे. तर लवकरच ती ‘बेपनाह’च्या दुसऱ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. शिवाय ‘नच बलिये’ या रियालिटी शो चं होस्टिंगदेखील कॉमेडियन सुनील ग्रोव्हरबरोबर जेनिफर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याआधीदेखील या रियालिटी शो चं होस्टिंग तिने करण सिंग ग्रोव्हरबरोबर केलं होतं. त्यावेळीच तिचं आणि करण सिंग ग्रोव्हरचं सुत जुळलं आणि लग्न झालं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. पण घटस्फोटानंतरही जेनिफरने दमदार पुनरागमन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.


50240770 1102734493215734 7642251889213745565 n


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


'किन्नर बहू' रुबीना दिलैकला झाला शूटींगदरम्यान अपघात


देशभक्तीचा चित्रपट करणारी आलिया नाही करणार मतदान


नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल