सेलिब्रेटीजच्या वैयक्तिक आयुष्यासोबत त्यांच्या कुटुंबाची चर्चाही नेहमीच होताना आढळते. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव मात्र या ग्लॅमरस दुनियेच्या चकाचकीपासून थोडा दूर असतो. आरवला फोटोग्राफीचीही आवड आहे मात्र अजूनही त्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करणार याचा खुलासा केलेला नाही. ट्विंकल खन्नाच्या मते तो काही बाबतीत त्यांच्या वडीलांप्रमाणेच आहे. कारण आरवला अक्षयप्रमाणे कुकिंगची आवड आहे. ट्विंकलने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मुलाने आरवने खास तिच्यासाठी तयार केलेला केक शेअर केला आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या आवडीचं पुस्तक आणि लेकाने बनवलेला हा केक शेअर करत एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.
अक्षय आणि ट्विंकलच्या मते आरव आहे बेस्ट कुक
आरवचे स्वयंपाक करताना काही फोटो ट्विंकलने यापूर्वीदेखील शेअर केले होते. ज्यामध्ये आरव ट्विंकलला स्वयंपाकासाठी मदत करत होता. अक्षय कुमारही एक चांगला कुक आहे. कारण अक्षय चित्रपटात काम करण्यापूर्वी थायलंडमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये काम करत असे. ज्यामुळे त्याने कुकिंगचं स्कील आत्मसात केलं आहे. आता वडीलांच्या पावलावर पाऊल टाकत त्याचा मुलगा आरवदेखील स्वयंपाकात रस घेत आहे. या दोघांच्या या स्वयंपाकातील आवडीमुळे ट्विंकल खन्नाचा नक्कीच चांगला फायदा झाला आहे. कारण ती आता या दोघांनी बनवलेल्या पदार्थांचा मस्त स्वाद घेताना दिसत असते. ट्विंकलप्रमाणेच तिची आई डिंपल कपाडियाही स्वयंपाकात माहीर नाही. कारण काही महिन्यांपूर्वी ट्विंकलनेच तिच्या आईने पहिल्यांदा तिच्यासाठी बनवलेला स्वयंपाक शेअर केला होता. ज्यासोबत मजेने ट्विंकलने शेअर केलं होतं की हे फक्त जागतिक महामारी आणि लॉकडाऊनमुळेच होऊ शकलं आहे. जवळजवळ 46 वर्षांनी डिंपल कापडिया यांनी ट्विंकलसाठी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने फ्राईड राईस बनवला होता. ज्यामुळे ट्विंकलने शेअर केलं होतं की ‘आईच्या हातचं जेवणं’ असं लोक म्हणतात ते काय असतं हे मी आज अनुभवलं. यावरून अक्षयच्या घरी कोण स्वयंपाक करतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
ट्विकंलला साधं ऑमलेटही नाही येत बनवता
अक्षय कुमारनेही काही दिवसांपूर्वीच त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ट्विंकल बोलत होती की “आमच्या घरात माझा मुलगा बेस्ट कुक आहे. को राजमा पासून ते अगदी पिझ्झापर्यंत सर्व काही बनवू शकतो” त्यानंतर अक्षयने सांगितलं होतं की, हो आरव खरंच खूप छान स्वयंपाक बनवतो. त्यानंतर घरात मी सेकेंड बेस्ट कुक आहे. असं म्हणत अक्षयने ट्विंकलकडे इशारा करत सांगितलं होतं ती हिला फक्त स्टोरीज करता येतात. अक्षयने यात शेअर केलं होतं की ट्विंकलला साधं ऑमलेटही तयार करता येत नाही. आणि ट्विंकलने शेअर केलं होतं की अक्षय खरंच खूप छान कुक आहे कारण त्याला माझा भेजा फ्राय करायला, माझं रक्त उकळवायला खूप आवडतं. पण सर्वात बेस्ट कुक माझा मुलगा आरव आहे. अशा प्रकारे या मजेशीर व्हिडिओमधून कुटुंबाचं प्रेम आणि मजामस्ती दिसून आली होती.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
अखेर सहा महिन्यानंतर मल्टीप्लेक्स आणि थिएटर उघडणार
सर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ
कपिल शर्माने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, असा घालावा मास्क