ट्विंकल खन्ना या गोष्टीसाठी नेहमी उडवते आईची खिल्ली, शेअर केली मजेशीर गोष्ट

ट्विंकल खन्ना या गोष्टीसाठी नेहमी उडवते आईची खिल्ली, शेअर केली मजेशीर गोष्ट

ट्विंकल खन्ना तिच्या विनोदबुद्धीसाठी खूप लोकप्रिय आहे. कोणत्यावेळी काय उत्तर द्यावं याबाबत ट्विंकल खन्नाचा हात कुणीच धरू शकणार नाही. अभिनयासोबत एक उत्तम लेखिका असल्यामुळे ती खूपच हजरजबाबी आहे. तिच्या या स्वभावाचा फटका इतर लोकांप्रमाणेच तिच्या घरच्यांनाही पडत असतो. कधी नवरा, कधी मुलं तर कधी चक्क आईची खिल्ली उडवायलाही ट्विंकल मागेपुढे पाहत नाही. नुकतंच ट्विंकलने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिची आई आणि ती डायनिंग टेबलवर जेवतानाचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यात ट्विंकल खन्ना काहीतरी खात आहे आणि डिंपल कपाडिया म्हणजेच तिची आई तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. या फोटोसोबत ट्विंकलने एक कॅप्शन शेअर केली आहे की, " मला माझ्या आईचा परफॉर्मेन्स खूपच आवडतो.  तेव्हाही जेव्हा ती अभिनय करत असते की मला जेवण बनवता येतं. ट्विंकलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि काही सेलिब्रेटीजनी यावर तिला अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. 

ट्विंकलने या फोटोपाठोपाठ एक व्हिडिओदेखील तिच्या पोस्टवर शेअर केला आहे. जी खरंतर नॉर सूपची एक जाहिरात आहे. या जाहिरातीत डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्नाने काम केलं आहे. ज्यामध्ये डिंपल तिच्या मुलींसाठी एक रेस्टॉरंट स्टाईल सूप बनवते आणि नंतर ट्विंकल तिच्याकडे याची रेसिपी मागते. या जाहिरातीसाठी ट्विंकलने ही कॅप्शन लिहिलेली आहे. आणि सोबत आईच्या कुकिंगच्या ज्ञानाची खिल्लीदेखील उडवली आहे. 

ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया या दोघी मायलेकींना स्वयंपाकातील ज्ञान बेताचंच आहे. ट्विंकल खन्ना चा पती अक्षय कुमार आणि मुलगा आरव हे त्या दोघींपेक्षा जास्त चांगले कुक आहेत असं ट्विंकलने सोशल मीडियावरून अनेकदा जाहीर केलं आहे. मात्र आईच्या हातचं ते आईच्या हातचं असतं त्यामुळे डिंपल ट्विंकलसाठी अनेकदा असे स्वयंपाकात नवनवीन प्रयोग करत असते. मागेही तिने ट्विंकलसाठी खास फ्राईड राईस केला होता. जो ट्विंकलने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

ट्विंकल खन्नाची अभिनय कारकिर्द

ट्विंकलने काही दिवसांपूर्वीच आणखी एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये तिने तिचा चित्रपट मेलाचा एक फोटो होता. या फोटो मधुन तिने तिच्या करिअरच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ट्विंकलने 1995 साली बरसात चित्रपटातून बॉलीवूडमधून प्रवेश केला होता. मात्र बॉलीवूडमध्ये काही चित्रपट केल्यावर तिने अभिनय सोडून लेखक व्हायचं ठरवलं. एका शोमध्ये तिने सांगितलं होतं की आजही मला लोक 'मेला' या चित्रपटामुळे ओळखतात. वास्तविक तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. मात्र तिच्या मनावर आणि चाहत्यांच्या ह्रदयात या चित्रपटाने एक वेगळीच छाप सोडली असं तिचं म्हणणं आहे. ट्विंकलच्या मते ती कधीच अभिनयात इंटरेस्टेड नव्हती मात्र तिने या क्षेत्रात स्वतःची एक छोटी ओळख नक्कीच तयार केली आहे. खरंतर ट्विंकल खन्ना ती तिचा नवरा अक्षय कुमार आणि मुलांमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमारची अभिनयातील घोडदौड जोरात सुरू असून तिची अनेक पुस्तके प्रदर्शित झाली असून तिला आणखी बरंच काही लिहायचं आहे.