वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या

वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं नेहमीच म्हटलं जातं. बॉलीवूड असो अथवा टीव्ही क्षेत्र या मनोरंजन क्षेत्रात ही गोष्ट बऱ्याच जणांनी सिद्ध केली आहे. वयामध्ये असलेलं अंतर त्यांच्या प्रेमात कधीही अंतर आणू शकलेलं नाही. यापैकी काही जोड्या तर लग्नाला अनेक वर्ष होऊनही अजूनही प्रेमात आकंठ बुडालेल्या आहेत. टीव्हीवरील कलाकारांनाही प्रेक्षक अगदी भरभरून प्रेम देतात आणि त्यातील जोड्यांनाही. खऱ्या आयुष्यातील या वयाचं अधिक अंतर असलेल्या जोड्या या प्रेक्षकांच्या अगदी गळ्यातील ताईत आहेत. यापैकी काही जोड्यांंमध्ये तर वयाचं खूपच अंतर आहे. मात्र असं असूनही त्यांच्या आयुष्यात त्याने काहीही फरक पडलेला नाही. आपला संसार या जोड्या अगदी प्रेमाने आणि आनंदाने जगत आहेत. जाणून घेऊया अशा कोणत्या जोड्या आहेत ज्यांच्या वयामध्ये आहे अंतर - 

1. सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर

Instagram

सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर ही जोडी सगळ्यांच्याच आवडीची जोडी आहे. लहान पडद्यावरील हे सर्वात जुनं आणि क्यूट कपल आहे. सचिन आणि सुप्रियाच्या लग्नाला जवळजवळ 34 वर्ष झाली आहेत. पण तरीही या दोघांचं प्रेम आजही दिसून येतं. नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार कोणत्याही कार्यक्रमात एकत्र असतात. तसंच ते एकमेकांना नेहमीच आदर आणि प्रेम देताना दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का? सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या वयामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. तरीही या दोघांच्या बाबतीत कधीही त्यांच्या वयातील अंतर दिसून आलं नाही. 

2. अशोक आणि निवेदिता सराफ

Instagram

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी मराठीतील अत्यंत आवडती जोडी आहे. अशोक सराफ यांचे आजही बरेच चाहते आहेत. अशोक आणि निवेदिताची जोडी मोठ्या पडद्यावर तर प्रसिद्ध होतीच. पण लहान पडद्यावरही या दोघांनाही प्रेक्षकांनी खूपच प्रेम दिलं. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयामध्ये साधंसुधं नाही तर 18 वर्षांचं अंतर आहे. त्यांचं लग्न झालं तेव्ही ही जोडी कसा संसार टिकवेल अशाही वायफळ चर्चा झाल्या होत्या. पण इतके वर्ष अगदी सुखाने ही जोडी संसार करत आहे. 

मणिकर्णिकानंतर अंकिता लोखंडे झळकणार ‘या’ चित्रपटात

3. गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी

Instagram

टीव्हीवरील सध्याची आवडती जोडी म्हणजे गौतम रोडे आणि पंखुडी अवस्थी. गौतम रोडे 42 वर्षांचा आहे. पण त्याचं वय दिसून येत नाही. गौतमने स्वतःला अत्यंत फिट ठेवलं आहे. तर त्याची बायको पंखुडी हीदेखील अभिनेत्री असून त्यांच्या वयातही 14 वर्षांचं अंतर आहे. पंखुडीचं वय 28 आहे. दोघांची पहिली भेट ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकेदरम्यान झाली. त्यानंतर त्यांनी  लग्नाचा निर्णय घेतला आणि वयाचा विचार न करता दोघेही विवाहबद्ध झाले. दोघेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच एकमेकांबरोबरील फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आयुष्यातील घडामोडींबद्दल सांगत असतात. 

4. तनाझ आणि बख्तियार ईराणी

Instagram

तनाझ करीम आणि बख्तियार ईराणी ही वेगळीच जोडी. पण तरीही छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती जोडी आहे. तनाझ ही बख्तियारपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. मुळात तनाझचं पहिलं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगीही आहे. पण या गोष्टी बख्तियारने कधीही त्यांच्या प्रेमाच्या आड येऊ दिल्या नाहीत. बख्तियार आणि तनाझ दोघेही त्यांच्या कॉमेडी टायमिंंगसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या हे दोघं छोट्या पडद्यावर कमी दिसत असले तरीही सोशल मीडियावर मात्र दोघेही अॅक्टिव्ह असतात. 

Good news: अॅमी जॅक्सनला झाला मुलगा, फोटो व्हायरल

5. रूबिना दलैक आणि अभिनव शुक्ला

Instagram

रूबिना दलैकचं आधी अविनाश या अभिनेत्याबरोबर बरेच वर्ष अफेअर होतं. पण काही कारणाने दोघं वेगळे झाले. त्यानंतर रूबिनाच्या आयुष्यात अभिनव आला आणि आयुष्य बदलून गेल्याचं तिनं नेहमीच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. अभिनव हा रूबिनापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. पण अभिनव आपल्याला जास्त समजून घेतो असं रूबिना नेहमीच सांगते. पहिल्याच भेटीत आपण त्याच्या प्रेमात पडल्याचंही तिने कबूल केलं होतं. दोघांनीही 2018 मध्ये सिमलामध्ये लग्न केलं. त्यावेळी पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचणार नाही अशा तऱ्हेने दोघांना लग्न करायचं होतं. त्यामुळे त्यांनी इको - फ्रेंडली लग्नाला महत्त्व दिलं. 

रितेश - जेनेलियामध्ये नक्की काय बिनसलं, रितेशला दिलं जेनेलियाने सडेतोड उत्तर

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.