ब्रेकअपनंतर अधिक बोल्ड आणि ब्युटीफूल झाल्या या अभिनेत्री

ब्रेकअपनंतर अधिक बोल्ड आणि ब्युटीफूल झाल्या या अभिनेत्री

असं म्हटलं जातं की, ब्रेकअपमुळे तुम्हाला आयुष्यात खूपच चांगला धडा मिळतो आणि तुम्ही पहिल्यापेक्षाही अधिक चांगल्या व्यक्ती बनता. शिवाय तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता असाही समज आहे. वास्तविक ब्रेकअपनंतर आपण आपल्या आयुष्यात रडत बसण्यापेक्षाही पुढे जाऊन अधिक चांगलं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा ठेवतो. आयुष्यात पुढे जाण्यातच अर्थ आहे हे मनाला जास्त चांगल्या तऱ्हेने समजावतो. चित्रपट अथवा मालिकांमध्येही काहीही दाखवलं तरीही खऱ्या आयुष्यात प्रत्येकाला ब्रेकअप आणि अपयशी नात्यातून जावं लागतंच. मात्र जेव्हा सेलिब्रिटींचं ब्रेकअप होतं आणि ते या भावनेतून बाहेर येतात तेव्हा नक्की काय घडतं? तर आपल्या दुःखातून बाहेर आलेले सेलिब विशेषतः अभिनेत्री अधिक सुंदर आणि बोल्ड होतात. अर्थात तुम्ही म्हणाल काहीही आहे हे...पण आम्ही तुम्हाला उदाहरणही देऊ शकतो.

जेनिफर विंगेट, अंकिता लोखंडे आणि कृतिका कामरासारख्या कितीतरी प्रसिद्ध अभिनेत्री याचे उदाहरण म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. या सर्व अभिनेत्री ब्रेकअप नंतर अतिशय वेगळ्या तऱ्हेने जगासमोर आल्या. त्यांचा अंदाज हा अधिक बोल्ड आणि दिसायला अधिक सुंदर असा काहीसा बघायला मिळाला. इतकंच नाही तर आयुष्यात मिळालेल्या धड्यानंतर या अभिनेत्री अधिक सुंदर दिसू लागल्या. तुम्हालाही यांच्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ना?

अंकिता लोखंडे

एकता कपूरच्या प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’मध्ये पहिल्यांदा अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत पहिल्यांदाच एकत्र दिसले. मालिकेदरम्यान दोघांमध्ये प्रेम फुललं आणि त्यांच्या गुपचूप लग्नाच्याही चर्चा रंगू लागल्या. या मालिकेदरम्यानच सुशांतला बॉलीवूडमधील चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्याने मालिका सोडली. मात्र तरीही अंकिता आणि सुशांत एकत्र होते. पण सहा वर्षांच्या नात्यानंतर 2016 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर सुशांत आपल्या चित्रपटांमध्ये व्यग्र झाला तर अंकिता गायब झाली. मात्र जेव्हा अंकिता काही महिन्यात परत आली तेव्हा तिने तिच्या इन्स्टावर बोल्ड आणि सेक्सी फोटोज टाकायला सुरुवात केली. ब्रेकअप नंतर अंकिता खूपच बदलली होती. ‘पवित्र रिश्ता’मधील साधीसुधी अंकिता कुठेतरी गायब झाली होती आणि त्यानंतर अंकिताचे चाहतेही वाढू लागले. सुशांत आयुष्यातून निघून गेल्यानंतर अंकिताने स्वतःमध्ये अनेक बदल करत अधिक बिनधास्तपणा आणला आणि ती अतिशय बोल्ड आणि ब्युटीफूल झाली.

