‘कुमकुम’ फेम जुही परमार मरणाच्या दारातून आली परत

‘कुमकुम’ फेम जुही परमार मरणाच्या दारातून आली परत

सध्या कोणाबद्दल कोणती बातमी कधी येईल काहीच सांगता येत नाही. माणूस काही क्षणांपूर्वी असतो तर काही क्षणातच त्याच्या नसण्याची बातमी येते. बदलत्या जीवनशैलीने सगळंच बदललं आहे. असाच अनुभव नुकताच अभिनेत्री आणि ‘कुमकुम’ फेम जुही परमारला आला आहे. जुहीने स्वतः याबद्दल सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या क्षणी मरण नक्की काय असतं हे जाणवल्याचंही जुहीने सांगितलं आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Dear Life, I Am Here To Live!!!!


A post shared by Juhi Parmar (@juhiparmar14) on
स्टार प्लसवरील काही वर्षांपूर्वी आलेली मालिका ‘कुमकुम - एक प्यारा सा बंधन’ मधून एक आदर्श सून म्हणून जुही परमारने सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं. त्यानंतर बिग बॉसची विजेतीदेखील ती ठरली. काही महिन्यांपूर्वीच तिने पुन्हा एकदा टीव्हीवर काम सुरू केलं आहे. आजही तिचे अनेक चाहते आहेत. आपल्याबरोबर नक्की काय झालं आणि आपण मरणाच्या दाढेतून कसे जाऊन आलो या भावना तिने व्यक्त केल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिने या भावना व्यक्त केल्या. होळीच्या रात्री आपण मरणाच्या दारातून परत आलो आहोत असं तिने सांगितलं. तिची तब्बेत इतकी खराब झाली होती की, ती त्यातून वाचू शकेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. ही पोस्ट वाचल्यानंतर तिच्या चाहत्यांनीही तिची विचारपूस केली.


जुहीने सांगितलं नक्की काय झालं


जुही परमारने आपल्या या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘माझी तब्बेत होळीच्या रात्री अर्थात 21 मार्चला खूपच खराब झाली. त्यावेळी मी माझी बेस्ट फ्रेंड आश्का गरोडियाच्या घरी होते आणि तिथूनच मला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तेव्हा मला श्वासही घेता येत नव्हता पण माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. माझा श्वास घुसमटत असल्याचं मला जाणवलं आणि आता अजून  5 मिनिटापेक्षा जास्त आपण जिवंत राहू शकत नाही हे जाणवलं. इतकंच नाही तर मी माझ्या मैत्रिणीला माझी मुलगी समायराची काळजी घ्यायलाही त्यावेळी सांगितलं.’
 

 

 


View this post on Instagram


 

 

Talk about being a fit mother and I would say the day you become a mother, you have to think about fitness all the more! Yes you need the energy to run after your child, you need the stamina to be able to play with them and match their level of excitement! And mentally you need the memory to store all their little moments....And so remember to make time for yourself! Motherhood can never be an excuse, it should be a reason for all the positivity, innocence and youth that comes your way!!!! . . @samairratales #mammaginni #mammadaughter #mommy #daughter #mommyanddaughter #momanddaughter #blog #motherblogging #momblogging #blogpost #blogging #motherdaughterblogging #motherhood #kidsofinstagram #babiesofinstagram #juhiblogs


A post shared by Juhi Parmar (@juhiparmar14) on
माझ्या मुलीसाठीच परत आले


जुहीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, ‘त्यावेळी माझ्या डोळ्यासमोरून माझं पूर्ण आयुष्य जाऊ लागलं. मला वाटलं की, माझ्यापासून आता सर्वच दूर जात आहे आणि मी तेव्हा देवाशी बोलले. मला जाणवत होतं की, माझा आत्मा निघून जात आहे पण माझ्या मुलीवरचं प्रेम मला जाऊ देत नाहीये. त्याचवेळी मी देवाचा धावा केला. त्याच्याशी बोलले. माझ्याकडून कोणाचं चुकूनमाकून वाईट झालं असेल तर माफी मागितली आणि विनंती केली की, मला माझ्या मुलीसाठी जगू दे ’
 

 

 


View this post on Instagram


 

 

Yeh Kalyug Hai!!! . . #TikTok #MammaAndGinni @samairratales #MotherDaughter #MomDaughter #FunTimes


A post shared by Juhi Parmar (@juhiparmar14) on
आयुष्य किती अनमोल आहे हे जाणवलं


जुहीने आपल्या पोस्टमध्ये पुढे असं लिहिलं की, पूर्ण जग तिला एक स्ट्राँग महिला म्हणून ओळखतं. पण तिच्याजवळदेखील मन आहे. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिला ना आपल्या घटस्फोटाबद्दल विचार आला ना अन्य कोणत्या गोष्टीचा. तिच्यासमोर फक्त तिच्या मुलीचा चेहरा दिसत होता आणि तिला फक्त तिच्यासाठी जगायचं होतं. आयुष्य किती अनमोल आहे हे तिला त्यावेळी जाणवलं असंही तिनं म्हटलं आहे. आपण हे आयुष्य असंच निरर्थक घालवतो. तिने सर्वांचे आभार मागितले, ज्यांच्यामुळे तिला दुसरा दिवस पाहायला मिळाला. जुहीने म्हटलं, ‘मी तीच आहे, पण माझा आत्मा नक्की बदलला आहे. माझ्याजवळ आज जे काही आहे, त्यामध्ये मी खूप आनंद आहे आणि आभारी आहे.’
 

 

 


View this post on Instagram


 

 

My Best Reward And Award This morning I had various letter stickers which were placed on my hand by Samairra and I began to wonder what the cryptic message could be. When I asked my little one she told me, "Mamma these are the first letters of all the names of your shows - Kumkum, Bigg Boss, Shani and now Tantra" I couldn't stop beaming because for me it is these small little things which Samairra does that become my best reward and award. In her own little way she had creatively laid out my portfolio of work right in the palm of my hand. And as I looked in her eyes I could see her pride as she spoke about her mamma's work. And of course, she loves watching Mamma on screen as she truly is my biggest fan as well as toughest critic! I see what I am and what I want to be, in my baby's eyes. . . . @samairratales #mammaginni #mammadaughter #mommy #daughter #mommyanddaughter #momanddaughter #blog #motherblogging #momblogging #blogpost #blogging #motherdaughterblogging #motherhood #kidsofinstagram #babiesofinstagram #juhiblogs


A post shared by Juhi Parmar (@juhiparmar14) on


जुहीने 2009 मध्ये अभिनेता सचिन श्रॉफबरोबर लग्न केलं होतं. पण या दोघांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि दोघांनी 2018 मध्ये घटस्फोट घेतला. जुहीला एक मुलगी असून ती तिच्याजवळच राहते आणि जुहीचा तिच्या मुलीवर जीव आहे. या दोघींचे डान्स व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत 'चोगाडा तारा' हा डान्स


‘कसौटी जिंदगी की’ फेम प्रेरणा आणि कोमोलिकाचं झालं सेटवर भांडण


अभिनेत्री शिल्पा शिंदे चाहत्यांना बसणार झटका