ईशा आणि विक्रांतच्या नात्यात लवकरच येणार ट्वीस्ट

ईशा आणि विक्रांतच्या नात्यात लवकरच येणार ट्वीस्ट

लग्नानंतर प्रेमाचं रुपांतर एका नाजूक नात्यात होतं. प्रेमाचे दिवस हे गुलाबी आणि फक्त एकमेंकापुरते असतात. तर लग्नानंतर मात्र सगळंच बदलतं, असं म्हंटलं जातं. असंच काहीसं विक्रांत आणि ईशा #vikisha बरोबरही होणार का? 'तुला पाहते रे' (Tula Pahte Re) मालिकेत लग्न झाल्यावर ईशाचं सरंजामे कुटुंबाने जंगी स्वागत केलं. कुटुंबातील सगळ्यांशी ओळखही झाली. पण ईशासमोर अजूनही काही गोष्टी समोर यायच्या आहेत.


'विकीशा'च्या लग्नाचे खास फोटोज

हेही वाचा : ईशा आणि विक्रांतचा शाही लग्नसोहळा 


‘त्या’ खोलीचं रहस्य काय?


मंगळवारच्या एपिसोडमध्ये ईशा रूपालीशी बोलत असताना ती विक्रांत सरांशी बोलायची ईच्छा व्यक्त करते. पण तोपर्यंत सर्व सरंजामे कुटुंबिय आपापल्या खोलीत निघून जातात. अचानक हॉलमधील सर्वजण गेलेले पाहून ईशा थोडी घाबरते. पण तेवढ्यात एक नोकर येऊन तिला सागंते की, सर्वजण आपापल्या खोलीत गेलेत आणि विक्रांत सर वरच्या मजल्यावर गेले आहेत. तिने असं सांगितल्यावर ईशा विक्रांतला शोधण्यासाठी वरच्या मजल्यावर जाते. तिकडे तिला एका खोलीसमोर विक्रांतचा फोन आणि चपला बाहेर ठेवलेल्या दिसतात. खूष होऊन ईशा त्या खोलीचं दार वाजवते पण दार उघडताच विक्रांत तिच्यावर चिडून ओरडतो. पण नंतर शांतपणे तिला वाट पाहायला सांगून त्यांच्या तळमजल्यावरील खोलीत जायला सांगतो. थोडीशी घाबरलेली ईशा एका नोकराला विचारून त्यांच्या खोलीत जाते आणि विक्रांतची वाट पाहते.


जालिंदरने पाठवलं ईशाला गिफ्ट


खोलीत जात असताना नोकर ईशाला एक गिफ्ट देतो. खोलीत गेल्यावर ईशा गिफ्ट उघडते आणि त्यातील चाफ्याची फुल पाहून खूष होते. आनंदाने त्या फुलांचा सुवास घेत विक्रांत आणि तिच्या प्रेमाच्या आठवणींमध्ये रमून जाते. ईशाला आठवतं की, विक्रांत सरांनी तिला कसं प्रपोज केलं होतं. हॅलिकॉप्टरमधून केलेली ती सैर आणि सरांनी केलेलं सरप्राईज प्रपोज, सरांसोबतची बाईक राईड अश्या गोड आठवणीत ईशा रमते. 


विक्रांत आणि ईशा #vikisha च्या लग्नसोहळ्यातील 3 लक्षवेधी क्षण


जालिंदरच्या गिफ्टने विक्रांत अस्वस्थ
विक्रांत खोलीत येतो आणि ईशाशी बोलतो. त्याला असं वाटतं की ईशा झोपल्याचं नाटक करत आहे. पण नंतर त्याला कळतं की, ईशा झोपलीये. त्याचवेळी विक्रांतला चाफ्याचं फुलांनी भरलेलं गिफ्ट दिसतं आणि त्यातील दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा असं लिहीलेलं जालिंदरने पाठवलेलं कार्ड ही दिसतं. विक्रांत लगेच झेंडेना कॉल लावून जालिंदरने पाठवलेल्या गिफ्टबद्दल सांगतो आणि ईशाच्या जीवाला धोका असल्याची भीती बोलून दाखवतो. झेंडे विक्रांतला शांत करून जालिंदरचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन देतात. पण तरीही विक्रांतची काळजी संपलेली दिसत नाही.    


ईशापासून कधीपर्यंत लपणार ‘ही’ रहस्य


आता येत्या काळात ‘त्या’ खोलीचं रहस्य आणि जालिंदर ईशासमोर येणार का? की, विक्रांत हे रहस्य लपवण्यात यशस्वी होणार हे लवकरच कळेल. एवढं मात्र खरं की, या गोष्टींमुळे विकिशामध्ये दुरावा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.