बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ही विश्वसुंदरी या कारणांमुळे राहिली चर्चेत

बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारी ही विश्वसुंदरी या कारणांमुळे राहिली चर्चेत

मिस युनिव्हर्स असो की मिस वर्ल्ड या सगळ्याच सौंदर्य स्पर्धांमध्ये भारताने नेहमीच सौंदर्यासोबत ज्ञानाचेही योग्य प्रदर्शन केले आहे. अशीच एक मिस युनिव्हर्स म्हणजे सुश्मिता सेन.. 1994 साली तिच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा ताज चढला. त्या दिवसापासून ते आजपर्यंत ती लोकांच्या नजरेत आहे. आज या मिस युनिव्हर्सचा 44 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया सुष्मिताविषयीच्या काही हॉट गोष्टी.. ज्यामुळे ही विश्वसुंदरी कायम राहिली चर्चेत

आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चा फर्स्ट लुक रिलीज

वयाच्या 18 व्या वर्षी बनली विश्वसुंदरी

Instagram

सुश्मिता सेनचा जन्म  19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबाद येथे झाला. तिचे वडील वायूसेनेत विग कमांडर होते. तर आई ज्वेलरी डिझायनर होती. त्यामुळे एका सधन कुटुंबात तिचा जन्म झाला. वयाच्या 18 व्या वर्षी तिने मिस युनिव्हर्स या स्पर्धेत सहभाग घेतला. 1994 साली ती या स्पर्धेत नुसतीच सहभागी झाली नाही तर तिने तिच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा ताजही सजवून घेतला. सुश्मिता सेन ही पहिली महिला आहे जिने या स्पर्धेत सहभाग घेत यश संपादन केले होते. 

या प्रश्नामुळे तिच्या शिरपेचात खोवला गेला मान

Instagram

कोणतीही सौंदर्य स्पर्धा ही केवळ सौंदर्यावर अवलंबून नसते. तर त्यामध्ये बुद्धी चातुर्यही तितकेच महत्वाचे असते. या स्पर्धेदरम्यान सुश्मिताला विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि तिने त्याचे दिलेले उत्तर तिला मिस युनिव्हर्सच्या मुकुटापर्यंत घेऊन गेला. तो प्रश्न म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून महिला असण्याचा अर्थ काय आहे? यावर सुश्मिताने म्हणाली की, महिला म्हणून जन्माला येणं हे माझ्यासाठी देवाकडून मिळालेल उपहारच आहे. लहान मूल आईच्या उदरातून येते. ती आई महिलाच आहे. महिला सगळ्यांवर प्रेम करते आणि सगळ्यांना प्रेम करायला शिकवते. 

सुश्मिता आणि ऐश्वर्या वाद

Instagram

सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या बच्चन यांमध्ये नेहमीच वाद आहे. सुश्मिता  आणि ऐश्वर्या मिस इंडिया पॅजंटसाठी एकत्र सहभागी झाले होते. त्या दोघी इतक्या चांगल्या दावेदार होत्या की त्या दोघांमध्ये गुणांची टाय झाली. त्यानंतर दोघांना प्रश्न विचारण्यात आले. ऐश्वर्या रॉयला त्यावेळी हॉलीवूड सिरिअलबाबत प्रश्न विचारण्यात आला. तर सुश्मिताला भारतातील टेक्सटाईलचा इतिहास विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेले उत्तर जजेसना अधिक पटले आणि त्यामुळे सुश्मिता एक पाऊल पुढे गेली. या स्पर्धेनंतर सुश्मिताने मिस युनिव्हर्स आणि ऐश्वर्याने मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि दोघींनी विजयश्री कोरली. 

गुपचूप केलेल्या लग्नानंतर आता राखी सावंत झाली 'आई'

मुलींना घेतले दत्तक

Instagram

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिताने अनेक समजोपयोग काम केली. शिवाय तिने करिअर म्हणून अॅक्टींग हे फिल्ड निवडले. चित्रपटांमध्ये तिचे चांगले चालत होते. त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स ही मिळत राहिल्या.  विश्वसुंदरी असूनही तिने लग्न न करताच दोन मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 25 व्या वर्षी तिने दोन मुलींना दत्तक घेतले. रेन आणि आलिषा अशी या मुलींची नावे असून सुश्मिताने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. 

सुश्मिताचे कोट्यवधी दिवाने

Instagram

सुश्मिताचे जगभरातून कोट्यवधी दिवाने आहेत. तिला सोशल मीडियावरुन खूप जण फॉलो करतात. वयाच्या44 वर्षीही तिचे सौंदर्य तसू भर ही कमी झालेले नाही. उलट तिचे चाहते दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. 

रिलेशनशीपबाबत नेहमीच अनलकी ठरली सुश्मिता

Instagram

आता विश्वसुंदरी त्यात अभिनेत्री म्हटल्यावर रिलेशनशीप्स तर आलेच पण सुश्मिताचे नाव या आधी रिकी मार्टीन, विक्रम भट आणि रणदीप हुड्डा यांच्याशी जोडले गेले. पण या कोणाशीच तिचे रिलेशन जास्त काळ टिकून शकले नाही. सध्या 27 वर्षीय रोहमन शॉला डेट करत आहे. या दोघांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोहमन आणि सुश्मिताच्या नात्यातही दुरावा आला होता. त्यांनी तो सोशल मीडियावर मांडला होता. पण त्यानंतर ते पुन्हा एकत्र दिसले. 

तर या आहेत सुश्मिताच्या खासगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.