अजून एका टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या, खासगी कारणाने जीव देत असल्याचं केलं स्पष्ट

अजून एका टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या, खासगी कारणाने जीव देत असल्याचं केलं स्पष्ट

टीव्ही अभिनेत्याचं आत्महत्येचं सत्र सध्या सुरूच आहे असं म्हणावं लागेल. काही महिन्यांपूर्वीच अभिनेता कुशल पंजाबी (Kushal Punjabi) याने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता ‘दिल तो हॅप्पी है जी’ मालिकेतील अभिनेत्री सेजल शर्माने (Sejal Sharma) शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सेजल शर्माने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं असून तिच्या घरून सुसाईट नोटही मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे.  सेजल शर्मा नुकतीच एका वाहिनीवरील ‘दिल तो बच्चा है जी’ या मालिकेमध्ये काम करत होती. तिने या मालिकेत सिमी खोसलाची भूमिका साकारली होती. मुख्य भूमिका करणाऱ्या जस्मिन भासिनच्या बहिणीच्या भूमिकेत तिने काम केलं होतं. 

खासगी कारणाने आत्महत्या केल्याचं सांगितलं

सेजल शर्माने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री आत्महत्या केली असून आपण खासगी कारणामुळे आत्महत्या करत आहोत असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होतं. तसंच ती डिप्रेशनमध्ये असल्याचंही सांगण्यात येत आहे. सेजल शर्मा ही मीरा रोड पूर्वमधील शिवार गार्डन परिसरातील रॉयल नेस्ट सोसायटीमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींसह राहात होती. यापूर्वी सेजलने विवो आणि उषा फॅन्सच्या जाहिरातीमध्येही काम केलं होतं. विवोच्या जाहिरातीमध्ये तर ती आमिर खानबरोबर झळकली होती. तर उषा फॅन्सच्या जाहिरातीमध्ये हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्याबरोबर तिने काम केलं होतं. त्यानंतरच तिला ही मालिका मिळाली होती. याशिवाय तिने ‘आजाद परिंदे’ या वेबसिरीजमध्येही काम केलं. तिची पहिली जाहिरात ही मोटरोलासह होती. सेजल शर्मा मूळची राजस्थानमधील उदयपूरमधील राहणारी होती आणि तिला डान्स आणि अभिनयाची खूपच आवड होती. त्यामुळे ती आपलं नशीब आजमवायला मुंबईत आली होती आणि त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वीदेखील झाली होती. मात्र तिचं अचानक असं पाऊल उचलल्याने तिच्या सहकलाकारांनाही धक्का बसला आहे. 

तुमचे आवडते कलाकार का जातात नैराश्याच्या आहारी

तिच्या आत्महत्येने सहकलाकार धक्क्यात

सेजलबरोबर काम केलेले तिचे सहकलाकार तिच्या आत्महत्येमुळे धक्क्यात गेले आहेत. कारण सेजलला कोणतं दुःख होतं ज्यामुळे तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं याबाबत कोणालाच माहीत नाही. जास्मिन भासिनने आपण धक्क्यात असल्याचं म्हटलं आहे. तर इतर सहकलाकारांनीही आपण धक्क्यात असल्याचं सांगितलं आहे. तसंच या सर्वांनी तिच्या आत्महत्येनंतर दुःख व्यक्त केलं आहे. तिची मैत्रीण अभिनेत्री मीरा देवस्थळेने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा फोटो शेअर करत लिहिले, ‘सेजल तुझ्या आत्म्याला शांती मिळो. माझ्या मैत्रिणीने आज आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक आहे की सतत हसत राहणारी आणि मजेत असणारी मुलगी नैराश्यात होती. तू कोणाशी याबाबत का नाही बोलू शकलीस आम्ही तुझी काही मदत करू शकलो असतो. तुला माझं प्रेम आणि तुझ्यासाठी माझी देवाकडे प्रार्थना.’ तर जस्मिननेही आपल्या भावना व्यक्त केल्या, ‘माझा विश्वासच बसत नाहीये की, तू आमच्याबरोबर नाहीस. एक आनंदी मुलगी जिच्याबरोबर असल्यानंतर अप्रतिम वाटायचं, केवळ तुलाच माहीत असेल की, तू कोणत्या परिस्थितीशी झगडत होतीस आणि आत्महत्या करण्याचा तू निर्णय घेतलास. मला तुझी आठवण येत राहील. असं झालं नसतं तर खूप बरं झालं असतं.’ सेजलच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. तिचे अंतिम संस्कार हे उदयपूरमध्ये होणार आहेत. 

अभिनेता कुशल पंजाबीचा धक्कादायक मृत्यू

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.