जेनिफर विंगेट

टीव्हीवरील मालिका ‘दिल मिल गए’ दरम्यान जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्ह एकमेकांच्या प्रेमात पडले. करणसिंगचं त्यावेळी पहिलं लग्न झालं होतं. असं असतानाही जेनिफर आणि करण एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर करणने आणि जेनिफरने लग्न केलं. मात्र त्याचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. मात्र आपल्या घटस्फोटानंतर जेनिफर पुन्हा एकदा परत आली ते जग जिंकायला. ‘बेहद’ या मालिकेतून जेनिफरने सगळ्यांची मनं तर जिंकून घेतलीच. पण तिने तिची स्टाईलदेखील बदलली होती. मालिकेतील ‘माया’चा अंदाज, तिचा स्टायलिश लुक आणि ड्रेसिंग सेन्स हा सर्वांनाच भावला. इन्स्टाग्रामवरदेखील जेनिफर आपल्या स्टाईल्स आणि आऊटफिट्ससाठी प्रसिद्ध आहे. या मालिकनंतरही आलेली ‘बेपनाह’ ही जेनिफरची मालिका गाजत आहे. या मालिकेतही तिच्या पारंपरिक तरीही आधुनिक अशा स्टाईलची चर्चा होत आहे. जेनिफरने ब्रेकअपनंतर स्वतःला खूपच बदललं आणि ती अधिक सुंदर आणि बोल्ड झाली. इतकंच नाही तर तिच्या अभिनयातही एक दर्जा आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

रामायणातील क्लायमॅक्स सीन पाहून चाहते का झाले निराश

कृतिका कामरा

टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा आणि करण कुंद्रा हे एकता कपूरच्या ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेदरम्यान एकमेकांना भेटले आणि याच मालिकेच्या सेटवर त्यांच्या प्रेमाला बहर आला. मात्र काही वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं. कृतिका वास्तविक टीव्हीवर  2017 मध्ये "चंद्रकांता" या मालिकेत दिसली होती. मात्र सोशल मीडियावर कृतिका नेहमीच आपले फोटो पोस्ट करत असते. कृतिका तिचे बरेचसे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असून तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. ब्रेकअपनंतर कृतिका खूपच बदलली असल्याचं दिसून येतं. अतिशय साधीसुधी असणारी कृतिका आता एकदम बोल्ड झाली आहे.

कार्तिक आर्यनने बहिणीला दिली या कारणासाठी शिक्षा

अदा खान

अदा खानला कोण ओळखत नाही. लहान पडद्यावरील ‘नागिन’ म्हणून प्रसिद्ध असणारी अदा नेहमीच तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी चर्चेत राहिली आहे. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती तिच्या अभिनेता अंकित गेराबरोबरील नात्याची. एका टीव्ही शो दरम्यानदेखील अदाने याबाबत खुलासा केला होता. अंकितने दिलेल्या धोक्यानंतर अदा अगदीच बदलली. एकाचवेळी दोन मुलींना डेट करणाऱ्या व्यक्तीबरोबर राहण्यापेक्षा अशा व्यक्तीपासून दूर राहणंच अदाला योग्य वाटलं. या नात्यानंतर अदाच्या जीवनात कोणीही नसून आपण आयुष्यात खूपच पुढे निघून आल्याचंही अदानं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र अदाचा संपूर्ण अंदाजच बदलला आणि अदा अधिक सुंदर आणि बोल्ड झाली. शिवाय बऱ्याच पार्टीमध्येही अदा दिसून येते. सध्या अदा खान अगदी मजेत आयुष्य जगत आहे.

साठच्या दशकात या जुन्या अभिनेत्रींनी सिल्व्हर स्क्रिनवर बिकिनी घालून तोडले नियम

दलजीत कौर

बऱ्याच वर्षांच्या नात्यानंतर 2009 मध्ये दलजित कौर आणि शालीन भानोत यांनी लग्न केलं. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं. दलजित आणि शालीन हे बरेच वर्ष नात्यात होते. मात्र शालीनच्या वागण्यामुळे आपण घटस्फोट घेत असल्याचं दलजितनं स्पष्ट केलं. त्या दोघांना पाच वर्षांचा एक मुलगा असून तोदेखील दलजितबरोबरच राहतो. लग्नापूर्वी असणारी दलजित घटस्फोटानंतर अगदीच बदलली आणि अधिक बोल्ड झाली. ‘कयामत की रात’ या मालिकेतून तिने पुनरागमन केलं असून सध्या तिच्या नावाची चर्चा आहे. आता ती पहिल्यापेक्षाही अधिक सुंदर आणि स्टायलिश झाली असून घटस्फोट घेतल्यानंतरचं आयुष्य मजेत जगत आहे.