अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन

अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन

टीव्ही मालिका ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ फेम अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) गेले बरेच महिने लहान पडद्यापासून दूर आहे. तिचे चाहते तिची खूपच वाट पाहात होते. बऱ्याच दिवसांनी एका लग्नामध्ये रश्मी दिसली तेव्हा तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. रश्मी बरीच जाडी झाली आहे. यासंदर्भात आता रश्मी एका आजाराने त्रस्त असल्याचं समोर आलं आहे. रश्मीने एका मुलाखतीमध्ये आपल्या आजाराबाबत खुलासा केला आहे. या गंभीर आजारामुळेच रश्मी बरेच दिवस लहान पडद्यापासून दूर आहे. कारण या आजारामुळेच तिचं वजन प्रचंड प्रमाणात वाढत होतं. आता तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की, रश्मीला नक्की असं काय झालं आहे?


सोरायसिस या आजाराने रश्मी आहे त्रस्त


rashmi


रश्मी देसाई डिसेंबर 2018 पासून त्वचेसंबंधी असलेला आजार सोरायसिस (psoriasis) ने त्रस्त आहे. या आजारामध्ये त्वचेची साल निघायला लागते आणि ज्या व्यक्तीला हा आजार आहे त्याचं वजन आपणहून पटापट वाढायला लागतं. याबद्दल रश्मीने स्पष्ट करत सांगितलं, ‘मी काही दिवसांपासून आजाराने त्रस्त आहे. मागच्या वर्षीच मला सोराससिस झाल्याचं निदान झालं, हा एक त्वचेचा आजार (skin disease) आहे. यातून बरं होण्यासाठी बराच कालावधी मला लागला. मागच्या चार महिन्यांपासून मी स्टेरॉईड ट्रीटमेंट (steroid treatment) घेत असून त्यामुळेच माझं वजन खूप वाढलं होतं.’


ऊन आणि तणावाने वाढतो आजार


rashmi 1


रश्मी देसाईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की, हा आजार ऊन आणि तणावामुळे अधिक वाढतो आणि त्यामुळे रश्मीने घरातून बाहेर जाणं फारच कमी केलं. इतकंच नाही तर रश्मी सतत तणावाखाली असल्यामुळे तिचं वजन वाढू लागलं होतं. वास्तविक, तणाव घेतल्यामुले सोरायसिस बरा होण्याऐवजी अधिक वाढतो आणि त्यामुळेच रश्मीला जास्त तणाव न घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. याबाबत रश्मीने सांगितलं की, ती एक अभिनेत्री आहे आणि तिचा चेहराच हा अभिनय क्षेत्रात महत्त्वाचा आहे असं तिला वाटतं त्यामुळे ती जास्त तणावाखाली होती.


वजनावर ‘नो कमेंट’


सोशल मीडियावर लोक रश्मी देसाईला तिच्या वाढत्या वजनाबाबत विचारत होते पण रश्मीला त्यावर कोणतंही उत्तर द्यायचं नव्हतं. अशा लोकांबद्दल वाचून अथवा ऐकून हसत पुढे जाणंच रश्मीला योग्य वाटलं आहे. सध्या तिने याबाबत ‘नो कमेंट’ असाच स्टँड घेतला आहे असं म्हणावं लागेल. वजन कमी करणं (weight loss) सोपं नाही हे रश्मीला माहीत आहे त्यामुळे सध्या ती आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.


rashmi 2


आता कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता, केवळ आपलं काम आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय रश्मीने घेतला आहे. आपल्या आरोग्याशी आता कोणतीही तडजोड रश्मीला करायची नाही. यापूर्वीदेखील रश्मीचा घटस्फोट होण्याच्या वेळी रश्मीला बराच त्रास झाला होता. तिला तिचा नवरा नंदीश संधूकडून बरीच वाईट वागणूक मिळाल्यामुळे रश्मी आजारी पडली होती. त्यावेळीदेखील तणावचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं होतं. पण आता पुन्हा एकदा रश्मी या आजाराशी दोन हात करून लहान पडद्यावर लवकरच दिसेल अशी अपेक्षा तिचे चाहते करत आहेत.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


ऐश्वर्यासारखी हुबेहुब दिसणारी मॉडेल सोशल मीडियावर होतेय व्हायरल


कंगनाच्या बहिणीचा ऋतिकवर निशाणा, म्हणाली आता तू बघच


जाहिरात विश्वात बाजीराव-मस्तानीची जोडी सर्वाधिक लोकप्रिय