घटस्फोटानंतरही भक्कमपणे उभ्या राहिल्या या अभिनेत्री

घटस्फोटानंतरही भक्कमपणे उभ्या राहिल्या या अभिनेत्री

ग्लॅमर इंडस्ट्रीमधील कामाचा ताण, फिट राहण्यासाठी लागणारी मेहनत, प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी असणारा ताण हे सगळंच कलाकारांना झेलायचं असतं. पण याबरोबरच व्यक्तीगत आयुष्यही तणावग्रस्त असेल तर त्याचा त्रास अधिक होतो. पण टीव्हीवरील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर तुटून न जाता आपलं करिअर अधिक चांगलं बनवलं आणि त्या भक्कमपणे उभ्या राहिल्या. इतकंच नाही तर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी इतकं कसदार काम केलं की त्यांच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. आपलं आयुष्य आणि करिअर या दोन्ही बाजू घटस्फोटानंतर या अभिनेत्रींनी अप्रतिम सांभाळल्या आहेत. अशाच काही अभिनेत्रींबाबत आपण जाणून घेऊया. 

रश्मी देसाई

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये रश्मी देसाई हे नाव माहीत नाही असं कोणीच नाही. रश्मी देसाईच्या आयुष्याबाबत नेहमीच चर्चा झाली आहे.  बिग बॉसनंतर तर रश्मीचं पूर्ण आयुष्याच बदललं. पहिलीच मालिका ‘उतरन’ मध्ये काम करताना तिचे आणि नंदिश संधूचे प्रेमसंबंध जुळले आणि दोघांनी लग्न केलं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.  नातं टिकवण्यासाठी दोघांनीही खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यानी ‘नच बलिये’ मध्ये सहभागही घेतला. मात्र तरीही या दोघांचं नातं टिकू शकलं नाही. त्यानंतर तिचं नाव अरहान खान बरोबर जोडलं गेलं. मात्र त्यानेही तिला फसवलं. पण सगळ्यातून रश्मी बाहेर पडली आणि रश्मीचं नाव टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूपच मोठं आहे. एकता कपूरच्या नागिन सिरीजमध्येही रश्मी दिसली. आता रश्मी आपल्या करिअरच्या  बाबतीत अधिक गंभीर झाली आहे. तर बिग बॉस 13 नंतर तिच्या फॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 

जेनिफर विंगेट

मायाची भूमिका साकारून अनेकांच्या मनात जागा मिळवलेली अभिनेत्री म्हणजे जेनिफर विंगेट.  ‘बेहद’ या मालिकेने तिला तुफान यश मिळवून दिलं. आधीही तिचे अनेक चाहते होते. मात्र या मालिकेनंतर तिला खूपच प्रसिद्धी मिळाली. करण सिंग ग्रोव्हरसह घटस्फोट घेतल्यानंतर जेनिफरला या मालिकेद्वारे अधिक प्रसिद्धी  मिळाली. करण सिंग ग्रोव्हरसह लग्न केल्यानंतर दोन वर्षात या दोघांनी घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोट झाल्यानंतर जेनिफरने स्वतःला सांभाळत अधिक मेहनत घेऊन स्वतःला सिद्ध केलं. जेनिफरने आपली अशी वेगळी ओळख तर निर्माण केलीच पण त्याशिवाय तिने एक उत्तम अभिनेत्री म्हणून जागाही मिळवली. करणसिंगने बिपाशासह लग्न केले. तर जेनिफरने अजूनही लग्न केले नाही. 

‘बेहद’ हॉट बिकिनीमध्ये दिसली जेनिफर विंगेट

श्वेता तिवारी

View this post on Instagram

❤️❤️❤️❤️

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेता तिवारीने आपला एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला. मात्र तिचं व्यक्तीग आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. श्वेता तिवारीने पहिलं लग्न अभिनेता आणि निर्माता राजा चौधरी बरोबर केलं.  या दोघांना एक मुलगीही झाली. मात्र सततच्या भांडणांना कंटाळून श्वेताने पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. काही वर्षांनी तिने अभिनेता अभिनव कोहलीसह संसार थाटला. मात्र गेल्या वर्षापासून या दोघांमध्ये खटके उडत असून  लवकरच यांचा घटस्फोट होणार आहे. दोघेही सतत एकमेकांवर आरोप करत असून नक्की कोणाची चूक आहे याचीच चर्चा सुरू आहे.  या दोघांना एक मुलगा असून मुलगी पलक आणि अभिनवचा मुलगा या दोघानाही श्वेताच सांभाळत आहे.  तर अभिनवने आपल्या मुलापासून श्वेता आपल्याला तोडत असल्याचा आरोपही केला आहे. इतकं सगळं असलं तरीही श्वेता तितक्याच ताकदीने पुन्हा एकदा मालिकांमधून काम करू लागली आहे. 

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप

स्नेहा वाघ

View this post on Instagram

Be crazy....it helps 😉

A post shared by Sneha Wagh (@the_sneha) on

‘एक वीर की अरदास-वीरा’ या मालिकेतून वीराच्या  आईची भूमिका साकरणारी स्नेहा वाघही प्रसिद्ध आहे. तिने अवघ्या 19 व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकरशी लग्न केले होते. मात्र या दोघांनी काही वर्षातच घटस्फोट घेतला. हिंसेच्या कारणाने स्नेहाने घटस्फोट घेतल्याचं म्हटलं जातं. पण यातून पुन्हा एकदा न घाबरता आणि दबून न जाता स्नेहाने स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर स्नेहाने इंटिरिअर डेकोरेटर असणाऱ्या अनुराग सोळंकीसह लग्न केलं. मात्र हे लग्नही टिकू शकलं नाही आणि तिचा पुन्हा घटस्फोट झाला. आता स्नेहा एकटीच असली तरीही ती मालिकांमधून काम करत आहे आणि अजूनही ती आपलं अस्तित्व या इंडस्ट्रीमध्ये टिकवून आहे. 

शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा

दलजित कौर

‘इस प्यार को क्या नाम दू’ मालिकेतील अंजलीची भूमिका साकारणारी दलजीत कौरदेखील हिंसेमुळे त्रस्त झाली होती. शालिन भानौतशी पाच वर्ष संसार केल्यानंतर कंटाळून दलजितने घटस्फोट घेतला. आपल्या मुलाचा ती सध्या  एकटीने सांभाळ करत आहे. मुळात घटस्फोट घेतल्यानंतर दलजीतमध्ये बराच बदल पाहायला मिळाला. अतिशय लाजाळू आणि कमी बोलणारी दलजीत बोल्ड झाली आणि आपलं म्हणणंही ती बऱ्याचदा मांडताना दिसते. शालीनने हिंसा केल्याचा तिने आरोप करत पोलीस तक्रारही केली होती. दलजितने  सध्या आपल्या  करिअरकडे उत्तमरित्या लक्ष दिले आहे.